टेन्शन आलंय? या 10 सोप्या गोष्टी करून पाहा

टेन्शन आलंय? या 10 सोप्या गोष्टी करून पाहा

स्ट्रेस हा प्रत्येकालाच येतो. पण तो कसा दूर करायचा याच्या खूप सोप्या टिप्स असतात. त्या पुढीलप्रमाणे-

  • Share this:

मुंबई, 27 मे : जगताना आपण सगळेच जण तणावाला तोंड देत असतो. मग तो परीक्षेचा रिझल्ट असो नाही तर नोकरीतली पूर्ण करावी लागणारी डेडलाइन.  स्ट्रेस हा प्रत्येकालाच येतो. पण तो कसा दूर करायचा याच्या खूप सोप्या टिप्स असतात. त्या पुढीलप्रमाणे-

1. दीर्घ श्वास घ्या - श्वासाचं तंत्र खूप प्रभावी असतं. ताठ बसून नाकपुडीनं दीर्घ श्वास घ्या आणि तोंडानं तो सोडा. नंतर डाव्या नाकपुडीनं श्वास घेऊन तो उजव्या नाकपुडीनं सोडा. पुन्हा उजव्या नाकपुडीनं घेऊन तो डाव्या नाकपुडीनं सोडा. दीर्घ श्वास घेतल्यानं तुमचा रक्तदाबही नाॅर्मल होतो, असं तज्ज्ञ सांगतात.

केळं 'या' वेळेलाच खावं, नाहीतर होईल आरोग्याचं नुकसान

2. मेडिटेशन - शांत डोळे मिटून बसा. सगळं लक्ष श्वासावर केंद्रित करा. मेडिटेशनचे अनेक प्रकार आहेत. सकारात्मक विचारांवर लक्ष केंद्रित करूनही मेडिटेशन करता येतं. मला शांत वाटतेय. सगळं जग सुंदर आहे. असं म्हणतही तुम्ही ध्यान करू शकता. त्यानं मेंदूत सकारात्मक संदेश पोचून तणाव हलका होतो

3. तुम्ही जे करता त्यातच लक्ष घाला - कुठलीही गोष्ट सुरू असताना फक्त त्याच गोष्टीचा विचार करा. जेवत असाल तर जेवण एंजाॅय करा. त्यावेळी दुसरा कुठला विचार मनात आणू नका.

4. व्यायाम आणि योग करा - तणाव जाणवला की तुम्ही धावा. तुमची एनर्जी चॅनलाइज करा. योग करा. यामुळे मेंदूत डिप्रेशन येणाऱ्या रसायनांवर चांगला परिणाम होईल.

रिझल्टच्या आदल्या दिवशी 'असे' राहा टेन्शन फ्री

5. गाणी ऐका - अनेक तज्ज्ञांचं म्हणणं आहे की संगीत हे खूप चांगलं औषध आहे. तणावात असाल तेव्हा गाणी ऐका.

6. शरीराला मसाज करा - पार्लरमध्ये जाऊन शरीराला मसाज करून घ्या. यानं तुम्हाला खूप रिलॅक्स वाटेल.

7. खळखळून हसा - हसणं हे अनेक टेंशन्सवर उत्तम उपाय आहे. यामुळे तुमचे स्ट्रेस हार्मोन्स कमी प्रभावी होतात. आणि तणाव हलका होतो.

8. शरीराच्या अवयवांवर फोकस करा - जमिनीवर आडवं व्हा, दीर्घ श्वास घ्या आणि प्रत्येक अवयवावर लक्ष केंद्रित करा. स्ट्रेसचा त्यावर कसा विपरीत परिणाम होतोय, हे लक्षात घ्या.

घर खरेदी करणाऱ्यांना मोठा दिलासा, मोदी सरकारचा नवा प्लॅन

9. लोकांना भेटा - तणावावर हेही चांगलं औषध आहे. तुम्हाला आवडत्या व्यक्तींना जाऊन भेटा. फोन करा. तुमचा स्ट्रेस शेअर करा.

10. कृतज्ञता भाव ठेवा - आपल्याकडे काय नाही हे पाहण्यापेक्षा काय चांगलं आहे या गोष्टींचा नेहमी विचार करा. म्हणजे तणाव राहणार नाही. आहे त्याबद्दल कृतज्ञ राहा. अनेक जण अनेक गोष्टींपासून वंचित राहतात, ज्या तुम्हाला मिळालेल्या असतात. त्याचा विचार करा.

SPECIAL REPORT: रॅगिंगला आणखी किती विद्यार्थी बळी पडणार?

First published: May 27, 2019, 8:45 PM IST
Tags: stress

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading