प्रसूतीनंतर वजन वाढलं; टेन्शन घेऊ नका, करा फक्त 5 सोपे उपाय

प्रसूतीनंतर वजन वाढलं; टेन्शन घेऊ नका, करा फक्त 5 सोपे उपाय

घरच्या घरी या सोप्या उपायांनी तुम्ही प्रेग्नन्सीनंतर वाढलेलं अगदी 5 ते 20 किलो वजन कमी करू शकता.

  • Last Updated: Sep 29, 2020 02:41 PM IST
  • Share this:

बहुतेक स्त्रियांचं गरोदरपणात 5-15 किलो वजन वाढतं. यानंतर जेव्हा बाळ जन्माला येतं तेव्हा बऱ्याच महिला वजन कमी कसं करावं आणि पूर्वीसारखं सुडौल शरीर कसं मिळवावं या पेचात पडतात. योग्य आहार आणि नियमित व्यायामाद्वारे हे शक्य आहे. अगदी 5  ते 20 किलो वजन तुम्ही कमी करू शकता, तेदेखील अगदी घरच्या घरी सोप्या उपायांनी. प्रसूतीनंतर वजन कमी करण्याचे प्रभावी मार्ग काय आहेत जाणून घेऊयात.

स्तनपान 

myupchar.com चे डॉ. विशाल मकवाना यांनी सांगितलं की, स्तनपान फक्त बाळासाठीच नव्हे तर आईसाठीदेखील चांगलं आहे. स्तनपान केल्याने आईचं वजनही कमी होतं. स्तनपानाने दररोज 300-500 कर्बोदकांची घट होते. फक्त बाळासाठी पुरेसं दूध तयार व्हावं इतकी कर्बोदकं आहारातून घेतले आहात, याची काळजी महिलांनी घ्यावी.

पोषक आहार घ्या

दररोज प्रक्रिया केलेल्या पदार्थांऐवजी नैसर्गिक आहार घ्या. आपण स्तनपान देत असल्यास आपल्या मुलाला पुरेसं पोषण मिळतं याची खात्री करा. दिवसाला 1800 ते 2200 कर्बोदकांचं सेवन करा. विशेष म्हणजे लहान लहान भागात विभाजन करून या कॅलरी घ्या. आहारात प्रथिनं आणि कर्बोदकांचा समावेश करणं चांगलं होईल कारण हे योग्य प्रमाणात बर्‍याच काळासाठी मिळणारी ऊर्जा राखतील. जास्त कर्बोदकयुक्त पदार्थ टाळा.

बाळासह सक्रिय रहा

आपल्या दिनचर्येमध्ये दररोज व्यायामाचा समावेश करा. बाळाची काळजी घेतानादेखील हलका व्यायाम केला जाऊ शकतो. आपल्या मुलासह संगीत लावून नृत्य करा. व्यायामाची आवड नसल्यास मजेशीर कसरतीचा शोध घ्या. यामुळे बाळासह तुमचं नातं अधिक घट्ट होईल आणि तुमचं वजनही कमी होईल. दुसरं म्हणजे तुम्ही वेगानं चालू शकता.

पोटाच्या चरबीसाठी

आपल्या बाळाचं संगोपन करता करता हाताची आणि पायाची कसरत होईल, पण प्रसूतीनंतर ओटीपोटाभोवती चरबी राहते त्याचं काय? अशावेळी झोपण्यापूर्वी किंवा सकाळी उठल्यावर प्रथम वजन उचला. वरच्या आणि खालच्या ओटीपोटातील स्नायूंसाठी सोपे क्रंच देखील करता येतात.

भरपूर पाणी प्या

हायड्रेटेड राहण्यासाठी आणि पोट भरलेलं ठेवण्यासाठी दिवसभर पाणी प्या. myupchar.com चे डॉ लक्ष्मीदत्त शुक्ला म्हणाले, शरीराची पाण्याची गरज वातावरण, जीवनशैली आणि आरोग्यासारख्या विविध घटकांवर अवलंबून असतं. पाणी शरीरात उष्मा आणतं जे कर्बोदक जाळतं आणि चयापचय वाढवण्यास मदत करतं. जास्त चरबी कमी होण्यासाठी कोमट पाण्यात मध आणि लिंबू मिसळून प्या.

प्रसूती पट्टा मदत करेल

पोटाजवळील भाग सामान्य आकारात आणण्यासाठी पोट बांधून ठेवणं किंवा प्रसूती पट्टा वापरणं फायदेशीर ठरेल. पोट बांधल्याने सिझेरियन झालेल्या स्त्रियांना प्रसूतीनंतर पुन्हा आकारात आणण्यास मदत करते. याचा उपयोग वजन कमी करण्यास तसंच पाठदुखीपासून आराम मिळण्यास होतो.

अधिक माहितीसाठी वाचा आमचा लेख - गर्भ धारणा

न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.

अस्वीकरण: आरोग्य विषयक समस्या आणि त्याविषयीचे उपचार याची माहिती सर्वाना सहज सुलभतेने कुठल्याही मोबदल्याशिवाय उपलब्ध व्हावी हा या लेखांचा हेतू आहे. या लेखनामध्ये प्रकाशित माहिती म्हणजे तज्ञ अधिकृत डॉक्टरांच्या तपासणी, रोगनिदान, उपचार आणि वैद्यकीय सेवेचा पर्याय नाही. जर तुमची मुले, कुटुंबातील सदस्य, नातेवाईक यापैकी कुणीही आजारी असतील, त्यांना याठिकाणी वर्णन केलेली काही लक्षणे दिसत असतील तर, कृपया तत्काळ आपल्या डॉक्टरांना जाऊन भेटा. डॉक्टरांच्या मार्गदर्शना शिवाय स्वतः, तुमची मुले, कुटुंब सदस्य, किंवा अन्य कुणावरही वैद्यकीय उपचार करू नका किंवा औषधे देवू नका. myUpchar आणि न्यूज18 यावर प्रकाशित माहिती, त्या माहितीच्या अचूकतेवर, या माहितीच्या परिपूर्णते वर विश्वास ठेवल्याने, तुम्हाला कुठलीही हानी झाली किंवा काही नुकसान झाले तर, त्याला myUpchar आणि न्यूज18 जबाबदार असणार नाही, हे तुम्हाला मान्य आहे, आणि त्याच्याशी तुम्ही सहमत आहात.

First published: September 29, 2020, 2:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading