मुंबई, 2 फेब्रुवारी : मुलांच्या बोर्डाच्या परीक्षा जवळ लय आहेत. अशा परिस्थिती ताणतणाव असणे सामान्य आहे. ते जास्त वाढल्यास अडचणी निर्माण होऊ शकतात. परीक्षेचा भ्यास व्यवस्थित व्हावा यासाठी खूप वेळ आणि मेहनत घ्यावी लागते. अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे टेन्शन मुलांना असणार हे स्वाभाविक आहे. मात्र काही सोप्या टिप्सद्वारे मुलांची ही तणावग्रस्त मानसिकता आपण बदलू शकतो. टेन्शन न घेता अभ्यास करण्यासाठी या गोष्टी फायद्याच्या ठरतात.
अभ्यासासाठी शांत जागा निवडा
अभ्यासासाठी अशी जागा निवडा जिथे प्रकाश, हवा आणि शांतता आहे. या गोष्टींशिवाय कोणालाही अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे फार कठीण आहे. वाचताना मोबाईल दूर ठेवा.
जवळ आलीय मुलांची बोर्डाची परीक्षा, अॅक्टिव माइंडसाठी आहारात सामील करा हे पदार्थ
वेळोवेळी ब्रेक घ्या
प्रत्येकाची वाचण्याची पद्धत वेगळी असते. जर कोणी मध्यंतरी ब्रेक घेऊन वाचले तर त्याला लक्ष केंद्रित करणे आणि वाचलेले सर्व लक्षात ठेवणे सोपे जाते. अभ्यासात ब्रेक घेतल्यानेही मेंदू फ्रेश राहतो. याशिवाय तुम्ही आपले डोळे बंद करा आणि काही वेळ झोपा किंवा चालत जा किंवा आपण एखाद्याशी बोलू शकता.
निरोगी आहार घ्या
परीक्षेदरम्यान तुमच्या आरोग्याला हानी पोहोचेल असे काहीही खाऊ नका. त्यामुळे गॅस, अॅसिडिटी, झोप, थकवा किंवा तब्येतही बिघडू शकते. त्यामुळे अभ्यासातही अडथळा येतो. शक्य तितके निरोगी अन्न खा, स्वतःला हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या.
चांगली झोप घ्या
आरोग्यासाठी किमान 8 तासांची झोप घेणे आवश्यक आहे. जिथे काही विद्यार्थ्यांना रात्री अभ्यासावर लक्ष केंद्रित करता येते, तर काहींसाठी सकाळची वेळ चांगली असते. याशिवाय लक्ष केंद्रित करण्यासाठी मन शांत असणे खूप महत्वाचे आहे. ज्यामध्ये झोप खूप उपयुक्त आहे.
नोट्स उपयोगी येतील
वाचताना छोट्या नोट्स बनवल्याने गोष्टी वाचणे आणि लक्षात ठेवणे खूप सोपे होते. तुमच्या महत्त्वाच्या विषयांच्या नोट्स तयार करा. कोणताही पार्ट सर्व करण्याचा राहिला असेल तर तो नोट्सद्वारे कव्हर केला जाईल.
Health Tips : मुलांना माती खाण्याची सवय लागलीय? हे घरगुती उपाय करतील मदत
वेळापत्रक तयार करा
परीक्षेच्या भीतीपोटी बऱ्याचदा मुलं खूप वेळ अभ्यास करतात. मात्र यामुळे तणाव वाढू शकतो. त्यामुळे दोन विषयनाच्या अभ्यासात अंतर ठेऊन अभ्यास करा. यामुळे तणाव निर्माण होण्याची शक्यता कमी असते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Health Tips, Lifestyle, Students