कितीही डाएट केलं तरी पोटाचा घेरा कमी होत नाही; 'हे' असू शकतं कारण

कितीही डाएट केलं तरी पोटाचा घेरा कमी होत नाही; 'हे' असू शकतं कारण

सपाट पोट आणि बारिक कंबर हवी असेल तर बदला 'ही' सवय... सेलिब्रिटी nutritionist ऋजुता दिवेकर यांनी स्पष्ट केलं फिटनेसमध्ये बाधा आणणारं एक धक्कादायक कारण.

  • Share this:

मुंबई : वजन कमी करणं, पोट कमी करणं हे अनेकांचं लक्ष्य असतं. पण वेगवेगळी डाएट करून पाहिली आणि कितीही व्यायाम केला तर पोटाचा घेरा काही कमी होत नाही, असा तुमचा अनुभव आहे का? प्रसिद्ध न्यूट्रिशनिस्ट आणि सेलेब्रिटी फिटनेस एक्सपर्ट (fitness expert) ऋजुता दिवेकर rujuta divekar यांनी याचं कारण सांगितलं आहे. सोशल मीडियावर नुकत्याच शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये ऋजुता दिवेकर यांनी फिटनेसमध्ये बाधा आणणारं एक धक्कादायक कारण सांगितलं आहे.

त्या सांगतात की, "सपाट पोट, बारिक कंबर सगळ्यांना हवी असते. त्यासाठी व्यायाम पण केला जातो. पण त्यामध्ये अडचण येते ही सवय. मोबाईल किंवा गॅजेट्स वापरायची सवय शरीराची ठेवण बिघडवत आहे, असं दिवेकर सांगतात.

WEIGHTLOSS : जर या 10 सवयी पाळत नसाल तर, तुमचं वजन कमी होणे कठीणच !

त्याचं कारण स्पष्ट करताना त्या सांगतात की, 'माणसाचं डोकं सर्वांत जड असतं. जेव्हा आपण ताठ बसतो किंवा उभं राहतो त्या वेळी खांद्याच्या लेव्हलच्या वर कान येतात. तेव्हा डोक्याचं 5 ते 6 किलो वजन शरीर पेलत असतं. पण डोकं 15 अंशाच्या कोनात वाकवल्यावर शरीरावरचं त्याचं वजन वाढतं. हेच जर 60 अंशाच्या कोनात डोकं खाली घालून बसलं तर डोक्याचं वजन 30 किलोएवढं असतं. आता कल्पना करा, तासन तास मान खाली घालून मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसलं तर मानेवर, पाठीवर शरीरावर किती ताण येत असेल?'

या प्रकारच्या पुरुषांना असतो डिप्रेशनचा अधिक धोका, संशोधनात झालं स्पष्ट

अशा प्रकारे सतत मोबाईल किंवा गॅजेट्स वापरण्यासाठी डोकं खाली करून बसण्याच्या पोझिशनला टेक्नोलॉजी पोश्चर म्हणतात. टेक्नोलॉजी पोश्चरमध्ये सतत बसाची सवय  डायबेटिस, हृदयविकार तसंच PCOD किंवा थायरॉईडसारखे आजार असणाऱ्यांना जास्त घातक असते, असं दिवेकर यांचं मत आहे. त्यामुळे फोनमधून डोकं वर काढा, असा सल्ला त्या देतात.

उशीरापर्यंत रात्री जागायची सवय आहे तर वेळीच व्हा सावध!

झोपण्यापूर्वी किमान अर्धा तास, जेवताना-खाताना फोन बघण्याची सवय सोडा, असा सल्लाही त्या देतात. फोन किंवा गॅजेट बघताना ते डोळ्यासमोर धरून बघा. हे सोयीचं नाही, त्यामुळे सतत फोनमध्ये डोकं घालायची सवय नक्की कमी होईल. हे केलं नाहीत, तर फोटावरची चरबी घटणं अशक्य आहे, असं दिवेकर सांगतात.

केक कापावा इतक्या सहज पाडली इमारत, पाहा घटनास्थळावरचा LIVE VIDEO

Published by: Arundhati Ranade Joshi
First published: August 17, 2019, 8:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading