Work from home मुळे वाढतेय ढेरी, पोटाची चरबी कमी करण्यासाठी टिप्स

Work from home मुळे वाढतेय ढेरी, पोटाची चरबी कमी करण्यासाठी टिप्स

कोरोनाव्हायरस (coronavirus) जास्त पसरू नये यासाठी लॉकडाऊन (lockdown) करण्यात आलं आहे. अनेक जण वर्क फ्रॉम होम (work from home) करत आहेत. मात्र घर आणि ऑफिसमध्ये काम करण्यात भरपूर तफावत आहे.

  • Share this:

मुंबई : कोरोनाव्हायरस (coronavirus) जास्त पसरू नये यासाठी लॉकडाऊन (lockdown) करण्यात आलं आहे. अनेक जण वर्क फ्रॉम होम (work from home) करत आहेत. मात्र घर आणि ऑफिसमध्ये काम करण्यात भरपूर तफावत आहे. ऑफिसमध्ये आपण विशिष्ट उंचीचे टेबल, खुर्चीची सोय असते. आपण योग्य पद्धतीत बसून काम करतो. मात्र घरी तसं होत नाही, सहसा आपण आपल्या सोयीनुसार बसून काम करतो. शिवाय शरीराची हालचालही जास्त होत नाही. त्यामुळे पोट आणि कमरेभोवतालची चरबी वाढते.

तुमचीही ढेरी अशीच वाढत असेल, तर ती कमी करण्यासाठी या टिप्स

सोल्युबल फायबर अधिक प्रमाणात घ्या

सोल्युबल फायबर calories शोषून घेतात. त्यामुळे ज्या पदार्थांमध्ये असे पदार्थ आहेत, अशा पदार्थांचा आहारात समावेश करा. डाळी, सफरचंद, लिंबूवर्गीय फळं यातून सोल्युबल फायबर मिळतं.

Transfat असलेले पदार्थ खाऊ नका

Transfat च्या अधिक सेवनाचा पोटाची चरबी वाढण्याशी संबंध असल्याचं काही संशोधनात दिसून आलं आहे.

हे वाचा - महिलांपेक्षा पुरुष coronavirus चे सर्वाधिक शिकार, डॉक्टरांनी दिली 'ही' कारणं

मद्यपान कमी करा

जास्त प्रमाणात दारू प्यायल्याने belly fat वाढू शकतं. त्यामुळे पोट कमी करायचं असल्यास दारू कमी प्रमाणात प्या. शक्यतो करूच नका.

हाय प्रोटीनयुक्त आहार घ्या

पोट आणि कमरेभोवतालचा घेर कमी करण्यासाठी आहारातून जास्त प्रोटीन घ्या. मासे, डाळ यांचं सेवन करा.

अन्य बातम्या

CoronaVirus फ्रिजमध्येही जिवंत राहू शकतो का?

CoronaVirus चा धोका : होम डिलिव्हरी घेताना काय काळजी घ्याल?

Coronavirus : भारतातील 86 टक्के मृतांमध्ये 'ही' बाब समान

First published: April 12, 2020, 11:32 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading