News18 Lokmat

काजळ लावताना कशी घ्याल काळजी?

कोणत्याही प्रकारचा मेकअप असो, काजळ हा त्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे डोळ्यांचे सौंदर्य अधिक खुलून दिसते, जर तेच काजळ चुकीच्या पद्धतीने लावले गेल्यास चेहरा विद्रुप दिसू लागतो.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jan 5, 2018 02:07 PM IST

काजळ लावताना कशी घ्याल काळजी?

05 जानेवारी : कोणत्याही प्रकारचा मेकअप असो, काजळ हा त्याचा एक महत्त्वाचा भाग आहे.  त्यामुळे डोळ्यांचे सौंदर्य अधिक खुलून दिसते, जर तेच काजळ चुकीच्या पद्धतीने लावले गेल्यास चेहरा विद्रुप दिसू लागतो. तुम्हीही निष्काळजीपणे काजळ लावत असाल तर मग हे कसे दुरुस्त करता येईल ते जाणून घ्या.

* आजकाल बाजारात काजळाचे विविध रंग उपलब्ध आहेत, परंतु खरं तर काजळ काळ्या रंगाचं चांगलं दिसतं.  काळ्या रंगाचे काजळ डोळे मोठे आणि आकर्षक दिसण्यासाठी उत्तम निवड आहे. इतर रंगाचे काजळ देखील आहेत पण काळ्या रंगाच्या काजळामुळे डोळे अगदी उठून दिसतात.

* सामान्यत: काजळ डोळ्यांना पुढे-मागे करून डोळ्यांच्या दोन्ही टोकांना लावलं जातं, ही चुकीची पद्धत आहे.  काजळ डोळ्यांना आतून-बाहेरून लावल्यास काजळ योग्य दिशेने लागते आणि ते डोळ्यांभोवती पसरत देखील नाही.

*  सध्या काजळाला पसरवून स्मोकी मेकअप करायचा ट्रेंड आहे. पारंपरिक आणि वेस्टर्न या दोन्ही कपड्यांवर हा स्मोकी मेकअप चांगला दिसतो. स्मोकी मेकअप करण्याआधी डोळ्यांखाली काळी वर्तुळं नसतील याची काळजी घ्या. स्मोकी मेकअपमुळे डोळ्यांखालची काळी वर्तुळं अधिक उठून दिसतात.

* जाड काजळ हे चेहऱ्यावर छान दिसतं पण जर डोळे लहान असतील तर जाड काजळ लावू नका. त्याने डोळे अजूनच लहान दिसतात.

Loading...

* बाजारात स्मजप्रुफ काजळ उपलब्ध आहेत. काजळ विकत घेताना आधी ते पारखून घ्या. काजळ लावून बघा जर डोळ्यात पाणी किंवा आग होत असल्यास ते प्रोडक्ट विकत घेऊ नका. कारण असं काजळ डोळ्यास घातक असू शकतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 5, 2018 02:07 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...