नवी दिल्ली,12 जून: उन्हाळ्यामध्ये भाज्यांच्या किंमती (Prices of Vegetables) गगनाला भिडलेल्या असतात. पालेभाज्या किंवा इतर कोणत्याही भाज्यांच्या किमती दुपटीने वाढतात. त्यातच कोरोनामुळे (Corona) सगळेच जण बाहेर जाणं टाळतात. त्यामुळे जास्त प्रमाणात भाज्या, सामान आणून ठेवण्याचा (Sored food & Vegetable) प्रयत्न करतात. काही जणांकडे फ्रिज नसतो किंवा आता फ्रिज बिघडला असेल तर, सध्या लगेच दुरूस्त करणंही कठीण आहे. उन्हामुळे भाज्या सुकून जातात, अशा परिस्थितीत बाजारामधून आणलेल्या भाज्या जास्त दिवस कशा टिकवायचा प्रश्न असतो.
फ्रीजमध्ये भाज्या जास्त दिवस टिकतात. मात्र ज्यांच्याकडे फ्रिज नसेल, त्यांना भाज्या जास्त दिवस टिकवणं (Preserving Vegetables Without Refrigerator) कठीण ठरतं. भाज्या, फळं, दूध, अंडी उन्हाळ्यामध्ये खराब होऊन जातात. नैसर्गिक पद्धतीने हे पदार्थ खराब होणार नाहीत यासाठी काय करता जाणून घ्या.
फळभाजी किंवा पालेभाजी -
भाज्यांना कापून उन्हामध्ये सुकवून खराब होण्यापासून वाचवता येऊ शकतात. उन्हामध्ये वाळवल्यामुळे भाज्यांमधील बॅक्टेरिया मरून जातो. ज्यामुळे त्या जास्त दिवस टिकतात. काही भाज्या सुकल्यानंतर चवीला जास्त चांगल्या लागतात.
फळं -
भाज्यांबरोबर उन्हाळ्यात फळंही महाग होतात. फळं उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये खराबही होतात. त्यातच फ्रिज नसल्यामुळे टेन्शन आणखीन वाढतं. फळं खराब होऊ नयेत यासाठी त्यांना पाण्याने स्वच्छ धुऊन पुसून ठेवा. धुतल्यामुळे त्यांच्यावर घाण निघून जाईल आणि त्यामुळे जास्त दिवस टिकतील.
दूध -
दूध हा सर्वात लवकर खराब होणारा पदार्थ आहे. दुध आणल्यानंतर गरम केलं नाही, तर ते उन्हाळ्यामध्ये लवकर खराब होतं. दूध खराब होण्यापासून वाचवायचं असेल तर, दूध उकळताना त्यामध्ये 1 चमचा मध घाला. मधामुळे दूध लवकर खराब होणार नाही.
अंडी -
वाढत्या उन्हामुळे अंडी खराब होतात. त्यामुळे जास्त प्रमाणात अंडी घरी आणल्यानंतर ती कशा प्रकारे साठवून ठेवायची हा प्रश्न असतो. यासाठी अंडी पाण्यामध्ये टाकून ठेवा त्यामुळे त्यांना उन्हाची झळ बसणार नाही आणि जास्त दिवस टिकतील.
कोथिंबीर -
कोथिंबिरीची जुडी बाजारामधून आणताना ताजी-तवानी असते मात्र, घरी आल्यानंतर थोडावेळ ठेवल्य नंतर देखील कोथिंबीर सुकून जाते. अशा वेळेस कोथींबीर जास्त टिकवायची असेल, तर कोथिंबीरची मूळं कापून टाका. देठ असलेली कोथिंबीर एका ग्लासमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये उभी करून ठेवा. यामुळे कोथिंबीर जास्त दिवस टिकेल.
कढीपत्ता -
कढीपत्त्याची पानं लवकर सुकतात. यासाठी कडीपत्ता घरी आल्यानंतर देठापासून वेगळा करा. स्वच्छ धुऊन एका कापडावर वाळत घाला. यामुळे त्यातलं पाणी निघून जाईल. नंतर एखाद्या डब्यांमध्ये भरून ठेवा. अशाप्रकारे कडीपत्ता खराब होणार नाही.
शिजवलेले पदार्थ -
कोणताही शिजवलेला पदार्थ खराब होऊ नये, असं वाटत असेल किंवा फ्रिज शिवाय कसा टिकवायचा हा प्रश्न असेल तर, तो पदार्थ एका डब्यामध्ये भरून पाणी असलेल्या भांड्यामध्ये ठेऊन द्या. यामुळे डब्याच्या आजूबाजूला उष्णता वाढणार नाही आणि पदार्थ टिकेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health Tips