Home /News /lifestyle /

Corona Immunity booster म्हणून काढा पिताय? तो करताना कधीही करू नका या चुका

Corona Immunity booster म्हणून काढा पिताय? तो करताना कधीही करू नका या चुका

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि Coronavirus पासून बचावासाठी काढा पिण्याचा सल्ला नेहमी दिला जातो. पण काढा कसा असावा, कसा करावा आणि कधी प्यावा याचे काही नियम आहेत. चुकीच्या प्रमाणात काढा घेतला गेला तर दुष्परिणामच जास्त होतील.

नवी दिल्ली, 11 जानेवारी ः  गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण जग कोरोना विषाणूचा (Corona Virus) कहर अनुभवत आहे. आतापर्यंत कोरोनाच्या अनुषंगानं विविध स्तरावर संशोधन सुरू आहे. मात्र, या दरम्यान रोगप्रतिकार शक्ती (Immunity against Coronavirus) हा शब्द विशेष चर्चेत आला आहे. अर्थात त्यामागील कारणही तितकंच महत्त्वाचं आहे. शरीरातली रोगप्रतिकारक प्रणाली कोणत्याही आजाराचा प्रतिकार करते. त्यामुळे कोरोनाकाळात त्यातही विशेषतः सध्याचा ओमिक्रॉनचा (Omicron) वाढता संसर्ग पाहता लोकांनी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यावर (Immunity booster) भर द्यावा असा सल्ला तज्ज्ञ देतात. रोगप्रतिकार शक्ती वाढावी (How to increase immunity Ayurveda) यासाठी आयुर्वेदात (Ayurveda) काही उपाय सांगितले आहेत. त्यानुसार तज्ज्ञ रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी दररोज काढा (Kadha) घेण्याचा सल्ला देत आहेत. हंगामी सर्दी-तापातून लगेच व्हाल रिकव्हर; हा आयुर्वेदिक काढा ठरेल गुणकारी हा काढा तयार करण्याचे (How to prepare ayurvedic immunity booster kadha) तसेच तो घेण्याविषयीचे काही नियम आहेत.  नियमांची फारशी माहिती नसल्यानं लोक काढा तयार करताना अजाणतेपणी काही चुका करतात. यामुळे काढ्याचा अपेक्षित परिणाम दिसत नाही. काढा तयार करताना (Kadha recipe) त्यासाठीच्या घटकांचं प्रमाण चुकलं, तर त्यामुळ नुकसान होऊ शकतं. याविषयीची माहिती 'आज तक' ने दिली आहे. असे घ्या प्रमाण (How to prepare ayurvedic kadha) जर तुम्ही नियमितपणे काढा घेत असाल तर तो कमी प्रमाणात घेणं योग्य आहे. काढा तयार करतेवेळी भांड्यात केवळ 100 मिलीलीटर पाणी घ्यावं. डेल्टा, ओमिक्रॉननंतर आता डेल्टाक्रॉन; नेमका काय आहे कोरोनाचा हा नवा प्रकार? त्यात आवश्यक घटक टाकल्यानंतर पाणी 50 मिलीलीटर म्हणजेच निम्मं होईपर्यंत उकळावं (Boil). काढा तयार करण्यासाठी जे घटक तुम्ही वापरत आहात, त्याचं प्रमाण संतुलित असावं. काढा घेतल्यावर काही त्रास जाणवत असेल तर काढ्यात दालचिनी (Cinnamon), काळीमिरी (Black Paper), अश्वगंधा (Ashwagandha) आणि सुंठेचं (Ginger) प्रमाण कमी ठेवावं. तर होणार हा त्रास सर्दी, खोकल्यासाठी (Cold Cugh) काढा सर्वोत्तम उपाय असला तरी काही लोकांनी काढा घेताना विशेष काळजी घ्यावी. काढा तयार करताना काळमिरी, सुंठ, दालचिनी, हळद (Turmeric), अश्वगंधा, वेलची वापरली जाते. यामुळे शरीरातील उष्णता वाढते. त्यामुळे नाकातून रक्त येणं, पित्त होणं यासारख्या समस्या निर्माण होतात. ज्या लोकांना पित्तविकार आहे, त्यांनी काढा तयार करताना काळमिरी, सुंठ आणि दालचिनीचं प्रमाण मर्यादित ठेवावं.
Published by:News18 Web Desk
First published:

Tags: Corona, Health, Recipie

पुढील बातम्या