ऑफिसमधला ताण कमी करायचाय तर हे उपाय कराच!

ऑफिसमधला ताण कमी करायचाय तर हे उपाय कराच!

अनेकांना उदास राहणं हा एक आजार आहे हेच माहीत नसतं. त्यामुळे या गोष्टीकडे कोणीही गांभीर्याने पाहत नाही.

  • Share this:

अनेकदा ऑफिसमधला वाढता ताण आणि अनेक दिवस सुट्टी न घेता काम केल्यामुळे लोकांना ऑफिस स्ट्रेस येतो. ऑफिसमध्ये 9 किंवा त्याहून जास्त तास सतत काम केल्यानंतरही अनेकांकडून अधिका कामाची किंवा वर्क फ्रॉम होमची अपेक्षा केली जाते. यामुळे त्यांना स्वतःसाठी आणि वैयक्तिक आयुष्यासाठी वेळच देता येत नाही. यामुळे सतत तणाव, चिंता मनात घेऊन ते वावरत असतात. या सगळ्याचा परिणाम जेवढा त्यांच्या खासगी आयुष्यावर होतो तेवढाच तो ऑफिसमधील कामावरही होतो. लोक उदास राहायला लागतात. अनेकांना उदास राहणं हा एक आजार आहे हेच माहीत नसतं. त्यामुळे या गोष्टीकडे कोणीही गांभीर्याने पाहत नाही. सतत उदास राहिल्यामुळे लोकांच्या आरोग्यावर, कामावर परिणाम व्हायला लागतो आणि शरीरात नकारात्मकता पसरत जाते, याचे पुढे जाऊन फार गंभीर परिणाम भोगावे लागतात.

ऑफिस स्ट्रेसची कारणं-

ऑफिसमधील तणावाची अनेक कारणं असू शकतात. यात कामाचा ताण, सतत शिफ्ट बदलणं, शिफ्ट संपल्यानंतरही काम करणं, बॉसने प्रत्येक कामात चुका काढणं तसेच प्रोत्साहन न देणं, ऑफिस सहकाऱ्यांचं वाईट वागणं, एकच काम सतत करणं.. अशी एक ना अनेक कारणं आहेत ज्यामुळे लोकांना ऑफिसमध्ये काम करण्याचा ताण येऊ शकतो.

असा ठीक होईल ऑफिस स्ट्रेस-

अनेकदा लोकांना कळतच नाही की, ते तणावग्रस्त आहेत. त्यामुळे कोणत्याही गोष्टींवर ते चिडचिड करतात. हे समजून घेण्यासाठी दररोज डायरी लिहायची सवय लावा. डायरीमध्ये दिवसभर घडलेल्या सकारात्मक आणि नकारात्मक गोष्टी लिहा. यावरून तुम्ही आनंदी कधी होता आणि उदास कधी होता हे कळायला मदत होईल. या गोष्टी समजल्यानंतर त्या ठीक कशा करायच्या याचा विचार करा.

उदाहरणार्थ, जर तुमच्या बॉससबत कोणत्या कामावरून वाद झाला किंवा एखाद्या सहकाऱ्याशी तुमचा वाद झाला तर अशा परिस्थितीत मनाव ताण घेण्याएवजी ठंड डोक्याने त्यावर काम करा. बॉस तसेच सहकाऱ्यांशी चर्चा करा, जेणेकरून गोष्टी अजून चिघळणार नाहीत आणि ऑफिसचं वातावरण चांगलं राहिलं.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सुचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

70 वर्षांची म्हातारी हत्तीण आठवतेय का? अशक्तपणामुळे अखेर ती कोसळली

कंबरदुखीपासून त्रस्त आहात तर हे घरगुती उपाय एकदा करून पाहा!

या पद्धतीने तुम्ही पावसाळ्यात टिकवू शकता भाज्या आणि कडधान्य

वेळीच सावध व्हा, या 7 कारणांमुळे घरातून दूर जाईल लक्ष्मी!

VIDEO : कलम 370 रद्द केल्यानंतर सरसंघचालकांची वाढवली सुरक्षा

Published by: Madhura Nerurkar
First published: August 16, 2019, 3:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading