आठवडा सुरळीत जाण्यासाठी दर रविवारी करा 'या' 5 गोष्टी

आठवडा सुरळीत जाण्यासाठी दर रविवारी करा 'या' 5 गोष्टी

Sunday, Weekend - आठवडाभर धावपळ, ऑफिसमधलं काम, तणाव यामुळे लोक थकून जातात. मग सुट्टीचा एकच दिवस मिळतो, तो म्हणजे रविवार. तो असा करा प्लॅन.

  • Share this:

मुंबई, 6 जुलै : आठवडाभर धावपळ, ऑफिसमधलं काम, तणाव यामुळे लोक थकून जातात. मग सुट्टीचा एकच दिवस मिळतो, तो म्हणजे रविवार. अनेक जण तो दिवस आळसातच घालवतात. पण त्या दिवशी तुम्ही चांगलं प्लॅनिंग केलं तर अख्खा आठवडा व्यवस्थित, तणावरहित जाऊ शकतो. त्याच्याच काही टिप्स -

1. मेन्यू प्लॅन करा - तुम्ही चांगले पदार्थ खाल्लेत तर ते रोजचं आयुष्य जगायला उपयोगी पडतात. अनेकदा स्वयंपाकघरात गेल्यावर काय जेवणं बनवावं हा प्रश्न पडतो. घाईच्या वेळी वेळही जातो. मग रविवारी तुम्ही आठवडाभराचा मेन्यू प्लॅन केलात, तर आवड्यातला तणाव कमी होईल आणि हेल्थी खायला मिळेल.

अर्धवट झोपेमुळे तरुणांना होऊ शकतो 'हा' गंभीर आजार

2. प्लॅन करा - अनेक कामं अनेक दिवस टाळली जातात. अशा कामांची एक लिस्ट बनवा. वेळ मिळेल तशी कामं पूर्ण करा. म्हणजे आयुष्यातल्या बऱ्याच गोष्टी सोप्या जातील.

3. इतर गोष्टी करा - आठवडाभर आपण कामच करत असतो. रविवारी इतर रंजक गोष्टी करा. स्मीमिंग, ड्रायव्हिंग क्लास किंवा डान्स क्लास यावर जोर द्या. छोटी ट्रिप प्लॅन करा.

सावधान! तुम्ही अपार्टमेंट मध्ये राहता? मग तुम्हाला होऊ शकतो हा त्रास

4. स्वत:कडे लक्ष द्या - नोकरीच्या धावपळीत स्वत:कडे दुर्लक्ष होतं. अशा वेळी बाॅडी मसाज, केसाची काळजी या गोष्टींकडे लक्ष द्या. शरीराची स्वच्छता राखा. मन, शरीर रिलॅक्स होईल, अशा गोष्टी करा.

साबण आणि टुथपेस्टच्या वापराने होतात ‘हे’ भयानक आजार !

5. कपाट आवरा - अनेकांची ही समस्या असते. आॅफिसला जाण्याच्या घाईत कपाडातले कपडे अस्ताव्यस्त होतात. अनेकदा चांगले कपडे इतके खाली जातात की ते दिसतच नाहीत. अशा वेळी रविवारी कपडे नीट लावलेत तर पुढच्या आठवड्यात कधी काय घालायचं, हेही ठरवता येईल.

सापाला पाहून जेव्हा पोलिसाची उडाली घाबरगुंडी, पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 6, 2019 06:12 PM IST

ताज्या बातम्या