मुलांनी सकस आहार घ्यावा यासाठी त्यांच्या मागे लागून तुम्ही थकला असाल तर बिलकूल चिंता करू नका, कारण तुमच्यासारखेच अनेक पालक आहेत. प्रत्येक पालकाला त्यांच्या मुलांना ताजा आणि सकस आहार देण्यासाठी दररोज अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. मुलांना सारखे खाऊ घालणे आणि त्यांच्या आहाराच्या गरजा पूर्ण हे खूप अवघड काम आहे.
अद्याप लहान मुलं नवनवीन चवींचा अनुभव घेत असतात, त्यामुळे पदार्थांची निवड करताना ते आपल्या आवडीनिवडी जपत असतात. त्यामुळे बऱ्याचदा त्यांना सकस आहार मिळू शकत नाही हे आपल्या लक्षात येत नाही. त्यामुळे या सकस आहाराअभावी मुलांमध्ये चिडचिडेपणा वाढू शकतो, त्यांना भूक लागत नाही, त्यांना डोकेदुखी किंवा चक्कर येते, मुलांमध्ये स्नायू आणि हाडांची कमजोरी दिसून येते, तसेच वारंवार पोटात इन्फेक्शन होते आणि योग्य पोषक तत्त्वांअभावी इतर बरीच लक्षणे दिसून येतात.*
पण प्रत्येक पालक मुलांना सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे मुलांनाही आवडेल अशा प्रकारे त्यांना योग्य पोषण प्रदान करणाऱ्या मार्गांचा ते सतत शोध घेत असतात. मुलांची सुरुवातीची वर्ष खूप महत्त्वाची असतात. या काळात त्यांच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक क्षमतांसह मुलांची प्रतिकारशक्तीही विकसित .
सुरुवातीच्या वर्षांत पौष्टिक अन्न का आवश्यक असते?
तुमची मुलं लहानपणी सुरुवातीच्या वर्षांत तसेच त्यांच्या शाळेपुर्वीच्या 2-5 वर्षांत जे खातात त्याचा त्यांच्या भविष्यातील आरोग्यावर मोठा परिणाम होतो. हा त्यांच्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाचा काळ आहे. याच काळात त्यांच्या मेंदूचा, हाडांचा, दातांचा तसेच त्यांच्या मनाचा विकास होत असतो. त्यामुळे याकाळात त्यांच्या शरीरातील आयर्न, आयोडिन, व्हिटॅमिन A आणि इतर पोषक तत्वे खूप आवश्यक असतात. मुलांच्या त्यांच्या सुरुवातीच्या वर्षात आवश्यक पोषक तत्वे मिळावीत यासाठी वेगवेगळ्या प्रकारचा पोषक आहार देणे खूप आवश्यक असते.
मुलांमध्ये व्हिटॅमिन A, आयर्न, झिंक, कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन D यांची कमतरता निर्माण होऊ नये यासाठी खाण्याच्या चांगल्या सवयी लावणे आणि आहाराविषयी योग्यवेळी लवकर हस्तक्षेप करणे खूप आवश्यक असते. या वयात योग्य सवयी लावल्यास मुलांना भविष्यात या सवयी दीर्घकाळ तंदुरुस्त राहण्यास उपयोगी ठरतील. सूक्ष्म पोषक घटकांच्या कमतरतेमुळे लाखो मुलांना आकलनविषयक समस्या, प्रतिकारशक्ती कमकुवत होणे आणि वाढ खुंटणे यासारख्या समस्यांचा सामना करावा लागतो.**
मुलांच्या आहारात हव्या असलेल्या महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या?
शाळेत जाण्यापुर्वीच्या वयातील मुलांच्या शरीरासाठी पोषक घटकांनी समृद्ध आहार आवश्यक असतो. ज्यात खूप सारी व्हिटॅमिन्स, खनिजे, कर्बोदके, प्रोटीन्स आणि फॅट्स यांचा समावेश असायला हवा. ज्या मुलांना लहाणपणी या पाच आवश्यक गोष्टी मिळतात, त्यांची आकलनशक्ती चांगली असते आणि पुढील आयुष्यात गंभीर आजार होण्याची शक्यता कमी असते. काही क्षणांसाठी थांबा आणि विचार करा की तुमच्या मुलांना या पाच आवश्यक गोष्टी पुरेश्या प्रमाणात मिळतात का?
● तांदूळ, गहू, नाचणी, ब्रेड इ. सारखे धान्ये
● ताजी फळे.
● भाजीपाला, वेगवेगळ्या प्रकारच्या हिरव्या भाज्या.
● अंडी, मासे, पोल्ट्री, बीन्स आणि मटन यांसारखे प्रोटीनयुक्त पदार्थ.
● दूध, चीझ आणि योगर्ट यांसारखे पदार्थ.
बर्याच पालकांसाठी हे खूप मोठे काम असते. दिवसभराच्या व्यस्त वेळात या सर्व गोष्टी करणे त्यांना अवघड जाते. आणि त्यातही तुमची मुले एका जागेवर बसत नसतील आणि जेवणापेक्षाही खेळण्यातच ते जास्त वेळ देत असतील आणि त्यांना हिरव्या भाज्या बिलकूल आवडत नसतील, तर ते आणखीच अवघड होते.
तुमची मुलं चांगला आहार घेण्यास नकार देत असतील तर काय करावे?
मुलं पौष्टिक आहार घेण्यास नकार देत असतील, तर तुम्हाला अद्याप त्यावर एक निश्चित उपाय शोधणे आवश्यक आहे, ज्याद्वारे त्यांना दररोज योग्य ते सर्व पोषक आहार मिळेल.
त्यासाठीचे काही सोपे मार्ग:
केवळ आरोग्यदायी नेसले सेरेग्रोचा मुलाच्या सध्याच्या आहारात समावेश करून त्याचे चांगले आरोग्य टिकवणे शक्य आहे. तो प्रिझर्वेटिव्ह फ्री असतो आणि त्यापासून कोणत्याही जास्तीच्या फ्लेवरचा समावेश न करताही 2-5 वर्षांच्या मुलांसाठी स्वादिष्ट ब्रेकफास्ट बनवता येऊ शकतो. सेरेग्रोचे प्रत्येक बाऊल हे आयर्न, व्हिटॅमिन A, C, D, कॅल्शियम, प्रोटीन यांनी समृद्ध असते. धान्य, दूध आणि फळांप्रमाणेच आता तुम्ही तुमच्या मुलास कुठेही कधीही, कधीही पूर्णपणे पोषक आहार देवू शकता.
नेसले सेरेग्रो- तुमच्या लाडक्या मुलांसाठी स्वादिष्ट आणि पौष्टिक ब्रेकफास्टविषयी अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
*RDA 4-6 yr children as per ICMR 2010
*https://www.ceregrow.in/child-nutrition/nutrient-deficiency-symptoms
** https://www.unicef.org/nutrition/index_iodine.html
This is a partnered post.