केसांच्या सर्व समस्यांपासून मुक्ती देणारा हेअर मास्क; घरच्या घरी असा तयार करा

केसांच्या सर्व समस्यांपासून मुक्ती देणारा हेअर मास्क; घरच्या घरी असा तयार करा

केसांच्या उत्तम पोषणासाठी चेहऱ्याच्या मास्कप्रमाणे केसांचा मास्क (hair mask) वापरायला हवा.

  • Share this:

मुंबई, 25 मे : वातावरणातील बदल आणि सततच्या वाढत्या उष्णतेमुळे केसांवर (hair) परिणाम होऊ लागला आहे. लॉकडाऊनमुळे सध्या स्पा आणि कॉस्मेटिक क्लिनिक बंद ठेवण्यात आलेत. त्यामुळे केसांची काळजी नेमकी कशी घ्यावी, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. केसांसाठी चांगल्या दर्जाचा शाम्पू आणि कंडिशनर वापरणं गरजेचं आहेच. मात्र केसांच्या उत्तम पोषणासाठी चेहऱ्याच्या मास्कप्रमाणे केसांचा मास्क (hair mask) वापरायला हवा. याबाबत मुंबईतील कॉस्मेटिक सर्जरी इन्स्टिट्युटचे वरिष्ठ कॉस्मेटिक सर्जन डॉ. मोहन थॉमस यांनी मार्गदर्शन केलं आहे.

केसांच्या मास्कचे अनेक फायदे आहेत. विशेष म्हणजे मास्क तयार करण्यासाठी वापरण्यात आलेल्या घटकांवर ते अवलंबून आहे. यामुळे केसांचं कमीत कमी नुकसान होतं. केस गळणं थांबते, केस तुटत नाहीत, केसांची निगा राखली जाते, केसात कोंडा होत नाही, केस मऊ आणि चमकदार दिसू लागतात आणि केस अधिकच मजबूत होण्यास मदत मिळते.

घरच्या घरी कसा तयार कराल हेअर मास्क?

1) केळी आणि नारळ तेल हे केसांच्या वाढीसाठी अतिशय उपयुक्त आहे. केळ्यांमध्ये आढळणाऱ्या सिलीकामुळे केस मुलायम, चमकदार, रेशमी होण्यास मदत होते. तसंच डोक्याच्या त्वचेवरील कोरडेपणाही कमी होतो. तर नारळाच्या तेलाचा वापर कंडिशनर म्हणूनही करता येऊ शकतो. कोमट तेलाने केसांच्या मुळांना मसाज करा. यामुळे केसांची वाढ होईल. नारळाचं तेल स्कॅल्पना पोषण देतं तसंच कोंड्याची समस्या दूर करते. याशिवाय केस गळण्याचं प्रमाणही कमी होतं.

हे वाचा - कमी वयात तुमचेही केस पांढरे झालेत का? आहारात 'या' पदार्थांचा समावेश करा

2) तेलकट टाळूमुळे डोक्यात कोंडा होण्याची शक्यता अधिक असते. अशा स्थितीत दही, सफरचंद आणि कोरफड यांचं मिश्रण करून केसांना लावावं. यामुळे केसातील कोंड्याची समस्या दूर होते. दद्यामध्ये अँटीऑक्सिडंट आणि केसांच्या वाढीसाठी आवश्यक असलेले जीवनसत्त्वे जास्त प्रमाणात असतात. त्यामुळे केसांची निगा राखली जाते.

3) केस कमकुवत असल्यास गळण्याची आणि तुटण्याची समस्या जाणवते. यासाठी अंडी, मध आणि ऑलिव्ह ऑईलचा वापर करणं फायदेशीर आहे. अंड्यातील आतील पिवळ्या बलकात जीवनसत्त्वं ए आणि ई असतात. ज्यामुळे केस मजबूत होण्यात मदत मिळते.

केसांचा मास्क कसा वापरावा?

केस धुऊन ते सुकल्यानंतर मास्क लावावा. नारळ किंवा ऑलिव्ह ऑईल केसांना लावल्यास अधिक फायदा होतो.

मास्क लावल्यानंतर केसांना एखाद्या कपड्याने बांधा.

केस लांब असल्यास क्लिप वापरून आपले केस विभागून घ्या.

डोक्यातील कोंडा काढण्यासाठी केसांच्या मुळांपर्यंत योग्य पद्धतीने तेल लावा.

सामान्यत: हेअर मास्क 30 मिनिटांसाठी ठेवावा लागतो. मात्र काही मास्कमध्ये वापरलेल्या घटकांनुसार ते 12 तासांपर्यंत ठेवू शकता.

केसांमध्ये अधिक आर्द्रता टिकवून ठेवण्यासाठी केस कोमट पाण्याने स्वच्छ धुवा.

कोरड्या केसांसाठी आठवड्यातून एकदाच हेअर मास्क वापरावा, तर तेलकट केसांसाठी 2 आठवड्यात एकदा या मास्कचा वापर करावा.

हे वाचा - उन्हाळ्यात आरोग्य सांभाळा; 'हे' पदार्थ चुकूनही खाऊ नका

First published: May 25, 2020, 8:37 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading