चटकदार VIDEO : चीज सॉसची एक भन्नाट रेसिपी... एका मिनिटात

चटकदार VIDEO : चीज सॉसची एक भन्नाट रेसिपी... एका मिनिटात

बीअर वापरून केलेला हा सॉस तयार करायला अगदी सोपा. फ्राईज, टॅकोज, चिप्स याबरोबर हा चीज सॉस मस्त लागतो. झटपट होणारा टँगी, चटपटीत असा हा चीज सॉस घरच्या घरी करता येईल. पाहा कसा...

  • Share this:

मुंबई, 19 एप्रिल : रेस्टॉरंटमध्ये किंवा मॉलमध्ये गेल्यावर मेक्सिकन फ्राईज, टॅकोजबरोबर किंवा मोमोबरोबर चीज सॉस टेस्ट केला असेल. हा चीज सॉस कसा बनवतात माहितीये? चीज सॉसची ट्रॅडिशनल रेसिपी पाहिली तर दूध, चीज, बटर आणि इटालियन हर्ब्स असं मिश्रण असतं. पण आज थोडी वेगळी, हटके, भन्नाट रेसिपी इथे बघायला मिळेल. चीज सॉस तयार केलाय चक्क बीअर वापरली आहे.


बीअर वापरून केलेला हा सॉस तयार करायला अगदी सोपा. झटपट होणारा टँगी, चटपटीत असा हा चीज सॉस घरच्या घरी करता येईल. एक बाटली बीअर गरम करून त्यात चीज वितळवायचं आणि मग असा हा सॉस तयार होतो. फ्राईज, टॅकोज, चिप्स याबरोबर हा सॉस मस्त लागतो.

FYI TV18च्या एका शोमध्ये ही रेसिपी दाखवण्यात आली आहे. एका मिनिटात पाहा कसा करायचा चीज सॉस... बीअर वापरून...


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 19, 2019 05:05 PM IST

ताज्या बातम्या