सणासुदीच्या दिवशी आपण चकली खातोच, पण पावसाळा आला की, गरम-गरम चहासोबत कुरकुरीत चकली खायला मिळणं, एक पर्वणीच असते. साऊथ इंडियामध्ये 'मुरुक्कू', गुजरातमध्ये 'चक्री' आणि महाराष्ट्र-उत्तर प्रदेशात 'चकली' असं म्हटलं जातं, या चविष्ट पदार्थाला. चकलीचं नाव जरी काढलं तरी, तोंडाला पाणी सुटतं. अहो, कुणाला आवडतं नाही कुरकुरीत चकली? पण, पावसाळ्यात चकली खायला मिळणं, हा एक वेगळाच आनंद असतो. चला तर अशी कुरकुरीत चकली कशी करायची, ते पाहुया...
चकलीच्या भाजणीचे साहित्य किती आणि कसं घ्याल?
1 किलो जुना जाड तांदूळ
अर्धा किलो चणाडाळ
50 ग्रॅम उडीद डाळ
100 ग्रॅम पोहे
25 ग्रॅम जीरे
25 ग्रॅम धणे
200 ग्रॅम मूग डाळ
100 ग्रॅम साबुदाणे
चकलीचं पीठ कसं तयार करणार?
पहिल्यांदा तांदूळ, डाळी आणि इतर साहित्य निवडून घ्यायचं. तांदूळ धुतलं की, पूर्णपणे निथळून घ्यायचं. नतंर के सुती कापडावर पसरून दिवसभर खडखडीत वाळवून घ्यायचं.
सर्व डाळी मध्यम गॅसवर भाजून घ्या, पण हे लक्षात की आपल्या डाळ करपवायची नाही. त्याचा खमंग वास आला की, डाळ भाजवणं थांबवायचं. त्याच पद्धतीनं पिवळा रंग प्राप्त होत नाही, तोपर्यंत तांदूळही भाजून घ्यायचं. पोहेदेखील भाजून घ्यायचं. पण, एक लक्षात राहू दे, पोहे जळणार नाहीत याची काळजी घ्या.
वाचा : Monsoon Recipe: पावसाळ्यात ट्राय करा भाताची भजी, पाहा झटपट रेसिपी
मध्यम गॅसवर साबुदाणा भाजा. साबुदाणा हा भाजताना फुलला की, भाजण्याचा थांबवा. जिरं आणि धणंसुद्धा भाजून घ्या. भाजलेले सर्व डाळी, तांदूळ, साबुदाणे आणि इतर जिन्नस थंड झाल्यानंतर गिरणीतून दळून आणायचं.
महत्त्वाची कृती
चकलीचं पीठ मळताना पहिल्यांदा ते चाळून घ्या. एकदम पीठ मळू नका. थोडेथोड पीठ मळून चकल्या तयार करा. कारण, जास्त पीठ मळलं की, पीठ जास्त वेळ ओलं राहतं आणि चकल्या चांगल्या होत नाहीत.
वाचा : जीभेचे चोचले पुरवा आणि हेल्थीही राहा! केळ्यांचे आरोग्यदायी वेफर्स घरबसल्या बनवण्याची रेसिपी
चकली तयार करण्यासाठी लागणारं साहित्य
1) दोन कप भाजणीचं पीठ
2) चमचा घरगुती मसाला किंवा लाल मिरची पावडर
3) तीन चमचे तीळ
4) एक चमचा ओवा
5) तीन चमचे मोहरीचं तेल
6) एक कप पाणी
7) एक चमचा मीठ
8) तळण्यासाठी लागणारे तेल
कुरकुरीत चकली करायची पद्धत अशी आहे?
1) परातीत भाजणी, तीळ, ओवा, लाल तिखट आणि मीठ चांगले मिक्स करून घ्या.
2) गॅसवर कढईत 3 चमचे मोहरीचे तेल गरम करून परातीत घेतलेल्या पीठ घाला.
3) पाणी घेऊन कणीक चांगलं मळून घ्या. पण, हो गरम पाणी वापरायचं नाही बरं का.
4) चकली साच्या घ्या, त्याला आतून तेल लावा. याच्यानं काय होतं, तर साच्यात पीठ चिकटत नाही.
5) नंतर एक पीठाचा गोळा करून साच्यामध्ये घाला आणि एका तेल लावलेल्या भांड्यात चकल्या पाडून घ्या.
6) गॅसवर एका कढईत तळण्यासाठीचं तेल चांगलं गरम करून घ्या. पण, चकल्या तेलास सोडल्यानंतर गॅस मध्यम करा. इथं एक काळजी घ्या, कढईमध्ये एकाच वेळी चकल्यांची गर्दी होऊ देऊ नका. त्यासाठी एकाच वेळी चार चकल्या तेलात सोडा.
7) थोड्या वेळानं चकल्यांचा रंग बदलायला लागंल आणि तेलातील चकल्यांच्या भोवतीचं बुडबुडं बंद होतील. तेव्हा समजून जा की, चकल्या चांगल्या तळल्या गेल्यात. कढईतून चकल्या काढून घ्या आणि कागद्यावर पसरवून घ्या. झाली की, तुमची कुरकुरीत आणि खमंग चकली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.