सासू- सासऱ्यांची असं ठेवा नातं, आयुष्यभर रहाल आनंदी

वैवाहिक आयुष्य सुरळीत व्हावं असं वाटत असेल तर त्यांना समजून घेणं फार आवश्यक आहे. पती- पत्नीने मिळून संसाराचे निर्णय घेणं फार आवश्यक आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 2, 2019 07:15 PM IST

सासू- सासऱ्यांची असं ठेवा नातं, आयुष्यभर रहाल आनंदी

लग्न हे एक असं नातं आहे जिथे एकाचवेळी नवीन अनेक नाती जोडली जातात. यात सर्वात महत्त्वाची भूमिका असते ती सासू- सासऱ्यांची. आई- वडिलांची जागा अचानक सासू- सासरे घेतात. आयुष्याच्या अशा टप्प्यात नवीन आई- वडिलांना समजणं अनेकदा कठीण होऊन जातं. मात्र वैवाहिक आयुष्य सुरळीत व्हावं असं वाटत असेल तर त्यांना समजून घेणं फार आवश्यक आहे. पती- पत्नीने मिळून संसाराचे निर्णय घेणं फार आवश्यक आहे. दोघांनी एकमेकांना समजून घेत लग्नानंतर जोडलेल्या प्रत्येक नात्याला न्याय देणं गरजेचं आहे.

लग्नानंतर पत्नी तिच्या आई- वडिलांना सोडून नवऱ्याच्या घरी येते, तेव्हा तिच्यासाठी सासू- सासरे फार महत्त्वाचे असतात. भलेही तुम्हाला त्यांची एखादी गोष्ट आवडली नाही किंवा त्यांना तुमची गोष्ट आवडली नाही तरी सर्वांना एकत्रच राहायचं असतं. एखाद वेळेस तुमचं सासू- सासऱ्यांशी पटलं नाही आणि तुमच्या मताशी नवरा सहमत नसेल तर दोघांनी मिळून त्यावर समाधान शोधलं पाहिजे. काहीशा अशा प्रकारे तुम्ही समस्यांचं निरसन करू शकता.

याबद्दल पत्नीशी मोकळेपणाने बोला. तिला आई- वडिलांबद्दल प्रत्येक छोटी- मोठी गोष्ट सांगा, जेणेकरून तिला पूर्ण कल्पना असेल. तसेच पत्नीला समजवा की हट्ट धरण्यात काहीच साध्य होणार नाही. प्रत्येक गोष्ट समजून घेण्याची गरज असते.

तुम्ही तिला संयुक्त घराचं महत्त्व समजवा. तुमच्यासाठी आई- वडील किती महत्त्वाचे आहेत ते नक्की समजवा. तसेच तिला कोणतीही अडचण आली तरी संपूर्ण कुटूंब तिच्या पाठिशी ठामपणे उभं राहिल याचा विश्वास द्या.

तुमच्या प्रत्येक संकटात आई- बाबांची साथ नक्की असेल. पत्नीला समजावून सांगा की, मुलांच्या योग्य संगोपनात वडिलधाऱ्यांची नजर असणं फार महत्त्वाचं आहे. यामुळे मुलांना चांगले संस्कार मिळतील.

Loading...

Coconut Day- नारळाचं पाणी पिण्याचे 5 फायदे, गंभीर रोगांवर आहे रामबाण उपाय

भारतातली 10 सर्वात मोठी गणपती मंदिरं, जिथे बॉलिवूड स्टारही होतात नतमस्तक

तुमच्या मोज्यातून येते दुर्गंधी? स्वयंपाक घरातील हे पदार्थ करेल दूर वास

तुमचं केस गळणं आता आलं थांबवणार

सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे रंगले बाप्पाच्या स्वागतात, पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 2, 2019 07:15 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...