या 5 गोष्टी करतील तुमचं पोट कमी

या 5 गोष्टी करतील तुमचं पोट कमी

रोजच्या धावपळीच्या जीवनात आपल्याला व्यायाम किंवा जीमला जाण्यापुरताही वेळ मिळत नाही. पण या 5 गोष्टी केल्यात तर तुमच्या पोटाची चरबी कमी होऊ शकते.

  • Share this:

आपलं काम जर ऑफिसमध्ये किंवा इतर वेळी बसून असेल आणि आपला आहारही संतुलित नसेल तर आपल्या पोटाची चरबी वाढण्याची समस्या उद्भवू शकते. पण काळजी करु नका आम्ही तुम्हाला अशा काही टीप्स सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही घरबसल्या तुमच्या पोटाची चरबी कमी करु शकता.

एका रिसर्चमधून असं समोर आलं आहे की सलग किंवा पटापट बोलल्यानं किंवा च्युइंगम खाल्यानं पोट फुगण्याची समस्या उद्धभवू शकते. त्यामुळे पटपट बोलणं आणि च्युइंगम खाणं टाळा.

रोज खळखळून हसा. हसल्यानं आपल्या पोटातील स्नायूंचा व्यायाम होतो. त्यामुळे रोज खूश राहा आणि पोटभर हसा ज्यामुळे तुमचा दिवस प्रसन्न राहिल आणि पोटाचा व्यायाम होईल.

रोज ताजं अन्न खाण्यावर भर द्या. शिळे अन्नपदार्थ, तेलकट किंवा फॅट असलेले बाहेरचे पदार्थ खाणं शक्यतो टाळा.

जास्त वेळ पोट रिकामं राहिल्यानं शरीरातील मेटाबॉलिझमचं प्रमाण वाढतं. ज्यामुळे तुमचं पोटात फॅट जमा होतं आणि पोटाचा घेर वाढण्यास सुरुवात होते, त्यामुळे एक वेळा न खाता दर २ तासांनी थोडं थोडं खात राहा. त्यामुळे तुमची पचनशक्तीही उत्तम राहण्यास मदत होईल.

रोज कमीत कमी दोन ते तीन लिटर पाणी प्या. मात्र ते पाणी एकदम एक लीटर न पिता टप्प्या-टप्प्यानं प्यावं. त्यामुळे डिहायड्रेशन होणार नाही.

रोज कमीत कमी दोन ते तीन लिटर पाणी प्या. मात्र ते पाणी एकदम एक लीटर न पिता टप्प्या-टप्प्यानं प्यावं. त्यामुळे डिहायड्रेशन होणार नाही. धावपळीच्या आपल्या रुटिनमध्ये या गोष्टी रोज पाळल्यानं आपल्या पोटाची चरबी कमी होण्यास मदत होईल व आपलं आरोग्य उत्तम राहिलं त्यामुळे या गोष्टी तुमच्या आजच तुमच्या रुटिनमध्ये Add करायला विसरु नका. आणखी काही हेल्थ टिप्स जाणून घेण्यासाठी न्यूज १८ लोकमतला फॉलो करा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 26, 2019 12:01 PM IST

ताज्या बातम्या