मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

lose weight with lemon: वजन कमी करण्यात फक्त 1 लिंबू आहे फायदेशीर; आहारात असा करा समावेश

lose weight with lemon: वजन कमी करण्यात फक्त 1 लिंबू आहे फायदेशीर; आहारात असा करा समावेश

लिंबू चवीला आंबट असली तरी आरोग्यासाठी त्याचे अनेक गोड फायदे आहेत. त्याच्या नियमित वापराने आपण जलद वजन कमी करू शकता. विशेष म्हणजे लिंबूमध्ये कॅलरीज खूप कमी असतात, लिंबूपाणी प्यायल्याने शरीरातील अतिरिक्त चरबी तर जळतेच, पण वजनही सहज (lose weight with lemon) कमी होतं.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

मुंबई, 16 नोव्हेंबर : तुम्ही लठ्ठपणाने त्रस्त असाल आणि वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर लिंबू तुमच्या फायद्याचा ठरू शकतो. लिंबू चवीला आंबट असली तरी आरोग्यासाठी त्याचे अनेक गोड फायदे आहेत. त्याच्या नियमित वापराने आपण जलद वजन कमी करू शकता. विशेष म्हणजे लिंबूमध्ये कॅलरीज खूप कमी असतात, लिंबूपाणी प्यायल्याने शरीरातील अतिरिक्त चरबी तर जळतेच, पण वजनही सहज (lose weight with lemon) कमी होतं.

लिंबू आरोग्यासाठी अनेक फायदे

लिंबूपाणी एकंदरीत आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेच. जे तुमच्या शरीराला केवळ डिटॉक्सिफाई करत नाही तर लिंबूमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स पचनाच्या समस्याही दूर करतात.

वजन कमी करण्याबाबत डॉक्टर काय म्हणतात?

आयुर्वेद डॉक्टर अबरार मुलतानी यांनी झी न्यूजला दिलेल्या माहितीनुसार, वजन कमी करण्यासाठी स्नॅकिंगच्या सवयीसाठी जेवणाच्या वेळेसोबतच शरीराला हायड्रेट करणं खूप गरजेचं आहे. आहार बदलल्याने चयापचय तर सुधारतेच, पण पोटाची चरबीही कमी होते. त्यामुळे वजनही नियंत्रणात राहून शरीर सडपातळ दिसू लागते. यासाठी तुम्ही लिंबाचा आहारात खालील प्रकारे वापर करू शकता.

वजन कमी करण्यासाठी अशा प्रकारे लिंबाचा वापर करा

वजन कमी करण्यासाठी लेमन टी फायदेशीर आहे. एका कप चहामध्ये लिंबाचे २-३ थेंब टाकून प्यायल्याने वजन कमी होण्यास खूप मदत होते.

हे वाचा - पोटाची चरबी कमी करण्यासाठी सोपा उपाय, फक्त करा Resistance Bandच्या सहाय्याने हा व्यायाम

सकाळी कोमट पाण्यात लिंबाचा रस मिसळून पिऊ शकता. यामुळे पचनक्रिया सुरळीत राहते आणि त्वचेवरही चांगला परिणाम होतो.

सॅलडमध्ये लिंबू पिळून रिकाम्या पोटी खाऊ शकता. यामुळे तुम्हाला चव तर मिळेलच पण वजन कमी होण्यासही मदत होईल.

दररोज सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यात लिंबाचा रस मिसळून प्या. तुम्ही लिंबूपाणी मध मिसळूनही पिऊ शकता. याशिवाय काकडीच्या रसात लिंबाचा रस मिसळून प्यायल्याने वजन लवकर कमी होण्यास मदत होते.

हे वाचा - EXCLUSIVE : नवाझ शरीफ लवकरच पाकमध्ये परतणार? इम्रान खान यांना हटवण्यासाठी लष्कराची खेळी

लिंबू चरबी देखील बर्न करते

लिंबू शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकतो आणि शरीरातील अतिरिक्त चरबी जाळून टाकतो, ज्यामुळे वजन सहज कमी होते. तसेच, लिंबू स्नायूंना टोन करण्यास आणि पोटावरील चरबी कमी करण्यास मदत करतो.

(सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Health Tips, Weight loss