उन्हाळ्यातही फॅशनेबल आणि ट्रेन्डी राहायचंय?

उन्हाळ्यातही फॅशनेबल आणि ट्रेन्डी राहायचंय?

कडाक्याच्या उन्हातसुद्धा कुल आणि सुपरहिट राहायचं असेल तर बाजारात काही खास पोशाख आले आहेत.

  • Share this:

21 एप्रिल : अंगाची लाहीलाही करणाऱ्या उन्हाळ्यात फॅशनेबल आणि ट्रेन्डी कसं राहायंच? कडाक्याच्या उन्हातसुद्धा कुल आणि सुपरहिट राहायचं असेल तर बाजारात काही खास पोशाख आले आहेत.

1. तरुण मुला-मुलींसाठी बाजारात कॉटन कुर्ता आणि शर्ट उपलब्ध आहेत. एखाद्या समारंभात स्टायलिश दिसण्यासाठी मुली या कुर्त्याचा वापर करू शकतात. उन्हापासून बचाव करण्यासाठी कॉटन शर्टचा वापर होतो. तसेच बाजारातील खास समर कलेक्शनमध्ये जॉर्जेट मॅक्सी सुद्धा उपलब्ध आहे.

2. उन्हाळ्यात खास करुन कपड्यांमध्ये पीच, लेमन, स्काय ब्लू आणि ग्रे कलर लोकप्रिय असतात. पारंपरिक पोशाखामध्ये बाजारात चिकनचे ड्रेसस् आणि ओढणीसुद्धा उपलब्ध आहेत. यामुळे ट्रेण्डी आणि फॅशनबेल दिसण्यास मदत होते.

3. जर तुमचं बजेट कमी असेल आणि तुम्हाला स्टायलिश सुद्धा दिसायचं असेल तर तुम्ही स्ट्रीट मार्केटचा पर्याय निवडू शकता. उन्हाळ्यात स्टायलिश कपड्यांचं शॉपिंग करण्यासाठी हा चांगला पर्याय आहे. स्ट्रीट मार्केटमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे टॉप्स, स्कर्ट्स, मॅक्सी तुमच्या बजेटमध्ये मिळू शकतात. गरमीपासून बचाव तुम्ही स्टोल्सचा सुद्धा वापर करू शकता.

4. मुलांसाठी निरनिराळ्या प्रकारचे फॅशनेबल कपडे बाजारात आहेत. खास करून लिनिन टेंसिल फॅब्रिक कपड्यांचा उन्हाळ्यात वापर केला तर ते आरामदायी आणि फायदेशीर ठरेल. तसेच त्यामुळे तुम्ही आकर्षक आणि मॉर्डन दिसाल. स्ट्रेचेबल फॅब्रिक कपड्यांचाही वापर वाढत्या गरमीत तुम्ही करू शकता. तसंच फॉर्मल म्हणून सुद्धा त्याचा वापर होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 21, 2017 05:31 PM IST

ताज्या बातम्या