नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर : रोजच्या आहारात प्रत्येकजण भात खातो. विशेषत: दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणाच्या वेळी ताटात भात नसेल तर अनेकांना जेवण अपूर्ण वाटते. भात खाल्ल्याशिवाय अनेकांचा आहार पूर्ण होत नाही, पण तुम्हाला माहिती आहे का की, आजकाल बाजारातील तांदळामध्येही खूप हेराफेरी पाहायला मिळत आहे. त्यासाठी काही सोप्या टिप्सच्या मदतीने तुम्ही खरा आणि नकली तांदूळ ओळखू शकता.
तज्ज्ञांच्या मते, तांदूळ हा कार्बोहायड्रेट्सचा सर्वोत्तम स्त्रोत मानला जातो. भात खाल्ल्याने शरीरातील ऊर्जा पातळी वाढते. आजकाल बाजारात मिळणाऱ्या तांदळामध्ये प्लास्टिकची भेसळ करून तांदूळ विकले जात असून ते खाल्ल्याने आरोग्याला अनेक प्रकारची हानी होऊ शकते. त्यामुळे तांदूळ खरेदी करताना काही स्मार्ट उपायांनी खऱ्या आणि बनावट तांदळातील फरक ओळखता येणे गरजेचे आहे.
बासमती तांदुळ -
बाजारात तांदळाचे अनेक प्रकार उपलब्ध असले तरी सर्व प्रकारच्या तांदळांमध्ये बासमती तांदळाची मागणी सर्वाधिक असल्याने बासमती तांदळात भेसळ होण्याची शक्यताही जास्त आहे. तुम्ही अस्सल बासमती तांदूळ काही मार्गांनी ओळखू शकता. बासमती तांदूळ सुगंधी असतोच तसेच पारदर्शक आणि चमकदार असतो. तर, शिजवल्यानंतर बासमती तांदळाची लांबी दुप्पट होते आणि ती अजिबात चिकटत नाही.
तपासण्यासाठी चुना वापरू शकता -
चुन्याच्या मदतीने तुम्ही खरा आणि नकली तांदूळ सहज ओळखू शकता. यासाठी पाण्यात चुना मिसळून चांगले ढवळून घ्या. आता या द्रावणात तांदळाचे काही दाणे टाका. काही वेळाने जर तांदूळ रंग सोडू लागला तर समजून घ्या की तुमचा तांदूळ बनावट आहे. त्याच वेळी, जर रंग सोडला नाही तर तांदूळ पूर्णपणे खरा आहे.
बनावट तांदूळ -
प्लॅस्टिकचा बनलेला असल्याने तुम्हाला नकली तांदूळ सहज ओळखता येतो. नकली तांदूळ आगीत टाकल्यास प्लास्टिकचा वास येतो. त्याच बरोबर बनावट तांदूळ गरम तेलात टाकल्यावर वितळू लागतात आणि पाण्यात टाकल्यावर तरंगायला लागतात. त्याचबरोबर प्लास्टिकचा तांदूळ खराब होत नाही. तसेच बराच वेळ ठेवल्यानंतरही बनावट तांदळाचा वास येत नाही.
हे वाचा - हिवाळ्यात सांधेदुखी, संधिवाताचा त्रास टाळण्यासाठी या गोष्टींकडे वेळीच लक्ष द्या
(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.