मुंबई, 30 जून : प्रत्येकाला पावसाळ्याचा आनंद लुटायचा असतो. पावसात भिजायला आणि मजा करायला सगळ्यांनाच आवडते. या ऋतूत स्वत:ला निरोगी ठेवणे हे एक आव्हान असते. पावसाळ्यात डोळ्यांच्या समस्या वाढतात. कधी कधी डोळ्यात घाण पाणी आल्याने इन्फेक्शन आणि डोळे लाल होण्यासारख्या समस्या निर्माण होतात. मानवी डोळे सर्वात संवेदनशील आहेत, म्हणून त्यांची विशेष काळजी |घेणे आवश्यक आहे. डोळ्यांमध्ये काही समस्या असल्यास डॉक्टरांशी संपर्क साधावा. पावसाळ्यात डोळे निरोगी ठेवण्यासाठी कोणत्या टिप्सचा अवलंब करावा हे, आम्ही तज्ज्ञांकडून जाणून घेतले (Eye Care Tips for Monsoon) आहे.
तज्ज्ञ काय म्हणतात -
बजाज आय केअर सेंटर (दिल्ली) येथील नेत्रतज्ज्ञ डॉ. राजीव बजाज सांगतात की, पावसाळ्यात विषाणूजन्य आजारांमुळे डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागाचा होणारा दाह होण्याचा धोका वाढतो. सामान्य भाषेत याला आय फ्लू म्हणतात. विशेषत: जेव्हा एखाद्या भागात फ्लूचा प्रसार होत असेल तेव्हा तेथे राहणाऱ्या लोकांनी सावधगिरी बाळगली पाहिजे. याशिवाय पावसाळ्यात कॉर्नियाशी संबंधित बुरशीजन्य संसर्गाचे प्रमाणही वाढते. वातावरणातील आर्द्रता वाढल्याने संसर्ग आणि विषाणूचा धोका वाढतो. पावसाच्या भिजल्याने डोळ्यांना इजा होत नाही, पण त्यानंतर स्वच्छता राखणे, डोळे स्वच्छ पाण्याने धुवावेत.
हे वाचा -
पुरुषांच्या केसांसाठी परिणामकारक आहेत हे वीगन हेयर मास्क; घरीच असे करा तयार
डोळ्यांची काळजी कशी घ्यावी -
डॉ.राजीव बजाज यांच्या मते पावसाळ्यात स्वच्छतेची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. या ऋतूत हात धुवावेत आणि डोळ्यांना वारंवार हात लावू नये. दिवसातून दोनदा डोळे स्वच्छ पाण्याने धुवावेत. डोळ्यात काही समस्या असल्यास तातडीने नेत्रतज्ज्ञांशी संपर्क साधावा. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय डोळ्यांचा उपचार कधीही करू नये. असे केल्याने समस्या वाढण्याची शक्यता आहे. याशिवाय ज्या लोकांना डोळ्यांचा कोणताही आजार आहे, त्यांनी या ऋतूत पावसात बाहेर जाणे टाळावे किंवा बाहेर पडताना काळजी घ्यावी.
हे वाचा -
Diabetes असणाऱ्यांनी सकाळ-संध्याकाळ चावून खावी ही 2 प्रकारची पानं; दिसेल परिणाम
(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.