मुलायम ओठांसाठी खास स्क्रब

मुलायम ओठांसाठी खास स्क्रब

एक चमचा साखर घ्या, त्यात दोन चमचे लिंबाचा रस मिसळा. या मिश्रणाला आपल्या ओठांवर स्क्रब करा. याने आपल्या ओठांवरील निर्जीव त्वचा निघून जाते आणि आपल्या ओठांचा नैर्सगिक रंग परत येतो.

  • Share this:

13 आॅक्टोबर : चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी तर आपण अनेक स्क्रब वापरतो पण ओठांकडे फारसं कोणी फार लक्ष देताना दिसत नाहीत. याचा परिणाम म्हणजे ओठ सुकणे आणि निर्जीव होणे.  पण ओठांची नियमित काळजी घेतली तर ओठ नाजूक होण्यास मदत होते. यासाठी खालील काही स्क्रब्स खास तुमच्या ओठांसाठी-

1) साखर आणि लिंबाचा रस - एक चमचा साखर घ्या, त्यात दोन चमचे लिंबाचा रस मिसळा. या मिश्रणाला आपल्या ओठांवर स्क्रब करा. याने आपल्या ओठांवरील निर्जीव त्वचा निघून जाते आणि आपल्या ओठांचा नैर्सगिक रंग परत येतो.

2) कोरफड आणि लिंबाची साल - एक चमचा लिंबाच्या सालीची पावडर घ्या आणि त्यात एक छोटा चमचा कोरफड जेल मिस्क करा. या स्क्रबने ओठांची त्वचा मऊ राहते.

3) बदाम आणि मध - सहा-सात बदाम घ्या त्यांना चुरा करा, त्यात दोन चमचे मध टाकून त्याची पेस्ट करा. ही पेस्ट आपल्या ओठांना लावा.  याने ओठांवरील सुकलेली त्वचा निघून जाते.

4) तूप आणि साखर - एक छोटा चमचाभर तूप घ्या, त्यात एक चमचा साखर टाका. याच मिश्रण ओठांना लावल्याने ओठांची त्वचा मुलायम राहते.

5) भोपळ्याच्या बिया आणि दही - दोन छोटे चमचे भोपळ्याच्या बिया बारीक वाटून घ्या. त्यात एक छोटा चमचा दही मिस्क करा आणि ओठांना लावा. आपल्या लहानपणाची ओठांची चमक परत येईल.

6) बेसन आणि हळद - एक चमचाभर बेसन घ्या त्यात एक चमचा कच्च्या हळदीची पेस्ट टाका आणि त्याचं ओलं मिश्रण करून ओठांना लावा. त्याने ओठ कोमल आणि गुलाबी होतील.

First published: October 13, 2017, 5:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading