शरीरातील रक्तवाहिन्या निरोगी राखणे आवश्यक आहे, त्यासाठी लक्षात ठेवा या 7 गोष्टी

शरीरातील रक्तवाहिन्या निरोगी राखणे आवश्यक आहे, त्यासाठी लक्षात ठेवा या 7 गोष्टी

  • Last Updated: Jul 9, 2020 05:41 PM IST
  • Share this:

आपण सर्वजण शरीरातील अवयवांच्या आरोग्याविषयी बोलत असतो, पण शरीरातील रक्तवाहिन्यांना कसे निरोगी ठेवावे याविषयी क्वचितच बोलले जाते. जोपर्यंत काही व्याधी होत नाही तोपर्यंत रक्तवाहिन्यांचे महत्त्व अनेक जणांना जाणवतही नाही. जेव्हा रक्तवाहिन्या कमकुवत होतात तेव्हा उत्तम आरोग्य राखणं कठीण होतं. शरीरातील अवयवांकडून रक्तवाहिन्या रक्त हृदयाकडे नेतात, तर धमण्या हृदयाकडून अवयवांना रक्त पुरवठा करत असतात. चला तर जाणून घेऊ आपल्या रक्तवाहिन्यांना निरोगी कसे ठेवायचे.

तंतुमय पदार्थ अधिक खावे.

तंतुमय पदार्थ पचनसंस्थेचे कार्य योग्य प्रकारे सुरू ठेवणारे पोषक तत्व आहेत. पचन चांगले नसेल तर पचन क्रियेवर ताण पडतो, त्यामुळे रक्त प्रवाहात अडथळे निर्माण होतात परिणामी नसांना नुकसान होण्याचा संभाव अधिक असतो. ओट्स, ब्राऊन राईस, हिरव्या पालेभाज्या, ब्रोकोली, एवोकाडो, चिया, डाळी यासारख्या तंतुमय पदार्थ पदार्थांचा आहारात समावेश असावा.

क आणि ई जीवनसत्वांचे सेवन

तंतुमय पदार्थांच्या व्यतिरिक्त असे अनेक पदार्थ आहेत ज्याच्या आहारातील समावेशाने आपण नसांना निरोगी राखू शकतो. ब्रोकोली, स्ट्राबेरी, कोबी, अननस, संत्री या सारख्या क जीवनसत्व असलेल्या पदार्थांच्या खाण्याने नसांच्या स्वास्थ्या साठी फायदा होतो.

myUpchar.com च्या डॉ. लक्ष्मीदत्त शुक्ला चे म्हणणे आहे कि क जीवनसत्व शरीरातीन रक्तवाहिन्यांना सशक्त करतात. जीवनसत्व ई भरपूर प्रमाणात असलेल्या खाद्य पदार्थांमध्ये सुका मेवा, एवोकाडो, ऑलिव ऑइल, भोपळा, आंबे, यांचा समावेश होतो.

वजन वाढवणाऱ्या खाद्य पदार्थांना टाळायला हवे

पोषक आहाराने योग्य वजन राखण्यात मदत होते. जर व्यक्तीचे वजन योग्य असेल तर रक्तवाहिन्यांवर पडणारा ताण कमी होतो. जेवढे वजन जास्त तेव्हढा जास्त कामाचा ताण रक्तवाहिन्यांवर पडत असतो. अधिक वजनाच्या दुष्परिणाम सहन करण्यापेक्षा, समतोल आणि पोषकतत्वांनी युक्त आहार घेवून आपल्या रक्तवाहिन्यांचे आरोग्य राखायला हवे त्यामुळे त्या सक्षमतेने कार्य करू शकतील

शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित ठेवणे

रक्तवाहिन्या निरोगी राहण्यासाठी पाण्याची अत्यंत आवश्यकता आहे. शरीरातील पाण्याचे प्रमाण जितके चांगले तितके रक्त पातळ राहण्यास मदत होते. त्यामुळे ते योग्य प्रकारे प्रवाहित राहते. जर रक्त गाढ असेल तर आपल्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाले आहे, त्यामुळे रक्तवाहिन्यांना हानी होते.

सक्रीय रहा

निष्क्रिय जीवनशैली वेरीकोज वेन्सचे मुख्य कारण आहे. संगणकावर सतत 8-9 तास काम करण्यासाठी बसून राहिल्याने ही समस्या निर्माण होते. म्हणून तासंतास बसून काम करण्याच्या ऐवजी अधूनमधून उठून थोडे चालायला हवे. याचा अर्थ असा नाही कि दिवसभर उभे राहावे, त्यामुळे पण रक्तवाहिन्यांवर ताण येतो. बसणे आणि उभे राहणे यात समतोल असायला हवा. रोज नियमित जितके पायी चालणे शक्य असेल तेव्हढे पायी चालायला हवे.

धूम्रपान करू नका

तंबाखुच्या धुरातील रसायने रक्ताला गाढ करू शकतात . त्यातील निकोटीन रक्तवाहिन्यांना कठीण आणि संकुचित करतात.

योग्य उपचार घ्या

थकवा जडपणा शरीरावर सूज अशी लक्षणे दिसली तर दुर्लक्ष करू नये. डॉक्टरांना दाखवा त्यामुळे काही आजार असल्यास योग्यवेळी उपचार करणे शक्य होईल. myUpchar.com शी संबधित ऐम्सचे डॉ. नबी वली म्हणतात काही आजार, पोषणाची कमतरता, किंवा योग्य जीवनशैलीचा अभाव यामुळे रक्तवाहिन्या कमकुवत होऊ शकतात. तेव्हा त्याच्या कारणांचा योग्य उपचार केल्याने ही समस्या ठीक होऊ शकते. त्यासाठी औषधोपचार आणि अन्य उपचार पद्धती उपलब्ध आहेत.

अधिक माहिती साठी वाचा आमचा लेख  - मज्जातंतूचा अशक्तपणा 

न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.

अस्वीकरण: आरोग्य विषयक समस्या आणि त्याविषयीचे उपचार याची माहिती सर्वाना सहज सुलभतेने कुठल्याही मोबदल्याशिवाय उपलब्ध व्हावी हा या लेखांचा हेतू आहे. या लेखनामध्ये प्रकाशित माहिती म्हणजे तज्ञ अधिकृत डॉक्टरांच्या तपासणी, रोगनिदान, उपचार आणि वैद्यकीय सेवेचा पर्याय नाही. जर तुमची मुले, कुटुंबातील सदस्य, नातेवाईक यापैकी कुणीही आजारी असतील, त्यांना याठिकाणी वर्णन केलेली काही लक्षणे दिसत असतील तर, कृपया तत्काळ आपल्या डॉक्टरांना जाऊन भेटा. डॉक्टरांच्या मार्गदर्शना शिवाय स्वतः, तुमची मुले, कुटुंब सदस्य, किंवा अन्य कुणावरही वैद्यकीय उपचार करू नका किंवा औषधे देवू नका. myUpchar आणि न्यूज18 यावर प्रकाशित माहिती, त्या माहितीच्या अचूकतेवर, या माहितीच्या परिपूर्णते वर विश्वास ठेवल्याने, तुम्हाला कुठलीही हानी झाली किंवा काही नुकसान झाले तर, त्याला myUpchar आणि न्यूज18 जबाबदार असणार नाही, हे तुम्हाला मान्य आहे, आणि त्याच्याशी तुम्ही सहमत आहात.

First published: July 8, 2020, 6:42 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading