मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

सुखी, आनंदी नात्यांची गुरुकिल्ली कोणती? नाती टिकवण्यासाठी जाणून घ्या काही टिप्स

सुखी, आनंदी नात्यांची गुरुकिल्ली कोणती? नाती टिकवण्यासाठी जाणून घ्या काही टिप्स

सुखी, आनंदी नातं हवं असेल, तर जोडीदारासोबत कसं वागलं पाहिजे, याबाबत काही टिप्स जाणून घेऊ या.

सुखी, आनंदी नातं हवं असेल, तर जोडीदारासोबत कसं वागलं पाहिजे, याबाबत काही टिप्स जाणून घेऊ या.

सुखी, आनंदी नातं हवं असेल, तर जोडीदारासोबत कसं वागलं पाहिजे, याबाबत काही टिप्स जाणून घेऊ या.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • New Delhi, India

नातं जोडणं जितकं सोपं, तितकंच ते सांभाळणं अवघड असतं. आई-वडील किंवा भावंडांसोबतची नाती जपताना ते थोडं सोपं वाटू शकतं; मात्र एखादं नवीन नातं जोडल्यावर आयुष्यभरासाठी ते सांभाळणं हे मोठं आव्हान असतं. विशेषतः जोडीदारासोबत नातं निभावताना अनेक गोष्टींची खबरदारी घ्यावी लागते. सुखी, आनंदी नातं हवं असेल, तर जोडीदारासोबत कसं वागलं पाहिजे, याबाबत काही टिप्स जाणून घेऊ या. 'आज तक'ने याबाबत माहिती देणारं वृत्त दिलं आहे.

सुखी आयुष्यासाठी नात्यांची वीण घट्ट असणं गरजेचं असतं. नाती म्हटली, की भांडण-तंटे, रुसवे येतातच; मात्र यापलीकडे जाऊन नातं घट्ट करण्यासाठी त्याला वेळ द्यावा लागतो. म्हणजे आयुष्य सोपं होऊन जातं. आपल्या माणसांचं सोबत असणं आयुष्याला आधार देतं. आई-वडील, भावंडं असोत किंवा जोडीदार, नाती आयुष्याला आधारही देतात आणि आकारही देतात.

नात्यांची वीण घट्ट करण्यासाठी वेळ देणं महत्त्वाचं असतं. ऑफिस, काम, घर या सगळ्यामध्ये एकमेकांना वेळ दिला जात नाही. त्यामुळे नात्यांवर त्याचा परीणाम होतो. काही वेळा नाती तुटूही शकतात. त्यामुळेच एकमेकांसोबत चांगला वेळ घालवला पाहिजे.

जीवनात हास्य अनेक अवघड गोष्टी साध्य करतं. यामुळे ताण कमी होतो आणि अर्थातच आयुष्य निखळ होतं. गंभीर आणि उदास चेहऱ्यानं गोष्टी केल्यानं त्या साध्य होतीलच असं नाही. उलट आनंदी, प्रसन्न चेहऱ्यानं अनेक माणसांना जोडता येतं. एखाद्या वेळी जोडीदाराचा मूड चांगला करण्यासाठी थोडी मजामस्ती करणं नात्यासाठी फायद्याचं ठरतं.

निंदकाचं घर शेजारी असावं असं म्हणतात; पण सतत निंदा करणाऱ्यांपासून दूर राहणंच चांगलं. कारण सतत दोष ऐकले, की नकारात्मक भावना प्रबळ होऊ शकते. केवळ जोडीदाराकडूनच नाही, तर आपल्या आजूबाजूच्या व्यक्तीही आपलं कौतुक करतील अशा व्यक्तींच्या सहवासात राहा. दोष सांगताना ते सुधारण्यासाठी आहेत, की केवळ उणिवा दाखवण्यासाठी सांगितलं जात आहे, हे लक्षात घ्या. ज्या व्यक्ती चांगल्या हेतूनं दोष सांगतात आणि कौतुकही करतात त्या व्यक्तींच्या सहवासात राहा.

हेही वाचा - Parenting Tips: रात्रीच्या वेळी तुमची मुलं तासनतास इंटरनेटवर काय पाहतात? वेळीच द्या लक्ष, नाहीतर...

नकारात्मक विचार पसरवणाऱ्यांपासून दूर राहा. काही व्यक्ती इतरांच्या आयुष्यात विष कालवण्याचा प्रयत्न करत असतात. अशा व्यक्तींमुळे आपल्या आयुष्याचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे त्यांना तुमच्या आयुष्यात स्थान देऊ नका.

प्रशंसा करणं प्रगतीसाठी पूरक असतं. छोट्या छोट्या गोष्टींमध्येही समोरच्याचं कौतुक केलं, तर चांगल्या गोष्टी वृद्धिंगत होतात. योग्य वेळी प्रशंसा केल्यानंही अनेकदा बळ मिळतं. त्यामुळे जोडीदाराचं कौतुक आवर्जून करावं. त्यानं समोरच्याच्या आपल्याबद्दलच्या भावना कळतात, पुढे जाण्याचं बळही मिळतं.

नात्यात सगळंच एकदम मस्त नसतं. काही वेळेला एकमेकांच्या काही गोष्टी आवडत नाहीत; मात्र त्या वेळच्या वेळी एकमेकांना सांगितल्या नाही, तर मनात राहून जातात आणि त्यातून एकमेकांविषयीचा राग वाढू लागतो. त्यापेक्षा त्या त्या वेळी सांगून टाकल्याने किंवा आवश्यक असल्यास वेळच्या वेळी नाही म्हणण्यानं मनातला कडवटपणा वाढणार नाही.

नाती सांभाळणं ही तारेवरची कसरत असते. कधी तुझं तर कधी माझं, हा तोल ज्याला सांभाळता येतो, त्यालाच नात्यांचं गणित उलगडतं. सहवासानं अनेक गोष्टी सोप्या होतात; मात्र तरीही सुखी नात्यांसाठी काही गोष्टी जाणीवपूवर्क कराव्या लागतात.

First published:

Tags: Relationship tips