फक्त या 4 पद्धतींनी ब्रेकअपनंतरही एक्स सोबत ठेवता येऊ शकते मैत्री!

मनात कोणत्याही प्रकारचा द्वेष न बाळगता ब्रेकअपनंतरही एक्स सोबत अशा प्रकारे ठेवा मैत्री...

News18 Lokmat | Updated On: Jun 20, 2019 07:08 AM IST

फक्त या 4 पद्धतींनी ब्रेकअपनंतरही एक्स सोबत ठेवता येऊ शकते मैत्री!

जेव्हा ब्रेकअप होतो तेव्हा तुम्ही काय करता? सर्वसाधारणपणे ब्रेकअपनंतर मैत्रीदेखील तुटते. ब्रेकअपनंतर लगेच नकळतपणे तुम्ही तुमच्या एक्सचा द्वेष करु लागता. मात्र, ब्रेकअपनंतरही एक्स सोबत मैत्री कायम ठेवता येऊ शकते असा काही लोकांचा विश्वास आहे. त्यासाठी दोघांकडून समजूतदारपणा अपेक्षीत आहे.

भरपूर वादविवादानंतर ब्रेकअप झाला असल्यास गैरसमज दूर होण्यास वेळ लागतो. वादविवाद लवकर मिटत नाहीत. पण, ब्रेकअप सहमतीने झाला असल्यास पुन्हा मैत्री होऊ शकते.

ब्रेकअपनंतरही एक्स सोबत तुम्हाला मैत्री ठेवायची आहे पण, असं करण्यास मुलगा नकार देत असल्यास या 4 गोष्टी ठेवा लक्षात...

Loading...

संवाद साधताना प्रियकर जर तुमच्याशी मोठ्या आवाजात बोलत असेल किंवा सतत रागवत असल्यास त्याला स्पेस द्यावी. थोड्या कालावधीनंतर गोष्टी सुधरु शकतील.

ब्रेकअपमुळे होणाऱ्या गैरसमजातून मुलगे अनेक भावना मनात ठेवतात. अशाप्रसंगी, त्याच्या भावना व्यक्त करण्याची मोकळीक द्या. त्याची बाजू मांडण्यासाठी संधी द्या. संवादातून द्वेष कमी होईल.

ब्रेकअपची कारणे विनम्रतेने पटवून देण्याचा प्रयत्न करावा. पण, यामध्ये स्वत:ला दोषी न मानता मुद्दे समजून देण्याचा प्रयत्न करा.

ब्रेकअपनंतरही एक्ससोबत पुन्हा संवाद साधता आणि तरीही तुमचा एक्स माफी द्यायला किंवा मैत्री करायला तयार नसेल तर, तुम्ही घेतलेल्या निर्णयासोबत मुव्ह ऑन करा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 20, 2019 07:08 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...