मुंबई, 27 मे : प्रत्येकालाच उंच व्हावसं वाटतं. सर्वसाधारणपणे 20-25 वयापर्यंतच उंची वाढते. तोपर्यंतच तुम्ही काळजी घेतलीत तर तुमची उंची व्यवस्थित वाढू शकते. शारीरिक विकासाकडे व्यवस्थित लक्ष द्यायला हवं.
उंची वाढण्यासाठी संतुलित आहाराची गरज असते. पोषणयुक्त आहार खूप महत्त्वाचा असतो. 25 वर्षानंतर उंची वाढणं बंद होतं. आता उंची वाढण्यासाठी काय करायला हवं ते पाहा-
टेन्शन आलंय? या 10 सोप्या गोष्टी करून पाहा
तुम्ही तुमच्या आहारात काही पदार्थांचा समावेश करायला हवंच. त्यात अंडं, मासे हवेत. ज्यात ई व्हिटॅमिन असतं ते मासे खावेत. तसंच हिरव्या भाज्या, बिन्स, सुका मेवा, फळं, दूध यांचं सेवन नियमित हवं. तुमच्या शरीरात आयर्न, मिनरल्स आणि पोषक द्रव्यं जायलाच हवीत. रोज 6 ते 8 ग्लास पाणी प्यायला हवं. शरीरातले नको ते पदार्थ त्यानं बाहेर फेकले जातात.
केळं 'या' वेळेलाच खावं, नाहीतर होईल आरोग्याचं नुकसान
आहाराबरोबर व्यायामही महत्त्वाचा आहे. जास्त करून स्ट्रेचिंग एक्झरसाइझ करा. उंचीसाठी ते चांगले असतात. दोरीच्या उड्या, उंच उडी, दोरीला लटकणं हे व्यायाम नियमित करा. हे सर्व 25 वर्षांच्या आधी केलेत तरच फायदा होऊ शकतो.
रिझल्टच्या आदल्या दिवशी 'असे' राहा टेन्शन फ्री
शाळांशाळांमध्ये असे व्यायाम घेतले जातात. व्यायामाचा तासच असतो. त्याचा फायदा मुलांना होतोच. उंची ही बरेचदा अनुवंशिकतेवरही अवलंबून असते. आई-वडील उंच असले तर मुलं उंच होतात. तरीही आहार आणि व्यायामावर फोकस केलंत तर नक्कीच फायदा होऊ शकतो.
VIDEO पार्थ पवार यांच्या पराभवाबद्दल पहिल्यांदाच बोलल्या सुप्रिया सुळे