फक्त बदाम खाणं पुरेसं नाही; स्मरणशक्ती वाढण्यासाठी करा सोपे 6 उपाय

फक्त बदाम खाणं पुरेसं नाही; स्मरणशक्ती वाढण्यासाठी करा सोपे 6 उपाय

स्मरणशक्ती (memory) वाढवण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत, हे सर्व उपाय करून पाहा.

  • Last Updated: Nov 20, 2020 09:20 PM IST
  • Share this:

बरेच लोक बर्‍याच गोष्टी आणि कामं लगेच विसरतात कारण त्यांची स्मरणशक्ती कमकुवत असते. आजकाल कमकुवत स्मृती ही एक गंभीर समस्या नाही, कारण आजकाल व्यस्त जीवनशैलीत ताणतणावाचा मेंदूवर परिणाम होतो. त्यामुळे तुम्हालाही गंभीर स्वरूपात नाही पण साधा विसराळूपणा असेल तर घरच्या घरी उपाय करण्यास हरकत नाही.

आता स्मरणशक्ती वाढवायची म्हणजे सर्वात आधी नाव येतं ते बदामाचं. सर्वसामान्यपणे स्मरणशक्ती तल्लग करण्यासाठी बदाम खाल्ले जातात. मात्र फक्त बदामच नाही तर असे इतर काही पदार्थ आणि वनऔषधी आहेत. ज्यामुळे तुमची स्मरणशक्ती वाढू शकते. चला तर स्मरणशक्ती वाढण्यासाठी सहजसोपे असे घरगुती उपाय जाणून घेऊयात.

सफरचंदाचे सेवन केल्यास मानसिक आजार कमी होतील

सफरचंदांमध्ये कर्साटिन आढळतं जे एक विशेष प्रकारचं अँटिऑक्सिडंट आहे. हे मेंदूच्या पेशी खराब होण्यापासून वाचवतं. जेव्हा मेंदूच्या पेशी खराब होतात तेव्हा यामुळे अनेक गंभीर मानसिक समस्या उद्भवू शकतात. सफरचंदांचं नियमित सेवन केल्यास मेंदूच्या पेशी निरोगी राहतात. ज्यामुळे पार्किन्सन, अल्झायमरसारख्या आजारांना प्रतिबंध होतो.

शंखपुष्पी आहे स्मृती वाढवणारी उत्तम औषधी वनस्पती

myupchar.com चे डॉ. लक्ष्मीदत्त शुक्ला यांनी सांगितलं की, शंखपुष्पीचा वापर ताणतणावसारख्या समस्या दूर करतं. त्यात भरपूर अँटी-ऑक्सिडंट असतात. ज्यामुळे मेंदूचं आरोग्य सुधारतं. शंखपुष्पीचं सेवन करून निद्रानाश आणि चिंता यासारख्या समस्या नाहीशा होतात.

ब्राह्मी स्मृती वाढवण्यासाठी आहे आयुर्वेदिक औषध

स्मृती आणि मानसिक क्षमता वाढवण्यासाठी ब्राह्मी हे एक चांगले आयुर्वेदिक औषध आहे. ब्राह्मीमध्ये सिटगॅमेस्टेरॉल आणि बॅकोसाइडसारखे घटक असतात, जे मेंदूचं कार्य वाढवण्यात मदत करतात. बरेच लोक तणाव कमी करण्यासाठी ब्राह्मी तेलानं मालिश करतात. ब्राह्मी तेल केसांना दाट आणि मजबूतदेखील बनवतं.

माशांच्या तेलामुळे देखील मेमरी वाढेल

फिश ऑइल म्हणजेच माशांपासून तयार होणारं तेलदेखील स्मृती वाढवण्यात मदत करतं. फिश ऑइलमध्ये ओमेगा -3 फॅटी अॅसिड, इकोसापेंटेनिक अॅसिड आणि डोकोहेक्सॅनोइक अॅसिड असतं. या सर्व गोष्टी मानसिक ताणतणाव आणि चिंता कमी करण्यास मदत करतात. फिश ऑइल वृद्धांची स्मृती देखील सुधारू शकतं.

प्राणायामाने देखील मेंदू सुदृढ होतो

myupchar.com च्या डॉ. लक्ष्मीदत्त शुक्ला यांनी सांगितलं की, प्राणायाम केल्यानं शरीरावरील ताण कमी होतो. शरीरात रक्ताभिसरण व्यवस्थित राहतं, ज्यामुळे मेंदूच्या स्नायूंना मजबुती मिळते. स्मरणशक्ती चांगली होते आणि विसरण्याच्या समस्येवर मात केली जाते. शिवाय शरीराच्या इतर समस्यादेखील दूर होतात.

पुरेशा झोपेमुळे स्मरणशक्ती देखील वाढेल

केवळ मेंदूसाठीच नव्हे तर संपूर्ण शरीराच्या आरोग्यासाठी देखील झोपेची खूप आवश्यकता असते. परिपूर्ण झोपेमुळे शरीराची झीज आणि कमतरता भरून निघते. व्यस्त जीवनशैलीमुळे बर्‍याच लोकांना पुरेशी झोप घेता येत नाही यामुळे मानसिक आरोग्यावरही त्याचा वाईट परिणाम होतो. यामुळे त्यांच्या स्मरणशक्तीवर देखील परिणाम होतो, म्हणून भरपूर झोपे घ्या आणि निरोगी व्हा.

अधिक माहितीसाठी वाचा आमचा लेख - कमी स्मरणशक्ती: लक्षणे, कारणे...

न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.

अस्वीकरण: आरोग्य विषयक समस्या आणि त्याविषयीचे उपचार याची माहिती सर्वाना सहज सुलभतेने कुठल्याही मोबदल्याशिवाय उपलब्ध व्हावी हा या लेखांचा हेतू आहे. या लेखनामध्ये प्रकाशित माहिती म्हणजे तज्ञ अधिकृत डॉक्टरांच्या तपासणी, रोगनिदान, उपचार आणि वैद्यकीय सेवेचा पर्याय नाही. जर तुमची मुले, कुटुंबातील सदस्य, नातेवाईक यापैकी कुणीही आजारी असतील, त्यांना याठिकाणी वर्णन केलेली काही लक्षणे दिसत असतील तर, कृपया तत्काळ आपल्या डॉक्टरांना जाऊन भेटा. डॉक्टरांच्या मार्गदर्शना शिवाय स्वतः, तुमची मुले, कुटुंब सदस्य, किंवा अन्य कुणावरही वैद्यकीय उपचार करू नका किंवा औषधे देवू नका. myUpchar आणि न्यूज18 यावर प्रकाशित माहिती, त्या माहितीच्या अचूकतेवर, या माहितीच्या परिपूर्णते वर विश्वास ठेवल्याने, तुम्हाला कुठलीही हानी झाली किंवा काही नुकसान झाले तर, त्याला myUpchar आणि न्यूज18 जबाबदार असणार नाही, हे तुम्हाला मान्य आहे, आणि त्याच्याशी तुम्ही सहमत आहात.

First published: November 20, 2020, 9:20 PM IST

ताज्या बातम्या