कोरोनाने हिरावलं आई-बाबांचं छत्र; हजारो अनाथ बालकांना तुम्ही कशी करू शकता मदत?

कोरोनाने हिरावलं आई-बाबांचं छत्र; हजारो अनाथ बालकांना तुम्ही कशी करू शकता मदत?

कोविडमुळे पालक गमावल्या मुलांना (Child Orphaned during corona pandemic) मदत करण्यासाठी सध्या सोशल मीडियावर मेसेज फिरत आहेत.

  • Share this:

पंकज रामेंदू/मुंबई, 11 मे : कोरोना विषाणूच्या (Corona) संसर्गामुळे देशात अनेक ठिकाणी अनेक कुटुंबं उद्ध्वस्त झाली आहेत. अशी अनेक मुलं आहेत, ज्यांनी यामहासाथीमुळे आपले आई-वडील (Child Orphaned during corona pandemic) गमावले आहेत. ऑक्सिजन, औषधं आणि हॉस्पिटल बेड्स आदींच्या उपलब्धतेसाठी सोशल मीडियावरून आवाहन केलं जात आहे. तसंच त्यांच्या उपलब्धतेची माहितीही शेअर केली जात आहे. तशाच पद्धतीने काही दिवसांपूर्वीपासून सोशल मीडियावर एक संदेश व्हायरल झाला आहे -'तीन दिवस आणि सहा महिने अशा वयाच्या दोन मुलींनी कोविडमुळे आपले आई-वडील गमावले आहेत. त्या मुलींना मदत करा, जेणेकरून त्यांना नवं जीवन मिळू शकेल. हामेसेज फॉरवर्ड करावा.'  व्हॉट्सअॅपवरून अशा प्रकारचे मेसेजेस फॉरवर्ड करणाऱ्या व्यक्ती आपल्या संवेदनशीलपणाचं दर्शन घडवत आहेत. पण अशा तऱ्हेने मूल घेणं (Child adoption) किंवा देणं बेकायदा आहे. त्यातून संबंधित मुलांचं आयुष्य धोक्यातही येऊ शकतं. मुलांच्या तस्करीला चालना मिळू शकते.

मूल दत्तक (Adoption) घ्यायचं असेल, तर एक कायदेशीर प्रक्रिया असते. जेव्हा मुलाच्या देखभालीसाठी अन्य कोणताही पर्याय नसतो, तेव्हाच त्याला दत्तक देण्याची प्रक्रिया केली जाते, असं 'युनिसेफ-भारत' च्या बाल संरक्षण विशेषज्ज्ञ तनिष्ठा दत्ता यांनी सांगितलं.

टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, बालकल्याण समितीचे अध्यक्ष विजय डोईफोडे म्हणतात, की दत्ता यांची भीती निराधार नाही. तीन दिन आणि सहा महिने अशा वयाच्या दोन मुलींचा मेसेज पाहण्यात आला, तेव्हा त्यांना वयाची शंका वाटली. कारण त्या सख्ख्या बहिणी असतील, तर त्यांच्यात एवढं कमी अंतर असू शकणार नाही. तसंच, मेसेजमध्ये दिलेल्या नंबरवर त्यांनी कॉल केला. मात्र तो कोणी उचललाच नाही.

हे वाचा - भारतात दिसतंय त्यापेक्षा कोरोनाचं वास्तव वेगळंच? WHO नेसुद्धा व्यक्त केली चिंता

बालकल्याण समितीचे माजी अध्यक्ष आणि बंगळुरू चाइल्डलाइनचे नोडल डायरेक्टर वसुदेव शर्मा म्हणतात, 'लोकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवून काही पाऊल उचललं तर ते मानवाधिकारांच्या उल्लंघनाच्या प्रकरणात अडकू शकतात. बाल सुरक्षा आणि संरक्षण अधिनियम 2015 नुसार, अशा प्रकारचे प्रस्ताव बेकायदा पद्धतीने स्वीकारणं आणि घेणं दोन्हीही बेकायदा आहे. त्यासाठी एक ते पाच वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते.'  कायदेशीर प्रक्रिया न करता बालकाला दत्तक घेतलं गेलं, तर बालकाला दत्तक घेणाऱ्या पालकांपासून वेगळं केलं जाऊ शकतं. तसंच, त्या पालकांना बालकांच्या तस्करी प्रकरणात अटकही होऊ शकते.  योग्य पद्धत कोणा दाम्पत्याला मूल दत्तक घ्यायचं असेल किंवा कायदेशीर पद्धतीने कोणत्या बाळाला मदत करायची असेल, तर चाइल्डलाइनवर 1098 या क्रमांकावर फोन करून अनाथ किंवा कुटुंबापासून दुरावलेल्या मुलाबद्दल माहिती द्यायला हवी. बालकांना दत्तक घेण्यासंदर्भात काम करणाऱ्या जवळच्या एखाद्या अधिकृत संस्थेशीही संपर्क साधता येऊ शकतो.

हे वाचा - मदतीसाठी मन मोठं असावं लागतं; सर्वसामान्य आचारी 250 कोविड रुग्णांना पाठवतोय जेवण

या लिंकवर क्लिक करून महिला-बालकल्याण मंत्रालयाच्या सेंट्रल अडॉप्शनरिसोर्स रिसोर्स ऑथोरिटी (CARA) या यंत्रणेच्या पेजवर जाता येईल. तिथे याबद्दलची सविस्तर माहिती मिळू शकेल. तिथं दिलेली प्रक्रिया पाहून इच्छुक पालक मुलांना दत्तक घेऊ शकतात. अनाथ बालकांसाठी बालआश्रयगृह हा चांगला पर्याय असू शकतो,असं मानलं जातं. काही बालआश्रयगृहं चांगलं काम करतातही पण बरीचशी बालआश्रयगृहं तिथल्या मुलांना दत्तक देण्याची सुविधा उपलब्ध ठेवत नाहीत. त्या मुलांना ती स्वतःच्या पायावर उभं राहेपर्यंत सांभाळतात. पण त्यामुळे इच्छुक दाम्पत्यांनाही तिथल्या मुलांना दत्तक घेता येत नाही. कोविड कालावधीत अशा बालआश्रयगृहांचे विचित्र हाल झाले आहेत. लाखो अनाथ बालकं आई-वडिलांशिवाय आयुष्य कंठत आहेत. तसंच हजारो पालक बालकांना दत्तक घेऊ इच्छितात. त्यामुळे दत्तक घेण्याच्या प्रक्रियेत सुधारणा करण्याची गरज अनेकांकडून व्यक्त होत आहे.

First published: May 11, 2021, 9:43 PM IST

ताज्या बातम्या