मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /घरच्या घरी Hair colouring करणं कठीण वाटतंय? हेअर कलर खरेदीपासून लावण्यापर्यंत सोप्या टिप्स

घरच्या घरी Hair colouring करणं कठीण वाटतंय? हेअर कलर खरेदीपासून लावण्यापर्यंत सोप्या टिप्स

लांबसडक केसं महिलांच्या सौंदर्यात भर घालतात.

लांबसडक केसं महिलांच्या सौंदर्यात भर घालतात.

घरच्या घरी केस रंगवताना बरेच प्रश्न मनात येतात, अशाच काही प्रश्नांची उत्तरं.

    मुंबई, 14 सप्टेंबर : पुरुष असो वा स्त्री, दोघांचंही व्यक्तिमत्त्व खुलवण्यात केसांचं (Hair) योगदान मोलाचं असतं. विशेषतः स्त्रियांच्या बाबतीत सुंदर केस (Beautiful Hairs) हे त्यांचं सौंदर्य (Beauty) खुलवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे स्त्रियांसाठी केस हा अगदी जिव्हाळ्याचा विषय असतो. पूर्वीच्या काळी काळेभोर, घनदाट, लांब केस हा स्त्रीच्या सौंदर्याचा मापदंड होता; पण कालानुरूप त्यात बदल झाला. आता आधुनिक काळात स्त्रिया आपल्या व्यक्तिमत्वाला शोभतील असे वेगवेगळ्या प्रकारचे हेअरकट (Hair Cut) करतात. केसांना वेगवेगळे रंग देण्याचीही (Hair Color) फॅशन आली आहे. सध्या सणासुदीचा काळ (Festive Season) असला तरी कोरोना साथीमुळे स्त्रिया घरीच मेकअप करणं, तसंच केस रंगवण्याला प्राधान्य देत आहेत; मात्र अनेक स्त्रियांना केस रंगवणं अवघड वाटतं.

    कारण याबाबत काही गैरसमज आहेत. मात्र घरी केसांना रंग देणं अतिशय सोपं असल्याचं सूर्या ब्राझीलच्या (Surya Brasil) संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी क्लेलिया सेसिलिया अँजेलॉन (Clelia Cecilia Angelon) सांगतात. इंडियन एक्स्प्रेसने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

    अँजेलॉन यांच्या मते, केसांना योग्य रंग दिला तर ते फॅशन स्टेटमेंट (Fashion Statement) बनू शकतं आणि हे घरच्या घरी करणं शक्य आहे. यात काहीही अवघड नाही.

    रेडी टू युझ हेअर कलर

    आजकाल बाजारात रेडी टू युझ (Ready to use) प्रकारचे केसांचे रंग उपलब्ध आहेत. यात कोणत्याही प्रकारचं मिश्रण तयार करण्याची किंवा बाहेरचा एखादा पदार्थ घालण्याची गरज नसते. त्यामुळे काहीही चुकण्याची किंवा त्यामुळे काही दुष्परिणाम होण्याची भीती नसते. नैसर्गिक मेंदीयुक्त रंग असल्याने अगदी निर्धास्तपणे ते वापरता येतात. याचं प्रमाण किंवा त्यातले घटक याबाबत काळजी करण्याचं कारण नसतं. यात योग्य प्रमाणात सर्व घटक घातलेले असतात. त्यामुळे केसांसाठी आणि डोक्याच्या त्वचेसाठी कोणता रंग चांगला असतो याची माहिती केवळ सलूनमधल्या (Salon) व्यक्तींनाच असते असं गृहीत धरण्याचं कारण नाही.

    हेअर कलर विकत घेताना काय पाहाल?

    आजकाल रंगाच्या पाकिटावर सर्व माहिती दिलेली असते. रंग विकत घेतो, तेव्हा आपण त्यात कोणते घटक आहेत, रासायनिक (Chemicals) किंवा विषारी घटक (Harmful Ingredients) आहेत का, याची पडताळणी करू शकतो. आजकाल बहुतांश रंग आयुर्वेदीय औषधी वनस्पती आणि वनस्पतींचे अर्क (Plants extracts) अशा नैसर्गिक घटकांपासून तयार केलेले असतात.

    हे वाचा - केळीच्या पानावर जेवण का करावं? जाणून घ्या आरोग्यदायी फायदे

    अनेकदा सलूनमध्ये अमोनिया किंवा इथॅनोलामाइन, डायथेनोलामाइन आणि ट्रायथेनोलामाइन यांसारख्या घटकांचा समावेश असलेले रंग वापरले जातात. स्वतः रंग विकत घेताना आपण अमिनोमिथाइल प्रोपेनॉलसारख्या सेंद्रिय संयुगांचा समावेश असलेले नैसर्गिक घटकयुक्त रंग निवडू शकतो. त्यामुळे कोणतंही नुकसान किंवा दुष्परिणाम होत नाहीत, असं अँजेलॉन यांनी सांगितलं.

    हेअर लावताना काय कराल?

    घरी केसांना रंग लावताना आपला हात सगळीकडे नीट पोहोचत नसल्यानं रंग सगळीकडे नीट लागणार नाही असा अनेकांचा समज असतो; पण तुम्ही केस नीट विंचरू (Comb) शकत असाल तर तुम्ही अगदी सहजपणे केसांना रंग देऊ शकता, असंही अँजेलॉन यांनी म्हटलं आहे.

    हे वाचा - हे Lip महिलेचे नाहीत तर...; या ओठात दडलेला 'राज' समजला तर थक्कच व्हाल

    त्यामुळे सणासुदीच्या काळात कोरोनामुळे पार्लर किंवा सलूनमध्ये जाऊन केसांना रंग देता येत नसल्यानं नाराज होण्याची गरज नाही. बाजारातून तुम्हाला केसांच्या हव्या त्या रंगाचं पाकीट आणा आणि स्वतःच तुमच्या केसांना हवा तो रंग द्या आणि उत्सवाचा काळ आनंदानं साजरा करा.

    First published:
    top videos

      Tags: Beauty tips, Lifestyle, Woman hair