Home /News /lifestyle /

तुम्हालाही जान्हवी कपूरसारख्या जाड आणि घनदाट भुवया हव्या आहेत? फॉलो करा या 5 सोप्या टिप्स

तुम्हालाही जान्हवी कपूरसारख्या जाड आणि घनदाट भुवया हव्या आहेत? फॉलो करा या 5 सोप्या टिप्स

तुम्हालाही ग्रूमिंगच्या मदतीने (Beauty Tips) भुवया दाट करण्याचा कंटाळा आला असेल किंवा जान्हवीप्रमाणे पातळ होणाऱ्या भुवया नैसर्गिकरित्या दाट (Thick Eyebrows) करायच्या असतील. तर तुम्ही काही घरगुती उपायांची मदत घेऊ शकता.

  मुंबई, 26 जून : घनदाट, जाड आणि पूर्ण भुवया कोणत्याही चेहऱ्याला आकर्षक बनवतात. बॉलिवूड अभिनेत्री दिवा जान्हवी कपूरचेच (Janhavi Kapoor) उदाहरण घ्या. तिच्या घनदाट, जाड भुवया तिचा लुक तर वाढवतातच. परंतु तिला कधीकधी आयब्रो मेकअपचीदेखील आवश्यकता भासत नाही. जर तुम्हालाही ग्रूमिंगच्या मदतीने (Beauty Tips) भुवया दाट करण्याचा कंटाळा आला असेल किंवा जान्हवीप्रमाणे पातळ होणाऱ्या भुवया नैसर्गिकरित्या घनदाट (Thick Eyebrows) करायच्या असतील. तर तुम्ही काही घरगुती उपायांची मदत घेऊ शकता. या उपायांचा तुमच्या दैनंदिन दिनचर्येत समावेश करा. काही दिवसात तुमच्या भुवयादेखील नैसर्गिकरित्या भरलेल्या आणि घनदाट दिसू लागतील. आज आम्ही तुम्हाला अशा काही घरगुती उपायांबद्दल सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या भुवया नैसर्गिकरित्या सुंदर बनवू शकता. हे आहेत नैसर्गिकरित्या भुवया जाड आणि घनदाट करण्याचे काही घरगुती उपाय खोबरेल तेल खोबरेल तेलामध्ये (Coconut Oil) आढळणारे फॅटी अॅसिड केसांमध्ये आढळणाऱ्या नैसर्गिक प्रोटीनला तुटण्यापासून वाचवण्याचे काम करतात. खोबरेल तेलामध्ये असलेले व्हिटॅमिन ई आणि लोह भुवया घट्ट होण्यास मदत करते. रोज रात्री खोबऱ्याच्या तेलाने भुवयांना मसाज केल्यास त्याचा फायदा काही दिवसातच दिसून येईल.

  Parenting Tips : लहान मुलांचं मानसिक आरोग्य जपणं आहे एक आव्हान, 'या' उपायांनी मुलं राहतील आनंदी

  एरंडेल तेल एरंडेल तेलामध्ये (Castor Oil) प्रोटीन, फॅटी ऍसिडस्, अँटिऑक्सिडंट असतात. जे भुवयांना पोषण देण्याचे काम करतात आणि त्यांना निरोगी बनवतात. यासाठी रोज बोटांवर थोडे एरंडेल तेल घेऊन त्याने भुवयांना मसाज करा. अर्ध्या तासानंतर स्वच्छ धुवा. कांद्याचा रस कांद्याच्या रसामध्ये (Onion Juice) असलेले सल्फर, सेलेनियम, मिनरल्स, बी जीवनसत्त्वे, सी जीवनसत्त्वे केसांच्या वाढीस मदत करतात. सल्फरमुळे कोलेजनचे उत्पादन वाढते आणि केस दाट होतात. यासाठी कांदा किसून कापसाच्या मदतीने भुवयांवर 1 तास ठेवा. नंतर धुवा.

  कोरफड कोरफडीमध्ये (Aloe Vera Jell) एलोइनिन नावाचे तत्व असते. जे केस मजबूत आणि चमकदार बनवण्यास मदत करते. रात्री झोपताना भुवयांवर कोरफडीचा गर लावून मसाज करा. काही दिवसात तुम्हाला फरक दिसेल.

  Health Tips : खरंच? उभं राहून पाणी प्यायल्याने पायांना होतो त्रास? काय आहे यामागचे सत्य?

  मेथी पेस्ट मेथीमध्ये (Fenugreek Paste) निकोटीनिक अॅसिड नावाचे प्रोटीन असते, ज्यामुळे केस दाट होतात. इतकेच नाही तर यामध्ये लेसिथिन तत्व देखील आढळते, ज्यामुळे केस चमकदार होतात. ते वापरण्यासाठी तुम्ही मेथी रात्रभर पाण्यात भिजत ठेवा आणि दुसऱ्या दिवशी पेस्ट बनवा. ही पेस्ट भुवयांवर लावा आणि अर्ध्या तासानंतर स्वच्छ धुवा. असे आठवड्यातून दोनदा केल्यास तुम्हाला खूप फरक दिसू लागेल.
  Published by:Pooja Jagtap
  First published:

  Tags: Beauty tips, Home remedies, Lifestyle

  पुढील बातम्या