मुंबई, 30 डिसेंबर : हिवाळ्यात (Winter) थंड हवामानामुळे अनेकांना सर्दी, घसा दुखणं, घसा खवखवणं, खोकला आदी त्रास जाणवतो. सध्याच्या कोरोना काळात ही लक्षणं दिसून आल्यास तातडीनं तपासणी करणं आवश्यक आहे. या समस्यांसोबतच हिवाळ्यात बहुतेकांना टॉन्सिल्सचा (Tonsils) त्रास जाणवतो. त्यामुळे घसा आणि कान दुखणं, पाणी पिताना त्रास होणं, जबड्यात वेदना जाणवणं आदी समस्या निर्माण होतात.
टॉन्सिल्स ही एक ग्रंथी (Gland) असून ती घशाच्या (Throat) दोन्ही बाजूंना असते. जिवाणूंच्या संसर्गामुळे, अपथ्यकारक पदार्थ खाल्ल्याने किंवा थंडीमुळे टॉन्सिल्सना सूज येऊ शकते. त्यामुळे घसा आणि कानासह जबड्यात वेदना जाणवू लागतात. तसंच या भागाला सूजदेखील येते. विशेषतः लहान मुलांमध्ये ही समस्या जास्त प्रमाणात दिसून येते. या समस्येवर वेगवेगळे उपचार केले जातात. परंतु, आराम पडत नाही. टॉन्सिल्सच्या समस्येवर गुणकारी ठरणाऱ्या काही घरगुती उपचारांविषयी (Home Remedies) माहिती येथे देत आहोत. हे घरगुती उपचार स्वस्त आणि सोपे आहेत. या उपचारांमुळे टॉन्सिल्समुळे होणाऱ्या वेदना आणि टॉन्सिल्सना आलेली सूज कमी होण्यास मदत होते. या उपचारांविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊ या.
मिठाच्या पाण्यानं गुळण्या करा
टॉन्सिल्सची समस्या दूर व्हावी यासाठी मिठाच्या (Salt) पाण्यानं गुळण्या करू शकता. यासाठी एक ग्लास कोमट पाणी घ्यावं. त्यात एक चमचा मीठ घालावं आणि या पाण्यानं गुळण्या कराव्यात. दिवसातून दोन ते तीन वेळा हा उपाय केला, तर काही दिवसांतच टॉन्सिल्सच्या वेदना आणि सूज कमी होऊन आराम पडेल.
Cancer उपचारांमध्ये व्हायग्राचा वापर होण्याची शक्यता, जाणून घ्या, अधिक माहिती
दूध (Milk) आणि मधाचा (Honey) वापर
मध अनेक विकारांवर गुणकारी आहे. टॉन्सिल्सच्या वेदना आणि सूज कमी करण्यासाठी तुम्ही दूध आणि मधाचा वापर करू शकता. रात्रीच्या वेळी झोपण्यापूर्वी गरम दूधात मध घालावा आणि दूध प्यावं. या उपायामुळे लवकर आराम पडू शकतो. तसंच या उपायामुळे घशातला संसर्गदेखील कमी होण्यास मदत होते.
तुमच्याही दाढीचे केस नीट वाढत नाहीत का? जाणून घ्या त्याची कारणे आणि उपाय
हळद (Turmeric) आणि काळ्या मिरी (Black Pepper) दूधही ठरेल फायदेशीर
टॉन्सिल्सशी निगडित समस्या दूर करण्यासाठी हळद आणि काळी मिरी घालून दूध पिऊ शकता. रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास दूध उकळून घ्यावं. दूध कोमट झाल्यावर त्यात थोडी हळद आणि काळी मिरी घालावी आणि हे दूध प्यावं. असं केल्यास टॉन्सिल्समुळे होत असलेल्या वेदना आणि टॉन्सिल्सना आलेली सूज लवकर बरी होईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Health Tips