Home Remedies: घामाच्या दुर्गंधीला या सोप्या घरगुती उपायांनी करा दूर

घाम येणं ही सर्वसामान्य गोष्ट आहे. घाम येणं शरीरासाठी चांगलं आहे. यामुळे शरीर थंड राहण्यास मदत होते.

News18 Lokmat | Updated On: Aug 7, 2019 06:34 PM IST

Home Remedies: घामाच्या दुर्गंधीला या सोप्या घरगुती उपायांनी करा दूर

घाम येणं ही सर्वसामान्य गोष्ट आहे. घाम येणं शरीरासाठी चांगलं आहे. यामुळे शरीर थंड राहण्यास मदत होते. शरीरातील टॉक्सिनप्रमाणे बॅक्टेरियाही बाहेर फेकले जातात. मात्र जास्त घाम येणंही शरीरासाठी चांगलं नाही. अनेकांच्या घामामधून दुर्गंध येतो. जे लोक अतिरिक्त घामामुळे त्रासलेले आहेत, तसेच ज्यांच्या घामातून दुर्गंध येतो ते घरगुती उपायांनी यापासून स्वतःचा बचाव करू शकतात.

बेकिंग सोडा घाम शोषून घ्यायला मदत करतो. दुर्गंधी पसरवणारे बॅक्टेरियांना मारून नैसर्गिक डियोड्रंटचं काम करतो. सोड्यात लिंबाचा रस मिसळा आणि 15 मिनिटांसाठी काखेला लावा.

सफरचंदाचं व्हिनेगर त्वचेच्या पीएच लेवला नियंत्रीत ठेवतं. कापसावर सफरचंदाचं व्हिनेगर घ्या आणि ते काखेत लावा. पाच मिनिटांनंतर कापूस काढा. आठवड्याभरासाठी रोज सकाळ आणि संध्याकाळी हा उपाय करा. यामुळे घामाची दुर्गंधी कमी होईल.

लिंबू हे असिडीक असतं याशिवाय हे एक नैसर्गिक डियोड्रंटही आहे. 10 मिनिटांसाठी काखेच्या त्वचेवर लिंबाने मसाज करा. घामाच्या दुर्गंधीवर याचा परिणाम होईल.

टी-ट्री ऑइल- हे तेल अँटी- बॅकेटोरियल आणि अँटी-सेप्टिकसारखं काम करतं. घामाच्या दुर्गंधीपासून सुटका करून घ्यायची असेल तर तुम्ही याचा वापर नक्कीच करू शकता. रोज आंघोळ झाल्यानंतर एक कप पाण्यात तीन ते चार थेंब टी-ट्री तेलाचे थेंब घालून हे मिश्रण कपड्यांवर स्प्रे करा.

Loading...

टॉमेटोही एकप्रकारचं अँटी-सेप्टिक आहे. यामुळेही घामाच्या दुर्गंधीपासून सूटका होऊ शकते. टॉमेटोचा रस काढून तो काखेला लावा. यामुळे घामाच्या दुर्गंधीपासून सुटका होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 7, 2019 06:34 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...