मासिक पाळीतली पोटदुखी टाळायची असेल तर हे 5 पदार्थ अजिबात खाऊ नका

मासिक पाळीतली पोटदुखी टाळायची असेल तर हे 5 पदार्थ अजिबात खाऊ नका

मासिक पाळी सुरू असताना चुकीचे पदार्थ खाल्ले तर त्रास होतो

  • Share this:

मुंबई, 11 जून : मासिक पाळी ही नैसर्गिक गोष्ट असली तरी प्रत्येक स्त्रीला याचा त्रास सहन करावा लागतोच. पोट दुखतं, मूड्स बदलत राहतात, अचानक काही खावसं वाटतं. पण अनेकदा स्त्री या काळात असे काही पदार्थ खाते की ज्यामुळे तिचं पोट आणकी दुखायला लागतं. मासिक पाळी सुरू असताना काही पदार्थ अजिबातच खाऊ नका.

चुकीचे पदार्थ खाल्ल्यानं पचनक्रियेवरही परिणाम होतो. जुनी जाणती माणसं या काळात काही थंड पदार्थ खाऊ नका म्हणून सांगतात.

उचकी थांबत नसेल तर करा 'हा' उपाय

एका चायनीज संशोधनानुसार मासिक पाळीत तुम्ही थंड पाणी प्यायलात तर शरीरातला बॅलन्स बिघडतो. यामुळे त्वचा आणि आरोग्यावर परिणाम होतो.

या संशोधनानुसार थंड पाणी प्यायल्यानं आतडी अन्नातली पोषक द्रव्यं घेऊ शकत नाहीत. यामुळे मासिक पाळीतला त्रास वाढतो.

व्यायाम न करता फिट राहायचं असेल, तर परफेक्ट आहे 'हा' उपाय

या काळात आइस्क्रीम खाऊ नये. थंड मिठाईचं सेवन करू नये. तेलकट पदार्थांपासून लांबच राहावं. साखरेचे पदार्थ जास्त खाऊ नयेत.

मासिक पाळीच्या वेळी कोमट पाणी प्यावं. शिवाय हिरव्या भाज्या, ग्रीन टी आणि शेंगदाणे खावेत. त्यानं पोटदुखीपासून आराम मिळतो. या काळात तुळशीचं बी थोडा वेळ दुधात भिजत घालून ते दूध प्यावं.

गुलाबाच्या पाकळ्यांपासून घरच्या घरी बनवा 'हा' पदार्थ

मासिक पाळी प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील एक नैसर्गिक अवस्था आहे. पण आजही याबद्दल क्वचितच चर्चा केली जाते. एखादी महिला आपल्या आयुष्यातील १ हजार ८०० दिवसांपेक्षा जास्त काळ मासिक पाळीमध्ये घालवते. दुसऱ्या शब्दात बोलायचं झालं तर, तिच्या आयुष्यातील सुमारे ५ वर्ष तिला रक्तस्त्राव (bleeding) होण्यामध्ये घालवावी लागतात, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

VIDEO : दहावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, तावडेंनी केला महत्त्वाचा खुलासा

First published: June 11, 2019, 8:03 PM IST

ताज्या बातम्या