मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

तुमच्याही नखांजवळील त्वचा अशी निघते का? जाणून घ्या त्रास कमी करण्याचे घरगुती उपाय

तुमच्याही नखांजवळील त्वचा अशी निघते का? जाणून घ्या त्रास कमी करण्याचे घरगुती उपाय

नखाजवळची त्वचा कशामुळे निघते

नखाजवळची त्वचा कशामुळे निघते

तिकट पदार्थ खाताना, तिकट भाजी खाताना त्याचा जास्त त्रास जाणवतो. त्यातून कधी-कधी रक्तही येऊ लागते. त्यामुळे ही समस्या मग आणखीन (Tips To Get Rid Of Peeling Skin Near Nails) त्रासदायक ठरते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Ramesh Patil

मुंबई, 04 डिसेंबर : हिवाळ्यात अनेकांच्या हाताच्या नखांजवळील त्वचा निघू (Peeling Skin Near Nails) लागते. ही दिसायला अगदी कॉमन समस्या असली तरी कधी-कधी त्यामुळे खूप त्रास होतो. विशेषत: जे लोक दिवसभर श्रमाची कामे करतात त्यांना याचा जास्त त्रास होतो. याला काहीजण बोटाच्या नसा निघणे असेही म्हणतात. तिकट पदार्थ खाताना, तिकट भाजी खाताना त्याचा जास्त त्रास जाणवतो. त्यातून कधी-कधी रक्तही येऊ लागते. त्यामुळे ही समस्या मग आणखीन त्रासदायक ठरते.

तुम्हालाही या समस्येचा त्रास होत असेल तर यापासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता. कारण यासाठी क्वचितच कोणाला डॉक्टरांकडे जावेसे वाटते. जाणून घेऊया नखांजवळील त्वचेचे छाले निघल्यानंतर किंवा निघू नये म्हणून काय करावे, याविषयी.

कोमट पाण्यात हात बुडवा

हाताच्या नखांजवळील त्वचेचे निघालेले छाले दुरुस्त करण्यासाठी, आपण दररोज सुमारे पाच मिनिटे आपले हात कोमट पाण्यात बुडवून ठेवावे. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही पाण्यात लिंबाचा रस देखील मिसळू शकता.

पेट्रोलियम जेलीने मसाज करा

हा त्रास कमी करण्यासाठी, रोज रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या नखांना आणि त्यांच्याभोवती पेट्रोलियम जेलीने काही वेळ हलक्या हातांनी मसाज करा.

ओट्स पेस्ट वापरा

या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही ओट्स पेस्ट देखील वापरू शकता. यासाठी कोमट पाण्यात ओट्स काही वेळ भिजवून पेस्ट बनवा. नंतर ही पेस्ट नखांवर लावून मसाज करा.

मधाने मालिश

यासाठी तुम्ही मध देखील वापरू शकता. यासाठी नखांवर आणि त्याच्या बाजूच्या त्वचेवर मध लावा आणि रोज रात्री झोपण्यापूर्वी हलका मसाज करा.

कोरफड जेल वापरा

यासाठी तुम्ही एलोवेरा जेलचीही मदत घेऊ शकता. कोरफडीचे जेल नखांवर आणि त्याच्या बाजूच्या त्वचेवर काही दिवस नियमितपणे लावून मसाज करा.

ऑलिव्ह तेलाने मालिश करा

दररोज ऑलिव्ह ऑइलने आपल्या नखांना आणि त्याच्या सभोवतालच्या त्वचेला मसाज करा. ऑलिव्ह ऑईल उपलब्ध नसेल तर तुम्ही मोहरी किंवा खोबरेल तेल देखील वापरू शकता.

हे वाचा - वेदनेने तडफडत होती चिमुकली; लोक अर्धा तास व्हिडिओ बनवत राहिले अन् तिने जग सोडलं

छाले निघल्यामुळे होणाऱ्या त्रासापासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही काकडीचाही वापर करू शकता. यासाठी काकडीचे तुकडे करून नखांच्या आजूबाजूच्या भागावर हलक्या हाताने चोळा.

(सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत याची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

First published:

Tags: Health Tips, Winter