फक्त हे काम करून नकारात्मकता करा दूर, पुन्हा एकदा पडाल प्रेमात

'अहम् ब्रह्मास्मि' याचा अर्थ 'मी ब्रह्म आहे' या गोष्टीवर विश्वास ठेवा.

News18 Lokmat | Updated On: Sep 24, 2019 05:08 PM IST

फक्त हे काम करून नकारात्मकता करा दूर, पुन्हा एकदा पडाल प्रेमात

अनेकदा  आपल्याला वाटतं की, संपूर्ण जग आपल्या विरोधातच उभं आहे. अशा परिस्थितीत फार कमकूवत झाल्यासारखं वाटतं आणि त्यामुळे आपल्यात नकारात्मकता वाढत जाते. यातून बाहेर पडण्यासाठी आपण प्रत्येक गोष्टीकडे तटस्थपणे पाहू लागतो. कोणत्याही मुद्द्यांमध्ये मिसळणं सहसा टाळतो. यामुळे परिस्थितीतून बाहेर पडण्याऐवजी आपण अधिक त्याच्यात अडकत जातो. मनात निर्माण होणाऱ्या या नकारात्मक विचारांवर कसं नियंत्रण मिळवायचं हे आज जाणून घेऊ.

दिवसाची सुरुवात आनंदी करा-

दिवसाची सुरुवात जर आनंदाने झाली तर शेवटही आनंदीच होतो असं म्हटलं जातं. त्यामुळेच दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारांनी आणि प्रसन्न चेहऱ्याने करा. याशिवाय तुम्ही तुमच्या अवतीभवती जे वातावरण तयार करता तसंच तुमच्या आयुष्यातही असतं. त्यामुळेच नेहमी सकारात्मक गोष्टींवर आपलं लक्ष केंद्रीत करा. याचा तुमच्या आयुष्यावर खोलवर परिणाम होईल.

आभार माना-

आयुष्य खूप सुंदर आहे हे सर्वात आधी समजून घ्या. मिळालेला प्रत्येक दिवस हा तुमच्यासाठी काही नवं घेऊन येतो. त्यामुळे प्रत्येक गोष्टीचे आभार मानायला शिका. कारण तुमच्याकडे ज्या गोष्टी आहेत त्या अनेकांकडे नाहीत याचं भान ठेवून कृतकृत्य व्हा आणि आभार माना.

Loading...

तुम्ही सर्वोत्कृष्ट आहात-

'अहम् ब्रह्मास्मि' याचा अर्थ 'मी ब्रह्म आहे' या गोष्टीवर विश्वास ठेवा. अनेकदा आपण दुसऱ्यांचं राहणीमान आणि आयुष्य पाहून आपल्या जीवनाची त्यांच्याशी तुलना करून मन दुखावून घेतो. इतरांप्रमाणे तुम्हीही या जगात काही कारणामुळे आले आहात. दुसऱ्यांशी स्वतःची तुलना करू नका. याने फक्त तुम्ही दुःखीच व्हाल. याहून दुसरं काही होऊ शकत नाही. सर्वांच्याआधी स्वतःला प्राधान्य द्या आणि नव्याने स्वतःच्या प्रेमात पडा.

तुम्ही गेलेल्या ट्रायल रूममध्ये कॅमेरा लपवलाय का? असं घ्या जाणून

महिलांना Middle Finger बोट दाखवणं पडू शकतं महागात, येईल तुरुंगात जाण्याची वेळ!

MRI दरम्यान एक छोटीसी चूक बेतू शकते जीवावर, वेळीच व्हा सावध!

फ्रॅक्चर झालंय? या प्रोटीनपासून रहा सावधान, होऊ शकतं नुकसान!

Special Report : मनसेचं ठरलं! 122 जागांसाठी अशी केली तयारी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 24, 2019 05:08 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...