मान दुखीकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका, होऊ शकतो गंभीर आजार

मान दुखीकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका, होऊ शकतो गंभीर आजार

या दुखण्यामुळे शरीरातील इतर अवयवही दुखत असतील तर त्यावर वेळीच उपचार करावेत.

  • Share this:

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात सतत कॉम्प्युटर समोर बसून काम करावं लागतं. यामुळे अनेकदा मान दुखीचा त्रास सहन करावा लागतो. पण वेळेतच तुम्ही या दुखण्यावर उपचार घेतले नाही तर गंभीर आजार होऊ शकतो. त्यामुळे वेळीच मान दुखी आणि त्याच्या लक्षणाकडे गांभीर्याने पाहा. आज आपण मानेच्या दुखण्याची लक्षणं कोणती असतात आणि यापासून कसं वाचता येईल तेही वाचू...

काय आहेत कारणं-

मान दुखीची अनेक कारणं असू शकतात. यात कॉम्प्युटर आणि मोबाइलवर फार वेळ काम करणं किंवा खूप वेळ एकाच जागी बसणं तसंच काम करताना चुकीच्या पद्धतीने बसल्यामुळेही मानदुखी होऊ शकते. यासोबतच वाढत्या वयासोबत मान दुखीला सुरुवात होऊ शकते. सामान्यपणे नियमित व्यायामाने तुम्ही या आजारावर मात करू शकता. पण या दुखण्यामुळे शरीरातील इतर अवयवही दुखत असतील तर त्यावर वेळीच उपचार करावेत. कारण या दुखण्याकडे दुर्लक्ष केलं तर अर्धांगवायूचा धोका वाढू शकतो.

सवाइकल पेनची लक्षणं-

मान दुखी हळू हळू सवाइकल पेन होत चालली असेल तर मानदुखीसोबतच अनेकांचा हातही दुखू लागतो. याशिवाय हाता- पायांमध्ये सतत मुंग्या येतात. कोणाच्या मानेचे स्नायू ताणलेले असतील, तर त्यामुळे डोक्याच्या मागील भागात तसेच खांद्यात दुखणं सुरू होतं आणि शरीरावर कोणतंही संतुलन राहत नाही. ही सर्व लक्षणं तुमच्यात दिसत असतील तर याकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका.

काय आहेत उपाय-

मानदुखीवर एक रामबाण उपाय आहे तो म्हणजे व्यायाम. तसेच शरीराचं पोश्चर नीट ठेवल्यानेही अनेकदा मानदुखी बरी होते. पण जर सवाइकल पेनची लक्षणं दिसत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यंत आवश्यक आहे.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

व्हायरल तापापासून वाचण्यासाठी हे 4 घरगुती उपाय करून पाहा, मिळेल लगेच आराम

चांगल्या झोपेसाठी आजच करा ही कामं...

मेडिटेशन करताना जर असं काही झालं तर लगेच सोडून द्या ध्यान!

SPECIAL REPORT: राणेंचा 'स्वाभिमान' भाजपात विलीन होणार?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 25, 2019 03:05 PM IST

ताज्या बातम्या