Home /News /lifestyle /

Joint Pain Home Remedies: सांधेदुखीवर हा घरगुती पदार्थ ठरेल गुणकारी, जाणून घ्या वापरण्याची पद्धत

Joint Pain Home Remedies: सांधेदुखीवर हा घरगुती पदार्थ ठरेल गुणकारी, जाणून घ्या वापरण्याची पद्धत

Joint Pain Home Remedies: सांधेदुखीसाठी आपण काही घरगुती पदार्थाचा वापर करू शकतो. यासाठी हळद फायदेशीर आहे, जी प्रत्येकाच्या घरात सहज उपलब्ध असते. सांधेदुखीपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही हळदीचा वापर कसा करू शकता? याविषयी जाणून घेऊया.

पुढे वाचा ...
    मुंबई, 04 डिसेंबर : हिवाळ्यात अनेकांना सांधेदुखीचा (Joint Pain) त्रास सुरू होतो. आजच्या जीवनशैलीत ही समस्या केवळ वृद्धांनाच नाही तर तरुणांनाही सतावू लागली आहे. सांधेदुखी कमी करण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारची अॅलोपॅथी औषधे घेतात. काहीजण वेगवेगळ्या प्रकारच्या तेलांच्या मसाजसाठी खूप पैसा खर्च करतात. इतके अनेक उपाय करूनही सांधेदुखी कमी होईलच याची (Joint Pain Home Remedies) शक्यता नसते. सांधेदुखीसाठी आपण काही घरगुती पदार्थाचा वापर करू शकतो. यासाठी हळद फायदेशीर आहे, जी प्रत्येकाच्या घरात सहज उपलब्ध असते. सांधेदुखीपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही हळदीचा वापर कसा करू शकता? याविषयी जाणून घेऊया. हे वाचा - WhatsApp वरून ओपन करता येणार डीमॅट अकाउंट; करता येणार आयपीओसाठी अर्ज हळदीची पेस्ट कशी तयार करावी सांधेदुखीपासून सुटका मिळवण्यासाठी एका पातेल्यात एक चमचा हळद घ्या आणि त्यात एक चमचा कोरफडीचा गर मिसळून पेस्ट बनवा. दोन्हीचे प्रमाण सारखेच ठेवावे लागेल. आता गॅसवर पॅन ठेवा आणि ही पेस्ट दोन मिनिटे गरम करा. यानंतर गॅस बंद करून त्यात एक चमचा मोहरी किंवा तिळाचे तेल घाला. नंतर ही पेस्ट सांध्यांवर लावा. हे वाचा - Mental Health : काही केल्या मनातून नकारात्मक विचार जात नाहीयेत; या 5 उपायांनी त्यांना पळवून लावा अशी वापरा सांधेदुखी कमी करण्यासाठी हळदीची पेस्ट ज्या ठिकाणी दुखत असेल त्या सांध्यांवर लावा. यानंतर हलक्या हातांनी पाच-सात मिनिटे मसाज करा. त्यानंतर या ठिकाणी हलके कोमट कापड लावा. यानंतर, प्रभावित क्षेत्र उबदार पट्टीने झाका. ही पेस्ट दिवसातून किमान दोनदा वापरा. रात्री झोपण्यापूर्वी ही पेस्ट वापरल्यास आणखी चांगले परिणाम मिळू शकतात. पण यासाठी रात्रभर गरम पट्टीने सांधे झाकून ठेवावे लागतील. (सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health, Health Tips

    पुढील बातम्या