रिलेशनशिपमध्ये असतानाही का पडतात दुसऱ्यांच्या प्रेमात?

नात्यात सगळं काही सुरळीत सुरू असताना अचानक मन पुन्हा कोणा दुसऱ्या व्यक्तीसाठी धडधडू लागतं.

  • Share this:

जेव्हा आपण एखाद्याच्या प्रेमात आकंठ बुडालेले असतो तेव्हा संपूर्ण आयुष्य त्याच्यासोबत घालवण्याची स्वप्न पाहतो. नात्यात सगळं काही सुरळीत सुरू असताना अचानक मन पुन्हा कोणा दुसऱ्या व्यक्तीसाठी धडधडू लागतं.

नात्यात असूनही दुसऱ्या व्यक्तिकडे मन आकर्षित होतं. ती व्यक्ती एवढी खास वाटू लागते की आपण कळत- नकळतपणे त्याच्यासोबत स्वतःला पाहू लागतो.

जोडीदाराशिवाय दुसऱ्या मित्रासोबत जास्त वेळ घालवला तरी अशा पद्धतीची भावना मनात येऊ शकते. इथे आम्ही तुम्हाला तुमच्या पार्टनरशिवाय जर कोणी दुसरं आवडत असेल तर काय करावं हे सांगणार आहोत.

जर तुम्ही सिरिअस रिलेशनशिपमध्ये असूनही दुसऱ्या व्यक्तिकडे आकर्षित होत असाल तर सर्वातआधी तुम्ही ही गोष्ट तुमच्या पार्टनरला सांगा. ही एक सामान्य गोष्ट आहे असं मानून पार्टनरला याबद्दल सांगा आणि त्याबद्दल मोकळेपणाने बोला. हे क्षणिक आकर्षण असतं आणि काही काळाने ते आपणहून विरून जातं.

तुमच्या मनात कोणासाठी अशा पद्धतीच्या भावना असतील तर सर्वातआधी आपल्या पार्टनरचा विचार मनात आणा. त्याच्यात काही सर्वोत्कृष्ट गोष्ट आहे याचा विचार करा. जसा तुम्ही पार्टनरच्या चांगल्या गोष्टींचा विचार कराल तेव्हा आपसूक तुमचं दुसऱ्याबद्दलचं आकर्षण कमी होईल.

अनेकदा नात्यात कोणत्यातरी गोष्टीची कमतरता असल्यामुळे आपलं मन दुसऱ्या व्यक्तिकडे आकर्षित होतं. अशावेळी नात्यातील ती पोकळी भरण्याचा प्रयत्न करा.

अनेकदा महिला या भावनिक आधार शोधण्यासाठीही दुसऱ्या पुरुषाकडे आकर्षित होतात. मात्र या आकर्षणात एक अपराधी भावनाही असते. जर असं असेल तर तुम्ही तुमच्या पार्टनरशी याबद्दल बोला.

जर तुमचं कोणावर क्रश आहे तर अशावेळी जुने दिवस आठवा. तुमच्या नात्यातील ते सुंदर क्षण पुन्हा आठवा. तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या किती आकंठ प्रेमात बुडाला होता ते क्षण आठवा.

असं केल्याने तुम्ही पुन्हा एकदा तुमच्या पार्टनरसोबत जोडले जाल आणि दुसऱ्या व्यक्तिबद्दल वाटणारं आकर्षण कमी होईल.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सुचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 22, 2019 10:05 PM IST

ताज्या बातम्या