मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /तुमच्या घरात झुरळांनी उच्छाद मांडलाय का? हे उपाय करून बघा, कसे पळतील बाहेर

तुमच्या घरात झुरळांनी उच्छाद मांडलाय का? हे उपाय करून बघा, कसे पळतील बाहेर

त्यांच्यामुळे संक्रमण (infection) आणि अन्नातून विषबाधेसारख्या समस्या देखील उद्भवू शकतात. अशा परिस्थितीत जर तुम्हाला कोणतेही हानिकारक केमिकल न वापरता झुरळापासून सुटका करायची असेल तर काही सोपे उपाय आपण अवलंबू शकतो.

त्यांच्यामुळे संक्रमण (infection) आणि अन्नातून विषबाधेसारख्या समस्या देखील उद्भवू शकतात. अशा परिस्थितीत जर तुम्हाला कोणतेही हानिकारक केमिकल न वापरता झुरळापासून सुटका करायची असेल तर काही सोपे उपाय आपण अवलंबू शकतो.

त्यांच्यामुळे संक्रमण (infection) आणि अन्नातून विषबाधेसारख्या समस्या देखील उद्भवू शकतात. अशा परिस्थितीत जर तुम्हाला कोणतेही हानिकारक केमिकल न वापरता झुरळापासून सुटका करायची असेल तर काही सोपे उपाय आपण अवलंबू शकतो.

नवी दिल्ली, 28 सप्टेंबर : अनेकांना घरात झुरळांनी (Cockroaches) गोंधळ घातल्याचे दिसून येते. आपण आपले स्वयंपाकघर, स्नानगृह किंवा संपूर्ण घर जरी स्वच्छ ठेवले असले तरी रात्रीच्यावेळी हे झुरळं (How To Get Rid Of Cockroaches) आपल्या घरावर हमला करतात. रात्री कधी तरी आपण लाईट चालू केल्या की समोर झुरळांचा उच्छाद दिसतो. घर, बाथरूमच्या आणि स्वयंपाकघरातून बाहेर पडणाऱ्या पाण्याच्या मार्गात त्यांची वस्ती असते. घरातील कामे संपल्यानंतर शांतता झाल्यानंतर ही झुरळं (Cockroaches) बाहेर येतात आणि अन्नाचा शोध घेतात आणि स्वयंपाकघरात ठेवलेल्या खाद्यपदार्थांच्या जवळ पोहोचतात.

यामुळे संक्रमण (infection) आणि अन्नातून विषबाधेसारख्या समस्या देखील उद्भवू शकतात. अशा परिस्थितीत जर तुम्हाला कोणतेही हानिकारक केमिकल न वापरता झुरळापासून सुटका करायची असेल तर काही सोपे उपाय आपण अवलंबू शकतो.

झुरळांपासून मुक्त होण्याचे सोपे मार्ग

1. बेकिंग सोडा

झुरळांपासून मुक्त होण्यासाठी बाथरूम ड्रेन आणि किचन सिंक इत्यादीभोवती बेकिंग सोडा शिंपडा. बेकिंग सोड्याचा वास खूप तीव्र असतो, ज्यामुळे झुरळे पळून जातात आणि घरात प्रवेश करत नाहीत. तुम्ही एक कप कोमट पाण्यात 2 चमचे बेकिंग सोडा विरघळवून हे मिश्रण बाहेर पडणाऱ्या पाण्याच्या मार्गात टाका, असे केल्याने तेथे उपस्थित असलेली झुरळे मरतील.

हे वाचा - PM Kisan Yojana : शेतकऱ्यांना आता 2 हजारऐवजी मिळतील 4 हजार; वाचा सर्व प्रोसेस

2. बोरिक अॅसिड

आपण बोरिक अॅसिडच्या मदतीने झुरळांपासून सुटका मिळवू शकता. तुम्ही ते रात्री बाथरूमच्या नाल्यांमध्ये, स्वयंपाकघरातील सिंक इत्यादींमध्ये टाका. त्यामुळे घरातील झुरळं गायब होऊ शकतात.

3. पांढरा व्हिनेगर

घरातून झुरळांपासून मुक्त होण्यासाठी तुम्ही पांढरा व्हिनेगर वापरू शकता. ते वापरण्यासाठी व्हिनेगर आणि पाणी समान प्रमाणात मिसळा आणि जिथून झुरळं बाहेर पडतात, त्या भागात शिंपडा. झुरळं त्याच्या वासामुळं पळून जातील.

हे वाचा - हसणं दूर ही नवरी स्वतःच्या लग्नात आपलं तोंडही उघडू शकत नाही; कारण वाचून व्हाल हैराण

4. गरम पाणी

जर तुमच्या घरातून बाहेर पडणारे नाले झुरळांनी भरलेले असतील तर त्यापासून मुक्त होण्यासाठी तुम्ही नाल्यात उकळते पाणी टाकू शकता. आपल्याला हवे असल्यास आपण त्यात बेकिंग सोडा देखील टाकू शकतो. यामुळे साचलेली घाण देखील साफ होईल आणि झुरळे देखील मरतील.

(सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:
top videos

    Tags: Lifestyle