मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Reduce Belly Fat: सुटलेलं पोट म्हणजे अनेक आजारांना निमंत्रण; हे घरगुती उपाय करून रहाल फिट

Reduce Belly Fat: सुटलेलं पोट म्हणजे अनेक आजारांना निमंत्रण; हे घरगुती उपाय करून रहाल फिट

पोटावरची चरबी कमी करण्यासाठी तुम्हाला घरात उपलब्ध असलेल्या काही पदार्थांचं सेवन करता येईल. यामुळं तुम्हाला दुष्परिणामांचा धोका नसेल. जाणून घेऊ पोटाची चरबी कमी करण्यासाठी कोणते घरगुती पदार्थ (Tips To Reduce Belly Fat) उपयुक्त ठरू शकतात.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 25 डिसेंबर : पोटावरची चरबी (Belly Fat) कमी करण्यासाठी लोक कितीतरी प्रकारच्या सप्लिमेंट्स घेत असतात आणि वेगवेगळे व्यायामही करतात. पण हे सर्व प्रयत्न कधी कधी पोटाची चरबी कमी करण्यासाठी उपयुक्त ठरत नाहीत. अशा परिस्थितीत तुमचे पैसे आणि मेहनत व्यर्थ जाते. यासोबतच दुष्परिणामांचा धोकाही कायम आहे. तर मग पोटावरची चरबी कमी करण्यासाठी तुम्हाला घरात उपलब्ध असलेल्या काही पदार्थांचं सेवन करता येईल. यामुळं तुम्हाला दुष्परिणामांचा धोका नसेल. जाणून घेऊ पोटाची चरबी कमी करण्यासाठी कोणते घरगुती पदार्थ (Tips To Reduce Belly Fat) उपयुक्त ठरू शकतात.

स्थूलपणा कमी करण्यासाठी मेथी नक्की खा

मेथीची भाजी आणि त्याच्या बियांमुळं पोटावरची चरबी अगदी सहजपणे कमी होऊ शकते. मेथीचा चरबी जाळण्यासाठी चांगला उपयोग होतो. तसंच, मेथीची भाजी आणि मेथी दाणे भिजवलेलं पाणी प्यायल्यानं आरोग्याला अनेक फायदे मिळतात.

पीनट बटर ठरू शकतं उपयुक्त

पीनट बटर तुमच्या पोटावरची चरबी कमी करण्यास मदत करू शकतं. खरं तर, पीनट बटरमध्ये प्रथिनं आणि फायबर भरपूर प्रमाणात असतं. याच्यामुळं पोट दीर्घकाळ भरलेलं राहतं. जर तुम्ही साधं घरचं किंवा विकत आणून लोणी वापरत असाल तर त्याच्या जागी पीनट बटर हा तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरेल.

काळी मिरी

काळी मिरी तुमच्या पोटावरची चरबी कमी करण्यात खूप मदत करते. ती चरबी जमा होऊ देत नाही आणि चरबी सहजपणे जाळण्यास मदत करते. एवढंच नाही तर काळी मिरी खाल्ल्यानं चयापचय क्रियाही वाढते आणि रोगप्रतिकारशक्तीही मजबूत होते.

हे वाचा - Kitchen Tips: मळलेलं पीठ जास्त काळ राहील एकदम मऊसूत; या सोप्या ट्रिक्स वापरून पहा

मटारचं सेवन ठरेल फायदेशीर

मटारचं सेवन पोटावरची चरबी कमी करण्यासाठीदेखील उपयुक्त ठरू शकतं. मटार स्थूलपणा कमी करण्यासाठी उत्तम अन्न मानलं जातं. यामुळे पोटावरची चरबी कमी होते. तसंच रोगप्रतिकारशक्तीही मजबूत होते.

हे वाचा - Thyroid Medication: थायरॉईडची औषधं तुम्हीही घेताय? मग या गोष्टी सर्वात अगोदर जाणून घ्या

हरभरा खाणं उपयुक्त

तुमच्या पोटावरची चरबी कमी करण्यासाठी चणे उपयुक्त ठरू शकतात. हरभरा खाल्ल्यानं चरबी जाळली जातेच. शिवाय, प्रथिनं, फायबर आणि खनिजं यांसारखी पोषक तत्त्वं शरीराला मिळतात.

(सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:
top videos

    Tags: Weight, Weight loss tips