असं करा गॅस-अॅसिडिटीला गुडबाय..

असं करा गॅस-अॅसिडिटीला गुडबाय..

पण रोजच्या या समस्यांपासुन आपल्याला आराम मिळु शकतो. फक्त आपल्या काही सवयी बदलण्याची गरज आहे.

  • Share this:

20ऑक्टोबर: व्यस्त जीवनपद्धतीमुळे खाण्याच्या वेळा बदलल्या आणि रोज काही नवीन खाण्याच्या सवयीने पोट खराब होण्याच्या समस्याही वाढल्या आहेत. वारंवार होणाऱ्या गॅस-अॅसिडिटी या समस्यांनी लोक त्रस्त झाले आहेत. वयस्कर लोकांना ना काही खाण्याची इच्छा होत आणि जरी खाल्लं तरी पचायला त्रास होतो.पण रोजच्या या समस्यांपासुन आपल्याला आराम मिळु शकतो. फक्त आपल्या काही सवयी बदलण्याची गरज आहे.

आपलं वाढत वय लक्षात घ्या.

आपल्या तरुण वयात आपण काहीही खाल्ल तरी ते पचतं. आपण तेलकट, तुपकट जरी खालले तरी जास्त त्रास होत नाही. पण आपल्या वाढत्या वयाला पाहता आपल्या या सवयी बदलल्या गेल्या पाहिजे. वय वाढलं की शरीरातील अनेक घटक कमी होण्यास सुरुवात होते. अश्या वेळेस आपल्या शरीरानुसार पौष्टिक खाण्याची आणि वेळेनुसार व्यायामाची सवय लावुन घ्या.

थोडाफार व्यायाम कधीही योग्यचं

आपल्या वयानुसार शरीराला व्यायाम खुप महत्वाचा आहे. हळुहळु शरीराची कार्यक्षमता कमी होत जाते. आपल्या पेशींमध्ये नवी उर्जा निर्माण करण्यासाठी व्यायाम खूप महत्त्वाचा असतो. व्यायामाने भूक वाढते आणि जे काही खाल्ले आहे ते पचायला मदतही होते.

भरपुर पाणी प्या

दिवसातून पोटात अनेक अाम्ल बनतात आणि त्यामुळे आपल्याला अॅसिडिटी होते. हे थांबवण्यासाठी एकमेव उपाय म्हणजे पाणी. दिवसभर भरपुर पाणी प्या. विशेषत:  सकाळी रिकाम्या पोटी लक्षात असु द्या की थंड पाणी शरीराला योग्य नाही. त्यामुळे थोडसं कोंबट पाणी प्या याने शरीराला खुप फायदा होईल.

आपल्या रोजच्या तणावाला करा गुडबाय

रोजचा ताणतणाव आपल्या सर्व आजारांच मुख्य कारण आहे. गॅस-अॅसिडिटीसुद्धा तणावामुळे होते. जास्त ताणतणावामुळे आपल्या मेंदुत अनेक रसायन तयार होतात. जी आपल्या शरीरासाठी घातक आहे. त्यामुळे आपल्या पाचन प्रणालीवर परिणाम होतो. त्यामुळे तणावाला करा आता गुडबाय.

First published: October 20, 2017, 8:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading