ती 18-18 तासांपेक्षाही जास्त वेळ 'यूट्यूब' वर असायची आणि...

ती 18-18 तासांपेक्षाही जास्त वेळ 'यूट्यूब' वर असायची आणि...

इंटरनेटच्या अतिवापराचे काय भयंकर परिणाम होऊ शकतात आणि अशा सवयींपासून मुक्ती कशी मिळवायची याबद्दल आता जगभरात ठिकठिकाणी कार्यशाळा घेतल्या जातात. अशाच एका कार्यशाळेत 17 वर्षांची दक्षिण कोरियाची हावों तिची कहाणी सांगत होती...

  • Share this:

मुंबई, 15 जुलै : इंटरनेटच्या अतिवापराचे काय भयंकर परिणाम होऊ शकतात आणि अशा सवयींपासून मुक्ती कशी मिळवायची याबद्दल आता ठिकठिकाणी कार्यशाळा घेतल्या जातात. अशाच एका कार्यशाळेत 17 वर्षांची हावों तिची कहाणी सांगत होती, 'मी आधी 18 - 18 तास यूट्यूब वर असायचे. त्यामुळे मी खूपच चिडचिडी झाले होते. याचा माझ्या अभ्यासावर परिणाम व्हायला लागला. मनावरचा ताण काही केल्या जातच नव्हता.'

फक्त हावोंच नाही तर इंटरनेटच्या अतिवापरामुळे जगभरातले तरुण मानसिक आणि शारीरिक व्याधींचा सामना करत आहेत. दक्षिण कोरियासारख्या तंत्रज्ञानात अग्रेसर असणाऱ्या देशांपुढे ही मोठी समस्या बनली आहे. पण फक्त दक्षिण कोरियाच नाही तर जगभरातल्या तरुणांनाच इंटरनेटच्या अतिवापरापासून दूर कसं ठेवायचं हा प्रश्नच आहे.

हे भयंकर परिणाम

दक्षिण कोरियामधल्या आकडेवारीनुसार, 1 लाख 40 हजारपेक्षा जास्त तरुण इंटरनेटच्या कचाट्यात सापडले आहेत. त्यांना यातून सोडवण्यासाठी शाळा आणि कॉलेजमध्ये वेगवेगळे उपक्रम सुरू झाले आहेत.

नॅशनल हेल्थ सर्व्हेमध्ये दिलेल्या माहितीनुसार, जर एखाद्या गोष्टीचं प्रमाणाच्या बाहेर आकर्षण वाटू लागलं तर त्या व्यक्तीचं स्वत:वर नियंत्रण राहात नाही. सतत इंटरनेटवर असलेल्या व्यक्ती चिडचिड्या होऊ लागतात. त्यांची वर्तणूकही बदलते.

जगातूनच नाहिशी होऊ शकते तुमची ही आवडती गोष्ट...!

इंटरनेटचे असे भयंकर परिणाम होणार असतील तर त्यातून तरुणांना बाहेर कसं काढायचं याचंही तंत्र शिकवण्याची वेळ आली आहे. दक्षिण कोरियामध्ये आता मुलांसाठी आणि तरुणांसाठी अशी शिबिरं घेतली जातात. या शिबिरात जाताना कोणतंही इलेक्ट्रॉनिक गॅझेट न्यायची परवानगी नसते.

इंटरनेटला शोधा पर्याय

या शिबिरांमध्ये मुलांसाठी आणि तरुणांसाठी वेगवेगळ्या अॅक्टिव्हिटीज असतात. इंटरनेट वापरायचं नसेल तर मग त्याला पर्याय म्हणून काय करायचं, आपलं मन क्रिएटिव्ह गोष्टींमध्ये कसं रमवायचं याचं प्रशिक्षण इथे दिलं जातं. अशा शिबिरांमधून प्रेरणा घेऊन गेलेली मुलं व्हर्च्युअल जगातून बाहेर येतात आणि त्यांना वास्तव जगही खुणावू लागतं.

भारतातही अगदी प्रायोगिक तत्त्वावर तरुणांना इंटरनेटच्या अतिवापरापासून दूर ठेवण्याचे उपक्रम सुरू झाले आहेत. पण शाळा आणि कॉलेजमध्ये अशा कार्यशाळा घेतल्या पाहिजेत, असं तज्ज्ञांना वाटतं. इंटरनेट ही काळाची गरज असली तरी आपल्या व्यक्तिमत्वालाच ती धोका पोहोचवणार असेल तर आत्ताच खबरदारी घ्यायली हवी, असं ते सांगतात. तरुणांमध्ये हे व्यसन अॅडिक्शन कमी करायचं असेल तर शाळांमधूनच मोठ्या प्रमाणात जागृती व्हायला हवी, असंही त्यांचं मत आहे.

=================================================================================================

VIDEO : बिबट्याचा थरार, 12 तासांनी सापळ्यातून केली सुटका

First published: July 15, 2019, 5:57 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading