काय आहे गुड टच, बॅड टच ? असं समजवा मुलांना

काय आहे गुड टच, बॅड टच ? असं समजवा मुलांना

मुलांना वाईट स्पर्श आणि चांगला स्पर्श समजावून सांगण्यासाठी, आपण त्यांना केवळ शाब्दिकच नाही तर व्यावहारिक स्वरुपात देखील शिकवले पाहिजे.

  • Share this:

30 नोव्हेंबर : मुलांना लैंगिक अत्याचारापासून बचावासाठी दिल्ली पोलिसांनी सुरू केलेले ऑपरेशन 'नाजुक' हा एक व्यावहारिक उपक्रम आहे. यात पोलिसांकडून अंकल आणि 'दीदी' म्हणत 'गुड टच अँड बॅड टच' बद्दल जागरूक केले जात आहे. याबद्दल मुलांचा संकोच आधीच तुटलेला आहे आणि ते या प्रकरणात उघडपणे बोलतातही . त्यामुळे जाणून  घेऊयात 'गुड टच अँड बॅड टच' म्हणजे काय आणि मुलांना ते कसं समजावावं

असं समजवा 'बॅड टच आणि गुड टच'

मुलांना वाईट स्पर्श आणि चांगला स्पर्श समजावून सांगण्यासाठी, आपण त्यांना केवळ शाब्दिकच नाही तर व्यावहारिक स्वरुपात देखील शिकवले पाहिजे. जेणेकरुन त्यांच्या बाबतीत जर काही चुकत असेल तर ते लगेच त्यावर अॅक्शन घेऊ शकतात.

मुलांना सांगा की जर त्यांच्या बाबतीत असे घडले तर त्यांना ताबडतोब कुटुंबीयांना  किंवा आसपासच्या लोकांना सांगा. जर कोणी त्यांच्याशी गैरवर्तन केलं आणि त्यांना धमकवा. जर समोरच्याने कोणालाही सांगू नका अशी धमकी दिली तर त्याला बॅड टच म्हणतात हे मुलांना सांगा. आणि असं काही झाल्यास आधी आपल्याला येऊन सांगा अशी समजवा.

गुड टच: मुलांना समजावून सांगा की जर एखाद्याने त्यांना प्रेमाने स्पर्श केला, ज्यामुळे त्यांना चांगले आणि निश्चिंत वाटेल तर तो एक चांगले स्पर्श आहे.

खाजगी भागांबद्दल माहिती द्या:

जर तुम्ही मुलांना 'गुड टच आणि बॅड टच' बद्दल माहिती देत असाल तर त्यांच्याशी खासगी भागाविषयीही मोकळेपणाने बोला. त्यांना समजावून सांगा की जर एखाद्याने खासगी भागाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला तर त्याला बॅड टच म्हटलं जातं. जरी एखाद्याने त्यांच्या इच्छेशिवाय चुंबन घेतले तर त्याला बॅड टच देखील म्हटलं जाऊ शकतं.

Published by: Renuka Dhaybar
First published: November 30, 2019, 9:27 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading