मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /अंड रोज खावं खरं पण ऑम्लेट नव्हे, असं खा; या वेळी खाल्लंत तर आहे फायदा

अंड रोज खावं खरं पण ऑम्लेट नव्हे, असं खा; या वेळी खाल्लंत तर आहे फायदा

 उकडलेलं पूर्ण अंड (Boiled Egg) रोज खायला हवं. इम्युनिटी (Immunity) वाढवण्यासाठी अंड खाणं फायदेशीर मानलं जातं.

उकडलेलं पूर्ण अंड (Boiled Egg) रोज खायला हवं. इम्युनिटी (Immunity) वाढवण्यासाठी अंड खाणं फायदेशीर मानलं जातं.

उकडलेलं पूर्ण अंड (Boiled Egg) रोज खायला हवं. इम्युनिटी (Immunity) वाढवण्यासाठी अंड खाणं फायदेशीर मानलं जातं.

नवी दिल्ली,02 ऑगस्ट : अंडी प्रोटीनचा एक मोठा स्रोत आहे (Egg is Source of Protein).त्यामुळे आरोग्यासाठी फायेदशीर (Beneficial for health) असलेल्या पदार्थांमध्ये अंड्याला महत्व आहे. अंड्यांमध्ये कॅलरीज, प्रोटीन, गुड कोलेस्ट्रॉल,फॉलेट, कॅल्शियम, फॉस्फरस, सेलेनियम, व्हिटॅमीन ए, व्हिटॅमीन बी5, व्हिटॅमीन बी6, व्हिटॅमीन बी 12, व्हिटॅमीन बी, व्हिटॅमीन के हे पोषक (Healthy) घटक असतात. त्यामुळेच जगभरातले कित्येक लोक अंडी आवडीने खातात. दररोज 1 अंडं खाणं आरोग्यासाठी (Benefits of Eating Eggs) खूप फायदेशीर मानलं जातं. अंड खाल्ल्याने वजन वाढत नाही. शिवाय आपलं आरोग्यही निरोगी (Healthy) राहतं. इम्युनिटी (Immunity) वाढवण्यासाठी अंड खाणं फायदेशीर मानलं जातं. अंड हा प्रोटीनचा एक चांगला स्रोत आहे. याशिवाय यामध्ये व्हिटॅमीन इ देखील असतं. जिममध्ये वर्कआउट (Workout) करणारे लोक उकडलेली अंडी (Boiled Egg) खातात. पाहुयात उकडलेले अंडं खाण्याचे फायदे.

(ना डाग पडणार, ना ओरखडे; अशा पद्धतीने साफ करा तुमचा चष्मा)

डोळ्यांसाठी फायदा

उकडलेला अंड आपल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगलं आहे. यामध्ये ग्लूटन नावाचा घटक असतो. शिवाय चांगल्या त्वचेसाठी देखील उकडलेलं अंडं खावं. संशोधनानुसार पुरुषांमध्ये शुक्राणूंची कॉलिटी सुधारण्यासाठी अंड फायदेशीर आहे.

(बाळाचं पोट भरेल इतकं दूध येण्यासाठी; ‘या’ पद्धतीने करा 'Breast Feeding')

कोलेस्ट्रॉल बॅलेन्स

अंड्यामध्ये फोस्फेटाइट्स आणि ओमेगा 3 फॅटी ऍसिड असतं. जे शरीरामधल्या बॅड कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण करतं. आपण ऑम्लेट खातो तेव्हा, त्यासाठी वापरलेल्या तेलामुळे शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल वाढतो. म्हणूनच सकाळच्या वेळी उकडलेलं अंड खाणं फायदेशीर ठरतं.

प्रोटीनचा स्त्रोत

दिवसभर उत्साही राहण्यासाठी अंडं खायला हवं. अंड्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन असतं. जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं.

(आता चिंताच मिटली! कोरोनाच्या तिसऱ्या लाटेआधी मोदी सरकारने दिली दिलासादायक बातमी)

मेंदूसाठी उत्तम

अंड्यामध्ये कोलाइन नावाचं एन्जाइम असतं. स्मृतीभ्रंश याचा त्रास असणाऱ्या लोकांसाठी हे फायदेशीर आहे. ज्यांना हा असा त्रास आहे त्यांनी दररोज 1 उकडलेलं अंड सकाळच्या नाश्त्यामध्ये खाल्ल्यास त्यांच्या शरीरात कोलाइनची कमतरता दूर होऊन मेंदू तल्लख होतो.

First published:
top videos

    Tags: Health Tips, Lifestyle, Superfood