नवी दिल्ली, 08 नोव्हेंबर : संशोधनात असे आढळून आले आहे की दह्याचा (Curd) आहारात समावेश केल्याने वजन ६१ टक्क्यांनी कमी करता येते. दैनंदिन आहारात याचा समावेश केल्यास पोटाच्या चरबीदेखील कमी होऊ शकते. TOI च्या बातमीनुसार, अमेरिकन डायटेटिक असोसिएशनदेखील दही एक उत्कृष्ट चरबी बर्नर आहे, या दाव्याला दुजोरा दिला आहे. यामध्ये कॅल्शियमचे प्रमाण असल्याने वजन कमी (Weight Lose) करण्यासही मदत होते. हे बीएमआय निरोगी ठेवते आणि शरीराचे वजन योग्य राखते. 100 ग्रॅम दह्यामध्ये 80 मिलीग्राम कॅल्शियम असते. दह्याच्या मदतीने आपण वजन कसे कमी करू शकतो आणि त्याचे इतर फायदे काय आहेत, याविषयी (How To Eat Curd For Weight Lose) माहिती घेऊया.
वजन कमी करण्यासाठी आहारात अशा प्रकारे दह्याचा समावेश करा
दिवसातून तीन वेळा दही खाल्ल्यास वजन झपाट्याने कमी होऊ शकते.
तुम्ही स्मूदी बनवू शकता आणि नाश्त्यात फळ आणि दही मिसळून खाऊ शकता. .
रायत्याच्या रूपातही दही रोटीसोबत खाऊ शकता.
दह्यासोबत साखर न वापरल्यास बरे होईल. गोड आवडत असेल तर गूळ हलका वापरावा.
दह्यामध्ये मसाले घालून ताक स्वरूपातही पिऊ शकता.
ड्रायफ्रुट्स आणि कॉर्नफ्लेक्ससोबतही दही खाऊ शकता.
दह्याचे इतर फायदे
शरीरातील चयापचय क्रिया संतुलित न राहिल्यास वजनही वाढते. वजन कमी करायचे असेल तर संतुलित आहारासाठी दही आवश्यक आहे.
दह्यात प्रोबायोटिक्स असतात जे पचन आणि चयापचय सुधारण्यास मदत करतात.
हे पोषक तत्वांचे शोषण करण्यास देखील मदत करते.
दही खाल्ल्याने पोट दीर्घकाळ भरलेले राहते. ज्याद्वारे आपण जास्त वेळा खाणे टाळू शकतो.
दही हे कमी कार्ब आणि उच्च प्रथिनयुक्त अन्न आहे जे वजन कमी करण्यासाठी योग्य आहे.
(सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Weight loss, Weight loss tips