Home /News /lifestyle /

संचारबंदीमुळे घरीच करा गुढीपाडव्याची पूजा, पंचांगकर्ते मोहन दाते यांनी सांगितली पद्धत

संचारबंदीमुळे घरीच करा गुढीपाडव्याची पूजा, पंचांगकर्ते मोहन दाते यांनी सांगितली पद्धत

गुढीपाडवा हा सण हिंदू धर्मात नूतनवर्षाभिनंदनाचा सण.

    मुंबई, 24 मार्च : गुढीपाडवा हा सण हिंदू धर्मात नूतनवर्षाभिनंदनाचा सण. नव्या वर्षाची सुरुवात गुढी उभी करून केली जाते. चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा साजरा करण्याची प्रथा आहे. त्याला अध्यात्मिक आणि ऐतिहासिक कारणही सांगितलं जातं. बुधवारी गुढीपाडवा आहे. या दिवशी ऋतुचक्र बदलतं, शिशिर ऋतूत झाडांची पाने गळून गेलेली असतात, तर पाडव्याच्या सुमारास झाडांना नवी पालवी येत असते. रामानं या दिवशी रावणाचा वध केला या आनंदातत गुढी उभी केली जाते असं त्याचं ऐतिहासिक महत्त्व आहे. या दिवशी सगळ्या कटु आठवणी हेवे दावे विसरून नव्या वर्षाची नवी सुरुवात करायची असते. आनंदाची, मांगल्याची गुढी उभी करून तिचं पूजन करून नाव संकल्प करायचा असतो. यंदा मात्र या गुढीपाडव्याच्या पूजेला आवश्यक असेल ते सामान आपल्याला बाजारात उपलब्ध होईलच असं नाही. हे वाचा-राशीभविष्य : मिथुन आणि कुंभ राशीच्या लोकांनी आज प्रेमात जरा सबुरीनं घ्या जगभरासह भारत आणि महाराष्ट्रावर आलेलं कोरोनाचं संकट दूर व्हावं यासाठी सर्वच जण गुढी उभारताना प्राथर्ना करतील. सध्या महाराष्ट्रात कोरोनानं थैमान घातलं असून आतापर्यंत 3 जणांचा मृत्यू तर 101 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन करण्यात आलं असून कर्फ्यू पाळण्यात येणार आहे. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असं सरकारकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे गुढी पूजनासाठी आवश्यक ते साहित्य, बत्तासे, फूल, कडूनिंब मिळालं नाही तर काय करावं? तर चिंता करू नका यंदाही आपण गुढीपाडवा आपल्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीनं साजरा करू शकता. मोहन दाते पंचांगकर्ते यांनी कशी गुढी उभी करायची आणि पूजा करायची याचं मार्गदर्शन केलं आहे. मोहन दाते पंचांगकर्ते यांनी दिलेल्या माहितीनुसार यावर्षी वैश्विक आपत्तीमुळे गुढीपूजनाला साखरेची माळ, कडुनिंबाचा फाटा मिळाला नाहीतर , पारंपरिक पद्धती ऐवजी घरी असलेल्या काठीस रेशमी वस्त्र किंवा नवे वस्त्र बांधून ब्रह्मध्वजाय नमः असे म्हणून पूजन करावे, कदाचित काही घरात काठी नसेल तर देवापुढे रांगोळीने किंवा कागदावर गुढीचे चित्र काढून सुद्धा पूजन करता येईल , हे पूजन करताना नवीन वर्षाचा संकल्प हा राष्ट्राच्या आणि विश्वाच्या आरोग्यासाठी मी स्वच्छतेचे , शिस्तीचे पालन करेन असा करावा आणि नवीन वर्ष सुखाचे जावो अशी ब्रह्मध्वजाला प्रार्थना करावी. असं सांगितलं आहे. हे वाचा-FACT CHECK: गोमूत्र प्यायल्यानं आणि लसूण खाल्ल्यानं कोरोना बरा होतो?
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या