तुमच्याही आहारात वाढलं आहे का तेलाचं प्रमाण? 'असं' करा कमी

स्वयंपाक घरात तेलाचं महत्त्व फार आहे. त्यामुळे आपल्या खाण्यातून तेल काढू शकत नाही. पण जेवणात तेलाचं किती प्रमाण असावं हे जाणून घ्या.

  • Share this:

खाण्याच्या नवनवीन पदार्थामुळे तेल वापरण्याचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. वर्षाला प्रत्येक व्यक्तीच्या आहारात कमीत-कमी 18 किलो तेलाचा समावेश असतो.

भारतात एका वर्षाला 230 लाख टन तेलाचा खप फक्त खाण्यासाठी केला जातो. त्यामुळे तेलाचा वापर वाढला आहे.

भारतात गेल्या 8 वर्षात सनफ्लॉवर तेलाचं उत्पन्न प्रचंड वाढलं आहे. ऑलिव्ह, एवोकॅडो तेल आणि राईस ब्रँड तेलाचा वापरही तितकाच वाढला आहे. ग्राहकांना अनेक कंपन्यांचं तेल बाजारात उपलब्ध झाल्याने शेंगाच्या तेलाचा वापर कमी झाला.

खाण्याच्या पदार्थात तेलाचं प्रमाण किती असावं आणि कोणतं तेल वापरावं याबाबत ग्राहकांना अनेकदा माहीत नसतं. म्हणूनच तळलेल्या पदार्थांसाठी ऑलिव्ह तेलाचा वापर करू नये. कारण ऑलिव्ह तेलामध्ये स्मेकिंग पॉईंटचं प्रमाण कमी असतं.

चाळीसीपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तीला वयोमानानुसार अनेक आजार उद्भवू शकतात. म्हणून त्यांना खाण्याबाबत तितकीच पथ्यही पाळावी लागतात. या वयातील माणासाच्या आहारात वर्षाला 7 किलो तेलाचा समावेश असावा.

40 वर्षापेक्षा कमी वयाच्या व्यक्तीनं दिवसाला 20 ते 25 ML तेल आहारात वापरावं आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तीनं 15 ते 20 ML तेल खाण्यात वापरावं.

सध्या बाजारात अनेक कंपन्यांचे तेल उपलब्ध असल्यामुळे दर महिन्याला खाण्याचं तेल बदलल्यानं शरीरासाठी फायद्याचं ठरू शकतं. प्रत्येक व्यक्तीचा वर्षाला 7 किलो तेलाचा समावेश आहारात असावा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 8, 2019 02:01 PM IST

ताज्या बातम्या