घर सजवताय? मग करा हे काही छोटे बदल आणि तुमचं घर होईल ट्रेंडी

जाणून घ्या घरात काय बदल केल्याने तुम्हाला तुमच्या घराचा लुक बदलता येईल.

News18 Lokmat | Updated On: Jun 24, 2019 08:09 PM IST

घर सजवताय? मग करा हे काही छोटे बदल आणि तुमचं घर होईल ट्रेंडी

मुंबई, जून 24 : घर सजवताना नक्की काय करावे असा प्रश्न अनेकांना पडतो. पण, अगदी मोठं बजेट न काढता, काही विलक्षण कल्पना आजमावून, छोटे बदल करूनही तुम्ही घर अगदी ट्रेंडी बनवू शकता. जाणून घ्या घरात काय बदल केल्याने तुम्हाला तुमच्या घराचा लुक बदलता येईल. या टिप्स तुम्हाला घर सजवण्यासाठी नक्कीच उपयोगात येतील. Carpet Couture च्या संस्थापक राशी यांनी काही या महत्त्वाच्या टिप्स सांगितल्या आहेत...

1.खिडक्यांची शोभा वाढवा

खिडक्या हे घराचे एका प्रकारे डोळेच मानले जातत. घरात प्रवेश केल्यावर पहिली नजर पडते ती खिडकीवर. सूर्यप्रकाश घरात येण्याची आणि घरी बसून बाहेरील जग पाहण्याची जागा म्हणजे खिडकी. या खिडक्यांना आणखी आकर्षक बनवण्यासाठी तुम्ही पडद्यांसोबत काही प्रयोग करू शकता. घराचा आकार आणि रंग त्याला कॉनट्रास्ट किंवा लक्ष वेधून घेणारे काही रंग वापरून पडद्यांचा लुक बदलता येईल.

2.गालिचा वापरुन शोभा वाढवा

फर्निचर आणि भिंती घराला लुक नक्की देतात. पण, कधी तुम्ही विचार केला आहे का की गालिचे आणि कारपेट घराला एक वेगळाच लुक आणतात. तुमच्या खिशाला परवडणारे गालिचे वापरून घराची शोभा वाढवता येऊ शकते. गालिचा निवडताना हॉलमध्ये असणारा सोफा, पडदे, भिंतींचा रंग याबाबींकडे लक्ष देऊन मगच तो घ्यावा. शिवाय गालिचा हॉलच्या आकाराला साजेसा असावा.

Loading...

(वाचा :‘हे’ आहेत त्वचेचे अनेक कर्करोग, जाणून घ्या काय आहेत कारणे !)

3.उशा ठेवा अशा प्रकारे...

बहुतांशी लोक उशाची ठेवण ही साध्या पद्धतीने करतात. सरळपणे ठेवलेल्या उशांचा जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर, त्यासोबत प्रयोग करायला हरकत नाही. उशांची रचना आडव्या-उभ्या पद्धतीने असमान अशी करावी. सध्या ट्रेंडमध्ये काही चकमकीच्या उशा बाजारात उपलब्ध आहेत, त्यांचा वापर करून तुम्हाला नवा लुक देता येईल. याशिवाय, प्लेन सोफ्यावर कॉनट्रास्ट किंवा वेगवेगळ्या रंगीत उशा उठून दिसतील.

4.अनावश्यक सोफा किंवा खुर्चीला करा बाय बाय

प्रत्येकाच्या घरात अडगळीची ती एक खुर्ची किंवा सोफा असतो ज्याची गरज नसते. पण आवडीची असणारी ती वस्तू काढून टाकण्याची इच्छा नसते.  अशा अडगळीला काढा आणि मखमली, विलक्षण प्रिंट किंवा नेहमीपेक्षा वेगळ्या प्रकारच्या सोफ्याला किंवा खुर्चीसाठी घरात जागा करा.

Bonito Designs चे संस्थापक आणि CEO समीर ए.एम. यांनी दिलेल्या काही टिप्स...

कपाटात काही पडलेल्या आणि नको असलेल्या गोष्टींचा वापर पडद्यांची सजावट करताना होऊ शकतो. तुमच्या घरात अशा अनेक वस्तू असतील ज्या भिंतीवर टांगण्यासाठी योग्य वाटत नसतील. पण, एकदा नजर टाका पडद्यावर आणि त्या गोष्टींचा कसा करता येईल ते पहा. भिंतीवर वॉलहॅंगिग म्हणूनही त्याचा वापर होऊ शकतो.

(वाचा :हृदयविकारांपासून दूर राहण्यासाठी 'या' 7 पदार्थांचा आहारात समावेश कराच)

5.प्रिंटेड चादरीनं मिळेल वेगळं रूप

उशांसोबत वेगवेगळे प्रयोग करावे. घर सजावटीसाठी हा एक सोपा उपाय आहे. घर उठून दिसण्यासाठी मोठ्या प्रिंटच्या उशांना छोट्या प्रिंट असणाऱ्या उशांसोबत एकत्र ठेऊ शकता. फुलांच्या किंवा भूमितीचे आकार असलेल्या डिझाईनच्या उशांचा वापर करा. आकाराने मोठ्या, भरगच्च उशा आणि बाकीच्या उशांना एकत्रित लावावे. लिव्हींग रुममध्ये संगीत वाद्ये आणि अल्बम कव्हर अशा गोष्टींचा वापर करावा. एकत्रित ठेवल्यास लुक पूर्ण होईल.

'पिवळी साडीवाली' अधिकारी महिलेच्या डान्सचा VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 24, 2019 08:09 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...