पोस्ट कोरोना जगात जगायचं कसं, ताण आलाय? हे आहेत प्रभावी उपाय

पोस्ट कोरोना जगात जगायचं कसं, ताण आलाय? हे आहेत प्रभावी उपाय

कोरोनाच्या साथीनंतर (Coronavirus pandemic) आता न्यू नॉर्मल पद्धतीचंच आयुष्य आपल्याला जगावं लागणार आहे. मात्र त्याचा ताण न घेता जगणं महत्त्वाचं आहे.

  • Share this:

मुंबई, 3 जानेवारी: सुरळीत सुरू असलेला जगाचा व्यवहार कोरोनानं एकदम विस्कटून टाकला. मोठमोठ्या बलाढ्य देशांच्या अर्थव्यवस्था ठप्प झाल्या. लाखो लोक बेरोजगार झाले. व्यवसाय कोलमडून पडले. शिक्षण, परदेशवाऱ्या, विवाह या सगळ्यात अडथळे उभे राहिले.

या सगळ्या विस्कळीत चित्रामुळे अनेक लोक तणावग्रस्त झाल्याचं दिसतं आहे. काहींना तीव्र नैराश्यानंही ग्रासलं. अशावेळी मार्ग शोधत स्वतःच स्वतःला प्रेरणा देत नव्या वर्षांत अधिकाधिक कर्तृत्व गाजवण्याची संधी आहे. त्यासाठीच्या काही खास टिप्स आम्ही देतो आहोत.

काळ बदलतोय, तुम्हीही बदला

काळासोबत जो बदलत नाही तो नष्ट होतो. सर्व्हायवल ऑफ द फिटेस्ट हा निसर्गाचा नियम आहे. स्वतःला लवचिक ठेवण्याचं कौशल्य मिळवण्याला या कोरोनाच्या काळात मुळीच पर्याय नाही. बदलापासून दूर पळालो तर आपण अधिकाधिक अडचणीत येऊ. न्यू नॉर्मलला स्वीकारत त्याप्रमाणे जगायला शिकणं हासुद्धा त्यातलाच एक भाग आहे. त्यामुळं तणावातून बाहेर पडायचं असेल, तर स्वागत करा बदलाचं!

कुटुंब आणि दोस्तमंडळी आहेत ना!

काळ कुठलाही असो, माणूस समाजशील प्राणी आहे. त्यामुळे बदलत्या अवघड काळात टिकून राहत प्रगती करायची असेल, तर एकट्यानं हे शक्य नसतं. आपल्या आजूबाजूचे लोक, कुटुंबीय, मित्रमंडळी यांची वेळोवेळी न संकोचता मदत घ्या, त्यासाठी कृतज्ञ राहायलाही शिका. एकमेकांना मदत करण्यातून मनाला मिळणारं समाधानही तुम्हाला ताण आणि नैराश्यातून बाहेर येण्यास मदत करतं. मनातल्या भावना आणि विचार ज्यांच्यासोबत मोकळेपणानं शेअर करता येतील अशा काही हक्काच्या आणि विश्वासाच्या जागा आयुष्यात कायम असल्या पाहिजेत.

शोधा आनंदी राहण्याची कारणं!

ताणात असण्याचा अनुभव घेत असाल तर आवर्जून आनंदी होण्याचे मार्ग शोधा. हा उपाय हमखास लागू पडेल. यासाठी खूप जास्त पैसा खर्च करून काहीतरी अवघड करण्याची गरज अजिबात नाही. काहीतरी साधंसं, पण मस्त काम करून आनंदाला तुम्ही ओंजळीत घेऊ शकता. हे एखाद्या औषधासारखं काम करेल. बागकाम करणं, एखादा कुत्रा किंवा मांजर पाळणं, कुणाला रस्ता ओलांडायला मदत करणं, आवडती गाणी ऐकणं, डान्स करणं... असं काहीही यात असू शकतं.

बदला तुमची जीवनशैली!

आताचा आणि येणारा काळ हा पोस्ट कोरोना काळ असणार आहे. त्यामुळे आता पूर्वीसारखंच आयुष्य जगात राहण्याचा अट्टहास सोडला पाहिजे. तुम्ही जुन्या काळाचा विचार करत दुःखी व्हाल तर काहीच साध्य होणार नाही उलट असलेल्या संधीही गमावून बसाल. त्यापेक्षा पोस्ट कोरोना काळाला सूट होईल अशी जीवनशैली घडवत तुम्ही त्यानुसार स्वतःच्या क्षमतांचा अधिकाधिक वापर करा.करोनाच्या संकटाला संधी मानत अनेकांनी नवे प्रयोग यशस्वी केले आहेत. त्यांच्या प्रयोगांचा अभ्यास करा. हे सगळं आव्हानात्मक असलं तरी याहून चांगला पर्याय कुठलाच उरलेला नाही, हे नक्की!

Published by: News18 Desk
First published: January 3, 2021, 10:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading