मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Relationship Tips : तिच्या नाकावरच असतो राग; गर्लफ्रेंड किंवा बायकोला मनवण्याचा हा सोपा फंडा

Relationship Tips : तिच्या नाकावरच असतो राग; गर्लफ्रेंड किंवा बायकोला मनवण्याचा हा सोपा फंडा

अनेक वेळा लोकांचे त्यांच्या जोडीदाराशी वागणे उद्धट आणि चिडचिड होऊ लागते. त्याच वेळी, तुमच्या जोडीदाराच्या कठोर स्वभावामुळे तुम्ही फक्त दुखावले जात नाही, तर तुमच्या नात्यात मोठी भांडण होण्याचीही शक्यता असते. मात्र तुम्ही जोडीदाराला प्रेमाने समजावून सांगून त्यांच्या वागण्यात बदल घडवून आणू शकता.

पुढे वाचा ...
  मुंबई, 23 सप्टेंबर : सहसा प्रत्येकाला प्रेमळ आणि काळजी घेणारा जीवनसाथी हवा असतो. पण जोडीदाराचे सर्व गुण तुम्हाला आवडले पाहिजेत, हे आवश्यकही नाही. काही लोक उद्धट आणि चिडखोर वर्तनही करतात. अशा परिस्थितीत जर तुमचा पार्टनरदेखील रुक्ष स्वभावाचा असेल तर काही सोप्या पद्धतींचा वापर करून तुम्ही तुमच्या नात्यातील समस्या सोडवू शकता. वास्तविक कोणताही मनुष्य परिपूर्ण नसतो. अर्थात तुमचा पार्टनर तुमच्यावर खूप प्रेम करतो. पण त्याचं असभ्य वागणं तुमच्यासाठी चिंतेचं कारण बनू शकतं. अशा परिस्थितीत तुमच्या विचार आणि समज यावर तुमच्या नात्याची ताकद अवलंबून असते. रुक्ष किंवा उग्र स्वभावाच्या जोडीदाराशी कसे डील करावे याबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचे नाते घट्ट करू शकता. प्रेमाने समजावून सांगा रुक्ष स्वभावाचे लोक अनेकदा आपल्या जोडीदारासोबत काही गोष्टी शेअर करण्यास कचरतात. त्याचबरोबर अनेक गोष्टी लपवून ठेवल्याने त्यांचा रुक्षपणा आणि चिडचिडेपणा वाढतो. अशा परिस्थितीत तुमच्या जोडीदाराला प्रेमाने समजावून सांगून, तुम्ही त्यांना रिलॅक्स करून शकता. जेणेकरून तुमचा जोडीदार तुमच्याशी प्रत्येक गोष्टी शेअर करू शकेल आणि त्यांचा रुक्षपणा हळूहळू कमी होईल.

  Happy Hormones : तिची एक झलक दिसली तरी मन उडू उडू का होतं? तुम्हालाही माहिती नसेल हे कारण

  उपस्थितीची जाणीव करून द्या अनेक वेळा लोक गरज असेल तेव्हाच आपल्या जोडीदाराचे ऐकतात आणि बाकीच्या वेळी त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतात. अशा परिस्थितीत तुमच्या नात्यात अंतर येऊ लागते. त्यामुळे तुमच्या जोडीदाराची प्रत्येक छोटी गोष्ट अथवा म्हणणे लक्षपूर्वक ऐका. यामुळे त्यांना त्यांच्या आयुष्यात तुमची उपस्थिती जाणवेल आणि ते तुमच्याकडे लक्ष देऊ लागतील. संयम बाळगा अनेक वेळा तुमच्या लाख प्रयत्नांनंतरही जोडीदाराची रुक्ष वागणूक बदलत नाही. अशा प्रकरणात आपण संयम बाळगणे आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या जोडीदाराला एका रात्रीत प्रेम आणि काळजी घ्यायला शिकवू शकत नाही. तसेच तुमची घाई करणे तुमच्या पार्टनरला अस्वस्थ करू शकते. म्हणून त्यांना बदलण्यासाठी थोडा वेळ द्या. Relationship Tips : तुमच्यासोबत या गोष्टी घडत असतील तर तुम्ही प्रेमात आहात, हृदय देते संकेत बदल लक्षात घ्या तुमच्या जोडीदाराचा कठोर स्वभाव बदलण्याचे तुमचे प्रयत्न व्यर्थ जाणार नाहीत. अशा परिस्थितीत हळूहळू त्यांच्यात होणारे बदल लक्षात घ्या. त्याच वेळी, जर तुमचा जोडीदार बदलण्याचा प्रयत्न करत असेल, तर भूतकाळातील गोष्टीबद्दल त्याला टोमणे देऊ नका आणि त्याला वाईट बोलणे टाळा. तसेच तुमच्या जोडीदाराच्या प्रयत्नांचे कौतुक करायला विसरू नका.
  Published by:Pooja Jagtap
  First published:

  Tags: Lifestyle, Relationship tips

  पुढील बातम्या