प्राण्याने चावल्यानंतर किंवा ओरबडल्यानंतर सर्वात आधी काय करावं?

प्राण्याने चावल्यानंतर किंवा ओरबडल्यानंतर सर्वात आधी काय करावं?

जर प्राण्यांमुळे (animal) झालेल्या जखमांकडे दुर्लक्ष केलं तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.

  • Last Updated: Sep 8, 2020 10:15 PM IST
  • Share this:

घरी आढळणाऱ्या पाळीव प्राण्यांना बहुतांश लोक लस देतात, जेणेकरून त्यांच्याद्वारे कोणताही संसर्ग पसरू नये. सर्व खबरदारी असूनही, प्राण्यांच्या चाव्याद्वारे कधीकधी गंभीर धोके उद्भवू शकतात. म्हणून जर एखाद्या पाळीव प्राण्याशिवाय इतर एखाद्या प्राण्यांनी प्राणघातक हल्ला केला तर ते आणखी प्राणघातक ठरू शकतं. उदाहरणार्थ, कुत्र्यांच्या चाव्याद्वारे रेबीज रोग होऊ शकतो. पाळीव कुत्र्यांना रेबीजचं इंजेक्शन देणं आवश्यक आहे. प्राण्यांनी चावा घेतल्यावर काय करावं ते जाणून घ्या -

  • myupchar.com शी संबंधीत डॉ. आयुष पांडे यांच्या म्हणण्यानुसार, जखम साबणान आणि पाण्याने चांगली धुवावी. रक्तस्त्राव थांबवण्यासाठी ताबडतोब कापसाने बाधित भागावर दाबा आणि जेव्हा रक्तस्त्राव थांबेल तेव्हा जखमांवर अँटीबायोटिक क्रिम लावा.
  • जखम किंवा ओरखडा झालेला भाग स्वच्छ पट्टीने बांधा. शक्य असल्यास ताबडतोब रुग्णालयात जा आणि उपचार करा. काही प्राण्यांच्या चाव्यावर उपचार बराच काळ चालतो, म्हणून कोणत्या प्राण्याने आपल्यावर हल्ला केला हे डॉक्टरांना सांगा. जेणेकरून डॉक्टर त्यानुसार औषधांची निवड करून उपचार करतील.
  • एखाद्या जनावराने चावल्यामुळे किंवा ओरखडे पाडल्यामुळे जर जास्त इजा झाली असेल तर 12 तासांच्या आत उपचार केल्याने कुठलीच समस्या होणार नाही. जर अशा जखमांची काळजी घेतली नाही तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.
  • लहान मुलांना जर जनावर चावलं तर आणि त्याला मागील 5 वर्षांत कोणतीही टिटॅनस लस दिली नसेल तर ती लस त्यांना दिली जाते. प्रौढ व्यक्तीला दर 10 वर्षांनी ही लस देण्याची गरज आहे.

प्राण्यांची देखील काळजी घ्या

एखाद्या पाळीव प्राण्याने चावल्यास त्याच्या मालकाची माहिती घ्या आणि त्याच्या पाळीव कुत्र्याला रेबीजचे इंजेक्शन दिलं होतं का? आणि कोणत्या तारखेला इंजेक्शन दिलं होतं. या सर्व गोष्टी जाणून घेतल्यानंतर ही माहिती उपचारादरम्यान डॉक्टरांना सांगा. चावा घेतलेल्या कुत्र्यावर काही दिवस पाळत ठेवली पाहिजे. जर एखाद्या वटवाघळाने चावा घेतला असेल तर वटवाघळापासून विषाणूचा फैलाव होण्याचा धोका असल्याने त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा.

मुलांना प्राण्यांपासून दूर ठेवा

मुलांना जनावरांच्या आसपास कसं सुरक्षित रहायचं हे शिकविणंदेखील महत्त्वाचं आहे. जसं एखादा प्राणी काहीतरी खात असेल तर त्यास त्रास देऊ नये. घरात पाळीव प्राण्यांचे शेपूट किंवा कान खेचू नयेत, पाळीव प्राण्यांना अलगद उचलावे आणि त्यांना हात लावल्यानंतर लगेच हात धुवून स्वच्छ करावं. लहान मुलांना जनावरांच्या पिंजऱ्यापासून दूर ठेवावं कारण प्राणी त्यांच्यावर हल्ला करू शकतात. पाळीव प्राणी पट्ट्याच्या आधारे बांधून ठेवा.

myupchar.com शी संबंधीत डॉ. आयुष पांडे यांच्या मते, जर एखाद्या पाळीव कुत्र्याने देखील चावा घेतला असेल तर उपचार करणं आवश्यक आहे. कुत्र्याच्या चाव्यामुळे रेबीज रोगाव्यतिरिक्त मज्जातंतूंचं नुकसान होऊ शकते. संक्रमण होऊ शकते आणि मानसिक परिणाम देखील होऊ शकतात.

अधिक माहिती साठी वाचा आमचा लेख - इजा, विषबाधा आणि इतर बाह्य कारणे

न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.

अस्वीकरण: आरोग्य विषयक समस्या आणि त्याविषयीचे उपचार याची माहिती सर्वाना सहज सुलभतेने कुठल्याही मोबदल्याशिवाय उपलब्ध व्हावी हा या लेखांचा हेतू आहे. या लेखनामध्ये प्रकाशित माहिती म्हणजे तज्ञ अधिकृत डॉक्टरांच्या तपासणी, रोगनिदान, उपचार आणि वैद्यकीय सेवेचा पर्याय नाही. जर तुमची मुले, कुटुंबातील सदस्य, नातेवाईक यापैकी कुणीही आजारी असतील, त्यांना याठिकाणी वर्णन केलेली काही लक्षणे दिसत असतील तर, कृपया तत्काळ आपल्या डॉक्टरांना जाऊन भेटा. डॉक्टरांच्या मार्गदर्शना शिवाय स्वतः, तुमची मुले, कुटुंब सदस्य, किंवा अन्य कुणावरही वैद्यकीय उपचार करू नका किंवा औषधे देवू नका. myUpchar आणि न्यूज18 यावर प्रकाशित माहिती, त्या माहितीच्या अचूकतेवर, या माहितीच्या परिपूर्णते वर विश्वास ठेवल्याने, तुम्हाला कुठलीही हानी झाली किंवा काही नुकसान झाले तर, त्याला myUpchar आणि न्यूज18 जबाबदार असणार नाही, हे तुम्हाला मान्य आहे, आणि त्याच्याशी तुम्ही सहमत आहात.

First published: September 8, 2020, 10:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading